लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई नको, ‘या’ कारणांमुळे आदर पुनावाला यांची सरकारकडे मागणी

| Updated on: Dec 19, 2020 | 10:48 PM

लस दिल्यानंतर विपरित परिणाम झाला, तर लस निर्माण करणाऱ्या कंपनीला जबाबदार धरू नये, अशी मागणी आदर पुनावाला केली. (Adar Poonawalla corona vaccine)

लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई नको, या कारणांमुळे आदर पुनावाला यांची सरकारकडे मागणी
Follow us on

नवी दिल्ली : जगभरात कोरोना लस तयार करण्याचे काम युद्धपातळीवर काम सुरु आहे. भारत देशातही सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक अशा कंपन्यांकडून लस विकसित करण्यात येत आहे. मात्र, कोरोना  लसीमुळे साईड ईफेक्ट झाल्याच्या घटना ब्रिटन, अमेरिकासारख्या देशात घडल्या आहेत. त्यामुळे भारतात कुणालाही लस दिल्यानंतर विपरित परिणाम झाला, तर लस निर्माण करणाऱ्या कंपनीला जबाबदार धरू नये, अशी मागणी सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी केली. ते एका व्हर्च्यूअल चर्चेत बोलत होते. sirum CEO Adar Poonawalla said government should have protect corona vaccine maker companies)

पुनावाला म्हणाले, “एखाद्या  रुग्णाला किंवा नागरिकाला कोरोना लस दिल्यास त्याच्यावर काही वाईट परिणाम झाले तर लस निर्माण करणाऱ्या कंपनीला जबाबदार धरू नये. अशा प्रकरणांत लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांविरोधात कोणताही गुन्हा दाखल करु नये. त्यासाठी सरकारने कायदा करावा,” असे पुनावाला म्हणाले. तसेच, यावेळी बोलताना, लस निर्माण करणाऱ्या कंपन्या जर अशा प्रकरणांत अडकल्या तर त्या अडचणीत सापडू शकतात, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

सरकारसमोर प्रस्ताव ठेवणार

या मागणीबाबत बोलताना, कंपन्यांना संरक्षण देणारा कायदा करण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर करणार असल्याचेही सूतोवाच पुनावाला यांनी केले.  “सध्या कोरोना महारामी सुरु आहे. एखाद्या कंपनीवर साईड ईफेक्टचा खटला दाखल झाला, तर सामान्य नागरिक घाबरतील. लस घेण्याबाबत त्यांची द्विधा मनस्थिती निर्माण होईल. त्यामुळे कोणतीही कंपनी आपले पूर्ण लक्ष लस निर्मितीकडे देऊ शकणार नाही. त्यामुळे कंपन्यांना संरक्षण देणारा हा कायदा करणे गरजेचे आहे,” असे पुनावाला म्हणाले. तसा प्रस्तावही ते सरकारसमोर सादर करणार असल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या :

दोस्त पुन्हा मदतीला आला, पुढच्या वर्षी 30 कोटी लस देणार?

ज्याला मेसेज येणार, त्यालाच कोरोनाची लस मिळणार, टोपेंकडून मायक्रो प्लॅनिंगची माहिती

मेड इन इंडिया, नो साईड इफेक्ट, Covaxin रामबाण ठरणार?

(sirum CEO Adar Poonawalla said government should have protect corona vaccine maker companies)