Sadvi Harsha : Sadvi Harsha : मी काय गुन्हा केलाय? रडत रडत ‘साध्वी हर्षाने’केली मोठी घोषणा
Sadhvi Harsha Richhariya Update : सोशल मीडियावर खळबळ माजवणारी, अवघ्या काही दिवसांत व्हायरल लेली साध्वी हर्षा रिचारिया हिने महाकुंभातून परत जाण्याची घोषणा केली आहे. रडत रडत तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. पण महाकुंभ संपण्यापूर्वीच ही'साध्वी' का परत का जात आहे? काय आहे प्रकरण ?, जाणून घेऊया.

नाव हर्षा रिछारिया… 30 वर्षांच्या या महिलेची महाकुंभात जितकी चर्चा झाली, तितकं नाव क्वचितच कोणाचं घेतलं गेलं असेल. तिला सर्वात सुंदर साध्वीचा टॅगही मिळाला. सोशल मीडियावर, चहूकडे फक्त साध्वी हर्षाबद्दलच चर्चा सुरू आहे. तिच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची लोकांना इच्छा आहे. याचदरम्यान अनेकांनी तिचे इंटरव्ह्यूही घेतले. मात्र तेव्हाच हर्षाने सप्ष्ट केलं होतं – की ती अद्याप साध्वी झालेली नाही, ती सध्या फक्त धर्माच्या रस्त्यावर चालत आहे. महाकुंभमध्ये निरंजनी आखाड्याच्या छावणी प्रवेशावेळी हर्षा रथावर बसलेली दिसली, त्यावरून पुन्हा गदारोळ सुरू झाला.
ट्रोल करणाऱ्यांवर गंभीर आरोप
हा गोंधळ एवढा वाढला की, आता हर्षा रिचारियाने दुःखी मनाने महाकुंभ सोडत असल्याची घोषणा केली आहे. तिने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात व्हिडीओमध्ये ‘साध्वी’ हर्षा रिचारिया ढसाढसा रडत होती. महाकुंभ सोडण्याची घोषणा करतानाच, तिने रडत रडत ट्रोल करणाऱ्यांवर गंभीर आरोप केले.
‘ एक मुलगी जी धर्माशी जोडली जाण्यासाठी, तो जाणून घेण्यासाठी इथे ( महाकुंभात) आली होती, सनातन संस्कृती जाणून घेण्याची इच्छा होती. मात्र तुम्ही (मला) त्यालायक ठेवलंच नाही की ती महाकुंभ संपेपर्यंत इथे राहू शकेल. हा महाकुंभ जीवनात एकदाच येतो, पण तुम्ही ती संधीच ( माझ्याकडून) हिरावून घेतली. ज्यांनी हे केलं असेलं त्यांना पाप लागेल’ , अशा शब्दांत तिने त्रागा व्यक्त केला.
मी काही मोठा गुन्हा केला का ?
साध्वी हर्षा म्हणाली, ‘काही लोकांनी मला धर्मात येण्याची संधी दिली नाही. या कॉटेजमध्ये राहून मी मोठा गुन्हा केलाय असं वाटतंय. माझा काहीही दोष नसतानाही मला टार्गेट केलं जातयं. याआधी मी महाकुंभ संपेपंर्यत इथे राहण्यासाठी आले होते, पण आता मला येथे राहता येणार नाही. या खोलीत 24 तास राहण्यापेक्षा मी येथून निघून गेलेलं बरं, अशा शब्दांत तिने संताप व्यक्त केला.
कोणी घेतला आक्षेप?
खरंतर, रथावर बसलेल्या हर्षाचा व्हिडिओ समोर आल्यावर अनेक संत आणि इतरांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. हर्षा आचार्य हे महामंडलेश्वर स्वामी श्री कैलाशनंदगिरी जी महाराज यांचे शिष्य आहेत. ती महाकुंभातील निरंजनी आखाड्याशी संबंधित आहे. मात्र ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सर्वप्रथम प्रश्न उपस्थित केला होता. महाकुंभात अशी परंपरा सुरू करणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. विकृत मानसिकतेचा हा परिणाम आहे. महाकुंभात चेहऱ्याचे सौंदर्य नव्हे तर हृदयाचे सौंदर्य पाहायला हवे होते,असा टोला त्यांनी लगावला.
संन्यासाची दीक्षा घ्यायची की लग्न करायचे हे जिने अद्याप ठरवलेले नाही, तिला संत महात्म्यांच्या शाही रथात स्थान देणे योग्य नाही. भक्त म्हणून हजेरी लावणे ठीक होते, पण भगव्या कपड्यात शाही रथावर बसणे पूर्णपणे चुकीचे आहे,असेही ते म्हणाले होते.
यानंतर शांभवी पीठाधीश्वर स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनीही यावर नाराजी दर्शवली होती. ( तिचं वागणं) हे अजिबात योग्य नाही. यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो. तर काली सेनेचे प्रमुख स्वामी आनंद स्वरूप यांनी हर्षाच्या वागण्यावर आक्षेप घेतला. कुंभचे आयोजन ज्ञान आणि अध्यात्म पसरवण्यासाठी केले जाते, हे मॉडेल्सद्वारे प्रचारात्मक कार्यक्रम म्हणून वापरले जाऊ नये अशी टीका त्यांनी केली होती.
यानंतर हर्षा बरीच ट्रोल झाली. त्यामुळे तिने वैतागून महाकुंभमधून परत येण्याचा निर्णय जाहीर केला. पुढील 3 दिवसांत मी महाकुंभमधून उत्तराखंडला जात आहे, असे तिने जाहीर केलं. मी माझ्या गुरूंचा अपमान सहन करू शकत नाही. मी अभिनेता आणि अँकर होते, पण मला मॉडेल म्हणून सादर केले जात आहे, जे चुकीचे आहे, अशा शब्दांत तिने त्रागा व्यक्त केला.
