Shraddha Murder Case: आफताबच्या ‘दृश्यम’ला पोलिसांच्या संमोहनाने केले चेकमेट! अशा प्रकारे पोलिसांनी काढून घेतली सर्व माहिती

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आफताबने दृश्यम चित्रपटासारखी कहाणी रचली होती, मात्र पोलिसांनी एक पाऊल पुढे जात त्याला त्याच्याच जाळ्यात अडकविले.

Shraddha Murder Case: आफताबच्या 'दृश्यम'ला पोलिसांच्या संमोहनाने केले चेकमेट! अशा प्रकारे पोलिसांनी काढून घेतली सर्व माहिती
आफताब पुनावाला Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 27, 2022 | 1:23 PM

नवी दिल्ली, श्रद्धाच्या (Shraddha Murder Case) हत्येचा आरोपी आफताबने  (Aftab) पोलिसांपासून वाचण्यासाठी एक कथा रचली होती, त्याला माहित होते की एक दिवस तो पकडला जाईल आणि म्हणूनच त्याने पोलिसांपासून वाचण्यासाठी अशी कहाणी रचली, पोलीस त्याच्या बतावणीमध्ये येऊन 14 भरकटतील शी त्याची योजना होती. सुरुवातीला तो पोलिसांना सांगत होता की, 22 मे रोजी श्रद्धा त्याला सोडून कुठेतरी गेली होती. पण जेव्हा पोलिसांनी तांत्रिक पुरावे दाखवून आफताबला खोटे बोलत असल्याचे सांगितले तेव्हा त्याने रागाच्या भरात श्रद्धाची हत्या कशी केली हे सांगितले. त्यानंतर त्याने स्वतःची आणि श्रद्धाची अशी एक प्रेमकहाणी सांगितली ज्यामध्ये त्याने स्वत:ला लाचार आणि फासलेला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी अशी काढली माहिती

सहा महिन्याआधी घडलेल्या गुन्ह्याचे पुरावे शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार हे पोलिसांना अधिक माहिती होते.  या सहा महिने जुन्या प्रकरणात स्वतःहून पुरावे गोळा करणे हे एक कठीण काम आहे, म्हणून पोलिसांनी आफताबची दृश्यम कथा फोडण्यासाठी संमोहनाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी आफताबच्या डोक्यात दडलेले रहस्य उघड करण्यासाठी त्याला पूर्णपणे ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आणि ही जबाबदारी या प्रकरणाचे तपास अधिकारी राम सिंह यांच्यावर सोपवण्यात आली होती, तेव्हापासून राम सिंह यांनी आफताबला अटक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी आफताबवर कोणतीही कडक कारवाई न करता, तो जे खायला मागायचा ते त्याला दिले.

हे सुद्धा वाचा

पोलिसांचा त्याच्यावर असलेला विश्वास पाहून आफताबने तपास अधिकाऱ्यांना सर्व प्रकार उघडपणे सांगण्यास सुरुवात केली. पोलिसांनी आफताबला आश्वासन दिले की, श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कुठे फेकले हे जर त्याने सांगितले तर या प्रकरणात ते त्याला वाचवू शकतात. पोलिसांच्या या आश्वसनामुळे आफताब पूर्णपणे पोलिसांच्या संमोहनात अडकला. तपास अधिकारी त्याला खरंच वाचवत असं त्याला वाटू लागले , त्यामुळे त्याने शरीराच्या अवयवांची विल्हेवाट लावलेल्या प्रत्येक ठिकाणी पोलिसांना नेले. पोलिसांच्या या युक्तीमुळे वेगवेगळ्या ठिकाणांहून 18 हून अधिक हाडे जप्त केली.  आफताबने पोलिसांना सांगितले की त्याने मृतदेह कापण्यासाठी वापरलेली करवत गुरुग्रामच्या जंगलात फेकून दिली होती, परंतु बराच काळ लोटल्याने ते शस्त्र शोधण्यासाठी पोलिसांना वेळ लागत आहे.

पॉलीग्राफ आणि नार्को टेस्टसाठी आफताबची संमती हाही त्याच संमोहनाचा एक भाग होता

सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी जेव्हा आफताबची पॉलीग्राफ आणि नार्को टेस्ट करायचं ठरवलं आणि त्यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान होतं ते आफताबला टेस्ट करायला पटवून देणं, इथेही आफताबचा तपास अधिकाऱ्यावरचा अढळ विश्वास कामी आला. पोलीस अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून आफताबने पॉलीग्राफ आणि नार्को टेस्ट करून घेण्याचे मान्य केले. आफताबला हवे असते तर तो कोर्टासमोर पॉलीग्राफ आणि नार्को टेस्ट करून घेण्यास नकार देऊ शकला असता. मात्र पोलिसांवरच्या विश्वासामुळे त्याने चाचणी करण्याला होकार दिला.

आफताबची पॉलीग्राफ चाचणी झाल्यानंतर पोलीस त्याची नार्को टेस्ट करण्याची तयारी करत आहेत. सध्या 14 दिवसांची रिमांड संपल्यानंतर आफताबला 13 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगातील तुरुंग क्रमांक चारमध्ये पाठवण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.