AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ratan Tata: रतन टाटा यांचे मित्र शांतनु नायडू यांना टाटा मोटर्समध्ये मोठी जबाबदारी, लिहिली भावूक पोस्ट म्हटले, ‘जिथून सुरुवात झाली…’

Shantanu Naidu Post: 2018 मध्ये त्यांनी रतन टाटा यांचे सहाय्यक शांतनु नायडू यांनी काम करण्यास सुरुवात केली. रतन टाटा यांच्याशी असलेल्या जवळीकतेमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. आता ते टाटा मोटर्समध्ये मोठ्या पदावर पोहचले आहे.

Ratan Tata: रतन टाटा यांचे मित्र शांतनु नायडू यांना टाटा मोटर्समध्ये मोठी जबाबदारी, लिहिली भावूक पोस्ट म्हटले, 'जिथून सुरुवात झाली...'
| Updated on: Feb 05, 2025 | 10:15 AM
Share

Shantanu Naidu Post: दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्यासोबत सावलीसारखे राहणारे शांतनु यांना टाटा ग्रुपमध्ये महत्वाची जबाबदारी मिळाली आहे. कमी वयाचे असले तरी शांतनु नायडू हे रतन टाटा यांचे मित्र होते. दोघांच्या मैत्रीचे अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत होते. शांतनु नायडू यांना टाटा ग्रुपमधील ऑटो कंपनी टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर आणि स्ट्रॅटजिक इनिशिएटिव्सचा प्रमुख बनवण्यात आले आहे. शांतनु नायडू यांनी आपल्या नवीन जबाबदारीबाबर LinkedIn वर एक भावुक पोस्ट लिहिली आहे.

शांतनु नायडू यांनी ज्येष्ठ लोकांसाठी 2021 मध्ये Goodfellows हे वेंचर सुरु केले होते. त्यामध्ये रतन टाटा यांचीही गुंतवणूक होती. त्यानंतर रतन टाटा यांनी आपली भागिदारी काढून टाकली होती. तसेच रतन टाटा यांना शांतनु नायडू यांना शिक्षणासाठी कर्जही दिले होते. त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात नायडू यां शैक्षणिक कर्जही त्यांच्या माफ केले होते.

शांतनु नायडू यांची भावून पोस्ट

नायडू यांनी लिंक्डइनमध्ये लिहिले की, मला हे सांगताना आनंद होत आहे की, मी टाटा मोटर्समध्ये महाव्यवस्थापक, प्रमुख – स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हज म्हणून नवीन सुरुवात करत आहे. मला आठवते माझे वडील टाटा मोटर्सच्या प्लांटमधून पांढरा शर्ट आणि नेव्ही पॅन्ट घालून परत येत होते. मी खिडकीपाशी त्याची वाट पहायचो. आता जिथून सुरुवात झाली तिथून आयुष्य परत आले. शांतनु नायडू यांनी 2014 मध्ये सावित्री फुले पुणे विद्यापीठातून ऑटोमोबाईल डिझाईन अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतली. त्यानंतर नायडू यांनी 2016 मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून एमबीए केले.

असे जमली होती मैत्री

शांतनु नायडू यांचा रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्त एक गाणे गातानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. अभियंता असलेल्या नायडू यांनी 2014 मध्ये रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे प्राण भरधाव धावणाऱ्या गाड्यांपासून वाचवण्यासाठी एक प्रणाली विकसित केली होती. ते प्रणाली रतन टाटा यांना भावली होती. नायडू भटक्या कुत्र्यांची करत असलेली काळजी पहिल्यावर त्यांनी त्यांना भेटण्यासाठी बोलवले होते. त्यानंतर नायडू यांच्या प्रोजेक्टमध्ये रतन टाटाही काम करु लागले. यानंतर दोघांची जवळकी वाढली. नायडू रतन टाटा यांचे मित्र बनले.

2018 मध्ये त्यांनी रतन टाटा यांचे सहाय्यक शांतनु नायडू यांनी काम करण्यास सुरुवात केली. रतन टाटा यांच्याशी असलेल्या जवळीकतेमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. ‘आय कम अपॉन अ लाइटहाऊस’ या पुस्तकात त्यांनी रतन टाटा यांच्याशी असलेल्या मैत्रीबद्दल लिहिले आहे. रतन टाटा यांचे गेल्या वर्षी 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनावर शंतनूने एक भावनिक पोस्ट लिहिली होती.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.