AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDIA आघाडीचं नाव होऊ शकतं BHARAT! शशि थरुर यांनी फुलफॉर्मसह सुचवलं असं काही..

INDIA vs BHARAT : देशाचं नाव इंडिया असावं की भारत यावरून सध्या जोरदार वाद सुरु आहे. भाजपाने भारत या नावाचं नावाचं समर्थन केलं आहे. तर काँग्रेसने इंडिया आघाडी असं नाव घेतल्यानेच पायाखालची जमिन सरकरल्याचा आरोप केला आहे.

INDIA आघाडीचं नाव होऊ शकतं BHARAT! शशि थरुर यांनी फुलफॉर्मसह सुचवलं असं काही..
INDIA vs BHARAT वादात शशि थरुर यांची उडी, आघाडीला नाव बदलण्याची सूचना देत सांगितलं असं...
| Updated on: Sep 06, 2023 | 10:13 PM
Share

मुंबई : भारत विरुद्ध इंडिया हा वाद सध्या सुरु आहे. देशाचं नाव नेमकं काय असायला हवं याचा वाद आता सोशल मीडियावर सुरु आहे. आगामी जी20 शिखर संमेलनासाठी राजभवनात डीनरच आयोजन करण्यात आलं आहे. या निमंत्रण पत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ इंडिया या ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असं लिहिलं आहे. त्यामुळे या वादाला आणखी फोडणी मिळाली आहे. आात या वादात काँग्रेस खासदार शशि थरूर यांनी उडी घेतली आहे. इतकंच काय तर भाजपा विरोधी आघाडीचं नाव भारत होऊ शकतं असंही सांगितलं आहे. शशि थरुर यांनी भारत या नावाचा फुलफॉर्मही सांगितला आहे. असं केल्यास सत्ताधारी पक्ष नाव बदलण्याच्या भानगडीतच पडणार नाही. काँग्रेस खासदार शशि थरूर यांनी एक्सवर लिहीत याबाबतची माहिती दिली आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने याबाबत नेमकं काय सांगितलं आहे याचा उल्लेखही केला आहे.

काय म्हणाले शशि थरूर?

शशि थरूर यांनी ट्विटरवर लिहित सांगितलं आहे की, “आम्ही स्वत:ला अलायन्स फॉर बेटरमेंट हारमनी अँड रिस्पॉन्सिबल एडव्हान्समेंट फॉर टूमॉरो (BHARAT) बोलू शकतो. यामुळे सत्तारुढ पार्टी नाव बदलण्याचा खेळ बंद करेल”. सध्या असलेल्या इंडिया (I.N.D.I.A.) या आघाडीचा फुलफॉर्म इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इंक्लूसिव अलायन्स असा ठेवलेलं आहे.

शशि थरुर यांनी बुधावरी एक न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून 2015 च्या एका घटनेचा उल्लेख केला आहे. यात जनहित याचिकेच्या माध्यमातून देशाचं नाव इंडिया ऐवजी भारत असावं अशी मागणी करण्यात आली होती. यावर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं की, भारतीय संविधान आर्टिकल 1.1 मध्ये बदल करत देशाची नाव बदलण्याची गरज नाही. संविधानच्या आर्टिकल 1.1 मध्ये अधिकृतपणे नावासाठी इंडिया आणि भारत यांची उल्लेख केला आहे.

दुसरीकडे 2015 मध्ये योगी आदित्यनाथ यांनी लोकसभेत एक प्रायव्हेट बिल सादर केलं होतं. यात इंडिया दॅट इज भारत ऐवजी इंडिया दॅट इज हिंदुस्तान असं करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याचबरोबर, 2010 आणि 2012 मध्ये काँग्रेस खासदा शांताराम नाईक यांनी राज्यसभेत एक खासगी बिल सादर केलं होतं. यात संविधानातून इंडिया हा शब्द हटवण्याची मागणी केली होती.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.