AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RSS: जोधपूरमध्ये अखिल भारतीय समन्वय बैठकीचे आयोजन, विविध मान्यवर उपस्थित राहणार

राजस्थानमधील जोधपूर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 5, 6 आणि 7 सप्टेंबर 2025 रोजी ही बैठक पार पडणार आहे.

RSS: जोधपूरमध्ये अखिल भारतीय समन्वय बैठकीचे आयोजन, विविध मान्यवर उपस्थित राहणार
mohan-bhagwat
| Updated on: Sep 03, 2025 | 10:50 PM
Share

राजस्थानमधील जोधपूर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विक्रम संवत 2082, भाद्रपद शुक्ल त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा म्हणजेच 5, 6 आणि 7 सप्टेंबर 2025 रोजी ही बैठक पार पडणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही बैठक दरवर्षी आयोजित केली जाते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

32 वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी या बैठकीत सहभागी होणार

गेल्या वर्षी ही बैठक केरळमधील पलक्कड येथे पार पडली होती. या बैठकीला संघाच्या विचारांनी प्रेरित असणाऱ्या 32 वेगवेगळ्या संघटनांचे निवडक पदाधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहेत. या सर्व संघटना संघाच्या विचारांचे अनुसरन करुन विविध क्षेत्रात काम करत आहेत. सार्वजनिक जीवनात लोकशाही पद्धतीने सामाजिक बदल आणि व्यवस्थांमध्ये सुधारणा करण्याचा या संघटनांचा प्रयत्न आहे.

विविध मुद्द्यांवर चर्चा होणार

अखिल भारतीय समन्वय बैठकीत सर्व संघटना ते करत असल्याच्या कामाचा अहवाल सादर करत असतात. राष्ट्रीय एकता, सुरक्षा आणि सामाजिक दृष्टिकोनातून समोर आलेल्या महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा होत असते. तसेच काही समस्या असतील त्या कशा सोडवयच्या त्यानुसार आवश्यक पावले उचलली जातात. यात अलिकडच्या काळात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांवरही प्रकाश टाकला जातो.

तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत आरएसएसच्या विचारांवर चालणाऱ्या विविध संघटनांचे कार्यकर्ते आपल्या कार्याची, कामगिरीची आणि भविष्यातील योजनांबद्दल माहिती सादर करणार आहेत. संघ शताब्दीच्या कार्यक्रमांत सर्व संघटनांच्या सहभागावर आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित राहणार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला आदरणीय सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, माननीय सरकार्यवाह श्री दत्तात्रेय होसाबळे, सर्व 6 सह-सरकार्यवाह आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित असणार आहेत. राष्ट्र सेविका समिती, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पक्ष, भारतीय किसान संघ, विद्या भारती, भारतीय मजदूर संघ यासह 32 संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष, संघटन मंत्री आणि प्रमुख अधिकारीही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली आहे.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.