AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नमस्कार, फ्रॉम स्पेस… ‘, अंतराळातून शुभांशू शुक्ला यांचा नवीन Video, अनुभव केले शेअर

Shubhanshu Shukla:अंतराळ प्रवास माझ्यासाठी स्वप्नासारखे आहे. अंतराळात उड्डानानंतर जेव्हा मी पृथ्वीकडे पाहिले तेव्हा वाटले, एखाद्या चित्रकाराने निळा आणि हिरवा रंग मिळून कॅनवास तयार केला आहे. मायक्रोग्रॅव्हीटीमध्ये जाणे मजेशीर अनुभव आहे.

'नमस्कार, फ्रॉम स्पेस... ', अंतराळातून शुभांशू शुक्ला यांचा नवीन Video, अनुभव केले शेअर
Shubhanshu Shukla
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 26, 2025 | 12:51 PM
Share

Shubhanshu Shukla Axiom 4 Mission: भारतीय वायूदलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे प्रवास करत आहेत. नासाच्या फॉल्कन-9 या यानातून गेलेल्या शुभांशू शुक्ला यांनी इतर अंतराळवीराबरोबर अंतराळातील रोमांच शेअर केला. एक्सिओम स्पेसने X वर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात शुभांशू आपला अनुभव सांगत आहेत.

व्हिडिओत काय म्हटले?

ॲक्सिऑम-4 मोहिमेअंतर्गत अन्य तीन अंतराळवीरांबरोबर शुभांशू शुक्ला यांनी बुधवारी अवकाशात उड्डाण केले. शुभांशू यांनी अंतराळातून पाहिला संदेश पाठवला. नमस्कार, फ्रॉम स्पेस… माझ्या प्रिय देशवासीयांनों, काय विलक्षण प्रवास आहे. 41 वर्षानंतर पुन्हा अंतराळात. हा रोमांचक अनुभव आहे. अंतराळवीराच्या माझ्या पोशाखावर भारताचा तिरंगा ध्वज आहे. तो मला सतत आठवण करु देत आहे की, मी तमाम भारतीयांपैकी एक आहे. माझ्या देशातील 1.4 अब्ज लोकांचा पाठिंबा मला मिळतो. माझ्या माध्यमातून तुम्हीसुद्धा या प्रवासाचा आनंद घ्या.

शुभांशू पायलट म्हणून ॲक्सिऑम-4 मोहिमेत सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत क्रू मेंबर कमांडर पेगी व्हिटसन (अमेरिका), स्लावोश उज्नांस्की-विश्निव्स्की (पोलंड) आणि टिबोर कपू (हंगरी) आहे. शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे जात आहे. त्यांचा प्रवासाचा अनुभव संपूर्ण भारताला अभिमानास्पद वाटत आहे. एक्सवरील @Axiom_Space वरील एका पोस्टमध्ये, त्यांनी सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात तरंगण्याचा अनुभव सांगितला. तसेच अंतराळातून पृथ्वीचे सौंदर्य पाहण्याची मजा शेअर केली. शुभांशू म्हणाला की, हा माझा प्रवास नाही. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात आहे.

अंतराळातून पृथ्वी कशी दिसली

शुभांशू यांनी म्हटले की, अंतराळ प्रवास माझ्यासाठी स्वप्नासारखे आहे. अंतराळात उड्डानानंतर जेव्हा मी पृथ्वीकडे पाहिले तेव्हा वाटले, एखाद्या चित्रकाराने निळा आणि हिरवा रंग मिळून कॅनवास तयार केला आहे. मायक्रोग्रॅव्हीटीमध्ये जाणे मजेशीर अनुभव आहे. लॉन्चच्या दहा मिनिटांत ड्रॅगन यान रॉकेटपासून वेगळा झाला. त्यावेळी खिडकीतून मी सूर्याचे तेज आणि तारे पाहिले. हे सर्व माझ्यासाठी अविश्वसनीय होते. मी माझ्या क्रू मेंबरसोबत हसलो, विनोद केले. काही योगासनेही केली. स्ट्रॉने पाण्याचे पाउच पिणे थोडे कठीण आहे. पण ते देखील मजेदार आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा