
Russia President Vladimir Putin: रशिया आणि भारताचे संबंध हे ट्राईड अँड टेस्टेट मानल्या जातात. अडचणीच्या काळात गेल्या आठ दशकात रशिया कायमच भारताच्या पाठीशी उभा ठाकला आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासून भारत आणि रशियाच्या मैत्रिची पायाभरणी झाली. भारतीय चित्रपटसृष्टीने या मैत्रिला बहार आणली. राज कपूर यांच्या चित्रपटातील गाण्यांनी रशियाला वेड लावले. गेल्या एका दशकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैत्रिला नवीन आयाम दिला. तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी चीनसमोर भारताला कमी लेखले नाही. सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विक्षिप्त स्वभावाचा फटका जगाला बसत आहे. निकटचा मित्र म्हणणारे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफचा बॉम्ब टाकला. या सर्व घाडामोडीत पुतिन यांच्या दौऱ्याकडे जगाचे लक्ष लागले आहे. पुतीन यांचा दौरा भारतासाठी महत्त्वाचा ...