तनिष्क वाद: जाराकडून राहुलसोबतच्या लग्नाचा फोटो ट्विट, शशी थरुर म्हणाले हाच आहे ‘इन्क्लुझिव्ह इंडिया’

ज्वेलरी ब्रँड तनिष्कच्या एका व्हिडीओ जाहिरातीनंतर आंतरधर्मीय लग्नाच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा होत आहे.

तनिष्क वाद: जाराकडून राहुलसोबतच्या लग्नाचा फोटो ट्विट, शशी थरुर म्हणाले हाच आहे 'इन्क्लुझिव्ह इंडिया'
Follow us
| Updated on: Oct 15, 2020 | 8:52 PM

नवी दिल्ली : ज्वेलरी ब्रँड तनिष्कच्या एका व्हिडीओ जाहिरातीनंतर आंतरधर्मीय लग्नाच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा होत आहे. तनिष्कच्या जाहिरातीत असंच एक लग्नाचं उदाहरण दाखवल्यानंतर त्यावर बहिष्काराची भाषा झाली आणि तनिष्कला ट्रोलही करण्यात आलं. त्यानंतर तनिष्कने ही जाहिरात मागे घेतली. मात्र, याच मुद्द्यावरुन अनेक दिग्गज आता प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. शशी थरुर यांनी याच मुद्द्याला हात घालत बहिष्कार घालण्याची धमकी देत ट्रोलिंग करणाऱ्यांना ‘सर्वसमावेशक भारताची’ आठवण करुन दिली आहे. यावेळी थरुर यांनी जारा फारूकी यांच्या आंतरधर्मीय लग्नाचं उदाहरण देत त्यांचं कौतुक केलं (Shashi Tharoor Zeeshan Ayyub Rasika Agashe Zara Parwal on tanishq ad controversy).

जारा फारूकी यांनी आपल्या आंतरधर्मीय लग्नाचा फोटो ट्विट करत धार्मिक द्वेष पसरवणाऱ्यांना चांगलीच चपराक लगावली. जारा फारूकी यांनी म्हटलं, “हा फोटो तनिष्कवर बहिष्कार टाकणाऱ्यांसाठी आणि वेगळ्या धर्मातील दोन व्यक्तींच्या लग्नावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांसाठी आहे. माझं पहिलं नाव जारा फारूकी आहे. माझं लग्न 2016 मध्ये निखिल परवाल यांच्याशी झालं आणि हे आमचे लग्नाचे फोटो.”

“आम्ही हिंदू रुढी-परंपरेनुसार मोठ्या उत्साहात भारतीय लग्न केलं. या लग्नात 4 दिवस कुटुंबीय, मित्र आणि नातेवाईकांसह दूर दूरवरुन आलेल्या लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिला. माझ्या पतीच्या कुटुंबियांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी मला स्वीकारत खूप प्रेम दिलं. तरीही काही बिनडोकांसाठी हे अकल्पनीय आहे. मात्र, जाती आणि धर्मापलिकडील भारतात असंच होतं. वेगवेगळे कुटुंब एकमेकांच्या परंपरांचं खुलेपणाने स्वागत आणि सन्मान करतात,” असंही जारा फारुकी यांनी म्हटलं.

जारा फारूकी यांनी शेवटी म्हटलं, “मला आशा आहे की सर्व द्वेष करणाऱ्यांना आपल्या आयुष्यात असं विनाअट प्रेम आणि सन्मान मिळो.”

“गंगा-जमुनी परंपरेचं जीवंत उदाहरण”

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी जारा यांचं हे ट्विट रिट्विट करुन त्यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर हे ट्विट चांगलंच व्हायरलं झालं. शशी थरुर म्हणाले, “जारा फारूकी आणि निखिल परवाल ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसचे सदस्य असल्याचं समजल्यावर खूप छान वाटलं. जारा उत्तर पुण्याच्या सचिव आहेत आणि निखिल फायनान्स फंडच्या टीममध्ये आहे. हे दोघं भारताच्या ‘गंगा जमुनी परंपरेचं’ जीवंत उदाहरण आहेत.”

लव्ह जिहादच्या नावाने गळा काढण्याआधी स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट समजून घेऊ

बॉलिवूड अभिनेता झीशान आयुब याची पत्नी आणि नाट्यकलाकार-दिग्दर्शक रसिका आगाशे हिनेही आपल्या आंतरधर्मीय लग्नाचं उदाहरण देत डोहाळ्याच्या कार्यक्रमाचा एक फोटो ट्विट केला. ती म्हणाली, “हा माझ्या डोहाळ्याच्या कार्यक्रमाचा फोटो, म्हटलं शेअर करावा. लव्ह जिहादच्या नावाने गळा काढण्याआधी कृपा करुन विशेष विवाह कायदा (स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट) समजून घ्या.”

रसिका शिवाय प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान यांची पत्नी मिनी माथुर (Mini Mathur)यांनी देखील एक उदाहरण सादर केलंय. त्यांनी लिहिलं आहे, “यापेक्षा कितीतरी अधिक प्रेम मला माझ्या आंतरधर्मीय लग्नात मिळालं आहे.”

हेही वाचा :

तनिष्क ज्वेलर्सच्या जाहिरातीवरुन वाद, सोशल मीडिया ट्रोलिंगनंतर जाहिरात हटवली

Tanishq Advertisement : ‘तनिष्क’वर कंगना भडकली, जाहिरातीतून लव्ह-जिहादला प्रोत्साहन दिल्याचा आरोप

संबंधित व्हिडीओ :

Shashi Tharoor Zeeshan Ayyub Rasika Agashe Zara Parwal on tanishq ad controversy

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.