अयोध्येत मोहन भागवतांचे मोठे विधान, म्हणाले, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आज अयोध्येत अनेक लोक पोहोचली आहेत. नुकताच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरावर ध्वजारोहण करण्यात आलंय. अयोध्येत आज कडक सुरक्षा असून काही काळासाठी मंदिरात प्रवेश थांबवण्यात आलीत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत अयोध्येतील राम मंदिरातील कार्यक्रमात पोहोचले आहेत. राम मंदिरावर भगवा ध्वज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फडकला आहे. हा ध्वजारोहण म्हणजे मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णतेचे प्रतिक असणार आहे. आज अयोध्येमध्ये कडक सुरक्षा आहे. काही खास लोकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी म्हटले की, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. यासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले त्यांच्या आत्म्यांना समाधान मिळाले पाहिजे. अशोकजींना तिथे नक्कीच शांती मिळाली असेल. मंदिरात ध्वजारोहण समारंभ आज झाला.
पुढे बोलताना मोहन भागवत यांनी म्हटले की, अयोध्येत एकेकाळी फडकणारा रामराज्याचा ध्वज आज पुन्हा एकदा फडकवण्यात आला आहे. आजचा दिवस सर्वांसाठी अर्थपूर्ण आहे. या भगव्या ध्वजावर रघुकुल वंशाचे प्रतीक वृक्षाचे चित्र आहे. हे झाड रघुकुल वंशाच्या शक्तीचे मोठे प्रतीक आहे. हे ते झाड आहे ज्याबद्दल असे म्हटले जाते की, झाडे सर्वांना सावली देते, ते स्वतः उन्हात उभे राहतात आणि इतरांना फळे देखील देतात.
सूर्य देव कोणत्याही अडचणींवर मात करण्याच्या संकल्पाचे प्रतीक आहे. मंदिर त्यांच्या स्वप्नांप्रमाणेच किंवा त्याहूनही भव्य बांधले गेले आहे. आजचा अत्यंत आनंदाचा दिवस आहे. भगवा ध्वज धर्माचे प्रतिक आहे. सत्य सर्व जगाला देणारा भारत आज आपल्याला उभा करायचा असल्याचेही मोहन भागवत यांनी म्हटले. हे एक स्वप्न असल्याचे सांगताना मोहन भागवत त्यांच्या भाषणात दिसले. जे म्हटले ते केले पाहिजे, असा संदेश नरेंद्र मोदींनी दिला.
यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही भाषण झाले. त्यांच्या भाषणातून एक वेगळीच ऊर्जा बघायला मिळाली. ते म्हणाले की, मंदिरावर फडकणारा भगवा ध्वज एका नवीन भारताचे प्रतीक आहे. गेल्या 500 वर्षांत काळ बदलला आहे, नेतृत्व बदलले आहे, परंतु श्रद्धा तीच राहिली आहे. या कार्यक्रमानिमित्त अयोध्येत मोठी सुरक्षा बघायला मिळतंय.
