भाजपमध्ये संघटनात्मक मोठे बदल, आरएसएसच्या नेत्यांचं पक्षातलं वजन घटवलं?

भाजपकडून संयुक्त महासचिव हे अत्यंत प्रतिष्ठेचे पदच रद्द करण्यात आले आहे. | BJP RSS

भाजपमध्ये संघटनात्मक मोठे बदल, आरएसएसच्या नेत्यांचं पक्षातलं वजन घटवलं?

नवी दिल्ली: भाजपमध्ये नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बदलांमध्ये एक रंजक गोष्ट समोर आली आहे. हे बदल म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नेत्यांचे भाजपमधील वजन कमी करण्याची चाल असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. (Should organisational changes in BJP seen as hint to RSS)

भाजपकडून संयुक्त महासचिव हे अत्यंत प्रतिष्ठेचे पदच रद्द करण्यात आले आहे. त्याऐवजी व्ही. सतीश यांच्याकडे संयोजकपदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. त्यांच्यावर पक्षाला दलित मतदारांपर्यंत पोहोचवण्याची मुख्य जबाबदारी आहे.

या संघटनात्मक बदलांचा सर्वाधिक फटका संघाशी संबधित असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बसला आहे. या माध्यमातून भाजपमधून संघाचा प्रभाव दूर करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. व्ही सतीश यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असली तरी इतर महत्त्वाची पदे संघटनेतील चमकोगिरीपासून दूर असलेल्या लो प्रोफाईल कार्यकर्त्यांना देण्यात आली आहेत. व्ही सतिश यांच्याकडे संसदीय पार्टी, अनुसूचित जाती मोर्चा आणि दलित समाजापर्यंत पोहोचण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

संघटन स्तरावर फेरबांधणी करण्याचा उद्देश

भाजपमधील हे संघटनात्मक बदल पक्षाच्या फेरबांधणीच्या उद्देशाने करण्यात आले आहेत. संयुक्त सरचिटणीस सौदान सिंह यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे. ते चंदीगडमध्ये राहून हरियाणा, पंजाब. चंदीगड आणि हिमाचल प्रदेशातील कारभार सांभाळतील. भाजपसाठी हा प्रदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. तर संयुक्त सरचिटणीस शिव प्रकाश यांच्याकडे मध्य प्रदेश, छत्तीसगढ, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमधील पक्षविस्ताराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मोदी आणि शाहांचा सावध पवित्रा

हे संघटनात्मक बदल भाजपमधील नेत्यांचे महत्त्व वाढवणारे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी या बदलांना हिरवा कंदील दाखवला असला तरी या सगळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची परवानगी मिळण्याच्यादृष्टीने मोदी व शहा सावधपणे पावले टाकत असल्याचे समजते.

संबंधित बातम्या:

राष्ट्रवादीतून आलेल्या चित्रा वाघ यांना भाजपमध्ये महत्त्वाची जबाबदारी

पंकजांनी महाराष्ट्रात वेळ देणं बरोबर नाही, ही तर केंद्राची इच्छा : चंद्रकांत पाटील

(Should organisational changes in BJP seen as hint to RSS)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI