AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia Ukraine War: पुतीन यांच्याशी चर्चा केल्यानंतर रशियाच्या संरक्षण मंत्र्याला आला हृदयविकाराचा झटका, नेमकं काय झालं?

युक्रेन (Ukraine) आणि रशियामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेलं युद्ध अजूनही संपलेलं नाही. उलट दिवसे न् दिवस या युद्धाचा भडका वाढताना दिसत आहे. या युद्धावरून जगातील अनेक देशांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यावर टीका केली आहे.

Russia Ukraine War: पुतीन यांच्याशी चर्चा केल्यानंतर रशियाच्या संरक्षण मंत्र्याला आला हृदयविकाराचा झटका, नेमकं काय झालं?
पुतीन यांच्याशी चर्चा केल्यानंतर रशियाच्या संरक्षण मंत्र्याला आला हृदयविकाराचा झटकाImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 26, 2022 | 1:38 PM
Share

मास्को: युक्रेन (Ukraine) आणि रशियामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेलं युद्ध अजूनही संपलेलं नाही. उलट दिवसे न् दिवस या युद्धाचा भडका वाढताना दिसत आहे. या युद्धावरून जगातील अनेक देशांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यावर टीका केली आहे. तसेच युद्ध थांबवण्याची विनंतीही केली आहे. जगाला जसं हे युद्ध पटलेलं नाही. तसेच रशियातील नागरिकांनीही या युद्धाला विरोध केला आहे. रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू आणि पुतीन यांच्यात या युद्धावरून कडाक्याचं वाजलं. ते इतकं की या भांडणानंतर सर्गेई शोइगू (Russian defence minister Sergey Shoigu) यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा युक्रेनचे मंत्री अँटोन गेराशचेंको यांनी केला आहे. युक्रेनमधील विशेष सैन्य मोहीम अपयशी ठरली होती. त्याबाबत पुतीन यांनी सर्गेई यांना जबाबदार धरलं होतं. युक्रेन विरोधातील युद्धाचे दुसरे मास्टरमाइंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्गेई आणि पुतीन (Russian President Vladimir Putin) यांच्यात वाद झाले. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे रशियाचे हे संरक्षण मंत्री जगासमोर आलेले नाहीत. 24 मार्च रोजी सर्गेई शेवटचे टीव्हीवर दिले होते. मात्र, त्यांचं ते फुटेज खरं की खोटं याबाबतची पृष्टी होऊ शकली नाही.

रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू हे अचानक गायब झाल्याने अनेक अफवा उठल्या आहेत. क्रेमलिनने खार्किव आणि कीव सारख्या प्रमुख युक्रेनी शहरांवर ताबा न मिळवल्याने त्यांना शिक्षा केली आहे. गार्जियनच्या रिपोर्टनुसार, क्रेमलिनच्या दैनिक पत्रकार परिषदेत संरक्षण मंत्र्यांच्याबाबत पत्रकारांनी सवाल केला असता हा प्रश्न पुढे आला आहे.

टीव्हीवर संरक्षण मंत्री दिसले

संरक्षण मंत्री विशेष सैन्य अभियानात व्यस्त आहेत. मीडियाशी बोलण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, असं क्रेमलिनच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर लगेचच संरक्षण मंत्री टेलिव्हिजनवर दिसले. पुतीन यांच्यासोबत सुरक्षा परिषदेच्या टेलिकॉन्फ्रन्समध्ये ते दिसले होते. या कॉन्फ्रन्समध्ये त्यांनी विशेष सैन्य अभियानाच्या प्रगतीबाबतची माहिती दिली असल्याचा दावाही करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात 24 तारखेला रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. गेल्या महिन्याभरापासून हे युद्ध सुरू आहे. मात्र, युक्रेन अजूनही डगमगलेला नाही. त्यामुळे रशियाही आश्चर्यचकीत झाला आहे.

संबंधित बातम्या:

Russia-Ukraine War: UNSC मध्ये रशियालाही नाही समर्थन, भारत तटस्थ भूमिकेमध्ये!

Russia Ukraine Video : यूक्रेननं शॉपिंग मॉलमध्ये दारुगोळा ठेवला तरी रशियाच्या क्षेपणास्त्रानं अचूक टिपला, पहा व्हिडीओ

काश्मिरमधील नागरिकांसमोर आम्ही अपयशी ठरलो; OIC परिषदेत इम्रान खान यांनी गायिले काश्मिरचे गोडवे

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.