AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंडित नेहरू आरक्षणाच्या विरोधात होते, शशी थरूर यांचं खळबळजनक विधान!

काँग्रेसचे नेते तथा प्रसिद्ध लेखक शशी थरूर यांचे Our Living Constitution या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शशी थरूर यांनी आरक्षणाविषयी महत्त्वाचे विधान केले.

पंडित नेहरू आरक्षणाच्या विरोधात होते, शशी थरूर यांचं खळबळजनक विधान!
pandit nehru and shashi tharoor
| Updated on: Aug 02, 2025 | 6:33 PM
Share

Shashi Tharoor : काँग्रेसचे नेते तथा प्रसिद्ध लेखक शशी थरूर यांचे Our Living Constitution या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने शशी थरूर आणि माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्यात संवाद झाला. दरम्यान, याच कार्यक्रमावेळी थरूर यांनी मोठं विधान केलं आहे. आरक्षणावर बोलताना भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आरक्षणाच्या विरोधात होते, असे विधान केले आहे.

पंडित नेहरू हे आरक्षणाच्या विरोधात होते

यावेळी बोलताना तरुणी पिढी आणि माध्यमांवर भाष्य केले. सरकारने माध्यमांत हस्तक्षेप करू नये. सरकारकडे राजकीय अजेंडा असतो, असे मत थरूर यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना त्यांनी भारतातील आरक्षण व्यवस्था आणि पंडित नेहरू यांचा दृष्टकोन यावरही भाष्य केले. पंडित नेहरू हे आरक्षणाच्या विरोधात होते. पण त्यांनी UCC अर्थात समान नागरी कायदा आवश्यक आहे, असे सांगितेल होते, असे मत व्यक्त केले.

‘लिव्ह-इन’ बाबतचे कलम मला मान्य नाही

समान नागरी कायद्यावर बोलताना त्यांनी उत्तराखंडच्या UCC कायद्यातील काही कलमे हास्यास्पद आहेत. ‘लिव्ह-इन’ बाबतचे कलम मला मान्य नाही, असेही थरूर यांनी स्पष्टपणे सांगितले. बहुतेक देशांकडे समान नागरी कायदे आहेत, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

आजही हजारो खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. यावर बोलताना कोर्टांमध्ये प्रकरणांचा ढीग वाढतोय, ही परिस्थिती अविश्वसनीय आहे. एआय वापरून काही मार्ग काढता येईल का? ते पाहता येईल, असे मत थरूर यांनी व्यक्त केले.

समान नागरी कायदा लागू करताना…

याच कार्यक्रमात माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनीही वेगवेगळ्या विषयांवर आपले मत व्यक्त केले. संविधान हे समान नागरी संहितेची भावना व्यक्त करते. माझा अस म्हणणं आहे की किमान 75 वर्षांच्या संविधानानंतर संविधानाची महत्त्वाकांक्षा आणि ध्येय साध्य करणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, असे मत चंद्रचूड यांनी व्यक्त केले. परंतु समान नागरी कायदा लागू करताना आपण आपल्या समाजाला विश्वासात घेतले पाहिजेय हे खरोखरच राष्ट्र म्हणून समाजाच्या भविष्याच्या हिताचे आहे, असे सांगितले पाहिजे हेही चंद्रचूड यांनी आवर्जून सांगितले.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.