AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohan Bhagwat : शेजारच्या देशातील Gen Z च्या आंदोलनावर मोहन भागवत यांचं अत्यंत महत्वपूर्ण भाष्य

Mohan Bhagwat : "आज निसर्गाचा कोप वाढला आहे. आज डोंगररागांमध्ये हे दिसतय. हिमालय आपल्या सुरक्षेची भिंत आहे. आजची हिमालयाची अवस्था धोक्याची घंटा वाजवत आहे. राजकीय जीवनात गोंधळ वाढलाय" असं मोहन भागवत म्हणाले.

Mohan Bhagwat :  शेजारच्या देशातील Gen Z च्या आंदोलनावर मोहन भागवत यांचं अत्यंत महत्वपूर्ण भाष्य
Mohan Bhagwat
| Updated on: Oct 02, 2025 | 9:58 AM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला आज 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. आरएसएस शताब्दी वर्ष साजरं करत आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही रेशीमबागेत संघाचा विजया दशमीचा कार्यक्रम आहे. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशासमोरचे प्रश्न मांडताना विविध मुद्यांना स्पर्श केला. यावेळी शेजारच्या देशातील Gen Z च्या आंदोलनांवर मोहन भागवत यांनी अत्यंत महत्वपूर्ण भाष्य केलं. “आपल्याला शेजारच्या देशात गोंधळ पहायला मिळतोय. कधी कधी प्रशासन जनतेला विचारात न घेता धोरणं आखतात. त्यांच्यामध्ये असंतोष असतो, पण ते अशा पद्धतीने व्यक्त होणं योग्य नाही. इतकी हिंसा योग्य नाही. लोकशाही पद्धतीने बदल घडवता येतो” असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये हिंसक आंदोलन झालं होतं. त्यानंतर तिथे सत्तांतर झालं. त्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत हे बोलले.

“विद्यमान अर्थ प्रणालीमध्ये दोष आहेत. यामुळे श्रीमंती-गरीबी वाढते. शोषणाच नवीन तंत्र तयार होतं. आज एकटा देश आयसोलेशनमध्ये राहू शकत नाही. आपल्यासाठी स्वदेशी आणि स्वावलंबनाला पर्याय नाही. आंतरराष्ट्रीय जगाशी जोडणं ही मजबुरी नाही, ते आपल्या इच्छेने झालं पाहिजे” असं मोहन भागवत म्हणाले. “आज निसर्गाचा कोप वाढला आहे. आज डोंगररागांमध्ये हे दिसतय. हिमालय आपल्या सुरक्षेची भिंत आहे. आजची हिमालयाची अवस्था धोक्याची घंटा वाजवत आहे. राजकीय जीवनात गोंधळ वाढलाय” असं मोहन भागवत म्हणाले.

रामनाथ कोविंद यंदाचे मुख्य अतिथी

“जागतिक व्यवस्थेत परिवर्तन आवश्यक आहे. विनाश टाळण्यासाठी गरजेच आहे. आपण इतके पुढे गेलोय की, लगेच मागे वळलो तर गाडी पलटी होईल. आता आपल्याला हळूहळू पुढे जाऊन परतीचा मार्ग पकडावा लागेल. कुठलीही व्यवस्था बनवणारा समाज आहे” असं मोहन भागवत म्हणाले. सकाळी 7.40 च्या सुमारास रेशीम बागेत हा कार्यक्रम सुरु झाला. या कार्यक्रमाला 21 हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवक उपस्थित होते. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यंदाचे मुख्य अतिथी आहेत. संघ प्रमुखांच्या आजच्या भाषणाकडे सगळ्या देशाच लक्ष असतं.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.