धर्मांतर करणाऱ्या आदिवासींना आरक्षण देऊ नका; विश्व हिंदू परिषद आक्रमक

धर्मांतर करणाऱ्या आदिवासींना संविधानानुसार मिळणाऱ्या आरक्षणाचा लाभ देऊ नका. इतर सुविधाही देऊ नका अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी केलं आहे.

धर्मांतर करणाऱ्या आदिवासींना आरक्षण देऊ नका; विश्व हिंदू परिषद आक्रमक
Alok Kumar
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 1:01 PM

नवी दिल्ली: धर्मांतर करणाऱ्या आदिवासींना संविधानानुसार मिळणाऱ्या आरक्षणाचा लाभ देऊ नका. इतर सुविधाही देऊ नका अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी केलं आहे. विश्व हिंदू परिषदेने केलेल्या या मागणीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही विश्व हिंदू परिषद आक्रमक झाली आहे. विहिंपने तब्बल दोन वर्षानंतर हिंदुत्व आणि राष्ट्रीयतेच्या मुद्द्यावरून खासदारांशी चर्चा सुरू केल्या आहेत. विहिंपने या मुद्द्यावर आतापर्यंत भाजप, काँग्रेस, जेडीयू, शिवसेना, नॅशनल कॉन्फरन्स, तृणमूल काँग्रेस, सीपीआय(एम) आणि आपसहीत 329 खासदारांशी चर्चा केली आहे.

कठोर कायद्याची गरज

या खासदारांशी चर्चा करताना विहिंपने काही मुद्द्यांकडे त्यांचं लक्ष वेधलं आहे. लालच, भीती आणि फसवणुकीने धर्मांतर केलं जात असल्याचं विहिंपने या खासदारांना सांगितलं. तसेच आदिवासींचा प्रश्नही उपस्थित केला. आदिवासी धर्मांतर करतात. धर्मांतरानंतर त्यांची पूजा पद्धती, परंपरा आणि आस्था सर्व बदलतात. मात्र, संविधानानुसार मिळणार आरक्षण आणि इतर सुविधा घेत असतात. त्यामुळे या गोष्टींना आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी कठोर कायदा केला पाहिजे, असं विहिंपने या खासदारांना सांगितलं. तसेच या संदर्भात सल्ला देण्याची विनंतीही त्यांनी केली.

अनेक मुद्द्यांवर सहमती

यावेळी बांगलादेश आणि पाकिस्तानात अल्पसंख्याकावर हल्ले होत आहेत. त्यांचे शोषण होत आहे. याबाबत जगाच्या पटलावर याची चर्चा घडवून आणली पाहिजे. याबाबतची इतर देशांची मतेही जाणून घेतली पाहिजेत, असंही आलोक कुमार यांनी या खासदारांना सांगितलं. खासदारांसोबतच्या चर्चेत अनेक मुद्द्यांवर सहमती झाली आहे. तसेच चर्चेतून अनेक नवे मुद्देही समोर आले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

दोन टप्प्यात चर्चा

विश्व हिंदू परिषदेने दोन टप्प्यात खासदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात बंगाल, उत्तर, मध्य, पश्चिम, उत्तर-पूर्वेतील खासदारांच्या भेटी घेऊन चर्चा करणअयात येत आहेत. तर, दुसऱ्या टप्प्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी ओडिशा आणि दक्षिण भारतातील खासदारांच्या भेटी घेण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या:

देशाच्या देवांचा अपमान होतो तरीही चंपा असो की दंफा कोणीच बोलत नाही; अरविंद सावंत यांचा घणाघाती हल्ला

Kerala Murder | एकाचा गळा दाबला, तर दुसऱ्याला भोसकलं! 12 तासांच्या आत दोन राजकीय नेत्यांची हत्या

Nagpur Accident CCTV | ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबला, कारने तरुणाला चिरडलं, काळजाचा ठोका चुकवणारी दृश्यं

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.