ज्याला मेसेज येणार, त्यालाच कोरोनाची लस मिळणार, टोपेंकडून मायक्रो प्लॅनिंगची माहिती

आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी कोरोना लसीबाबत (Corona vaccine update) महत्त्वाची माहिती दिली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:19 PM, 17 Dec 2020
ज्याला मेसेज येणार, त्यालाच कोरोनाची लस मिळणार, टोपेंकडून मायक्रो प्लॅनिंगची माहिती

मुंबई : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी कोरोना लसीबाबत (Corona vaccine update) महत्त्वाची माहिती दिली. “केंद्र सरकार कोरोना लसीबाबत मायक्रो प्लॅनिंग करत आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे, ज्या तारखेला लस द्यायची आहे, त्या व्यक्तीला मेसेज केला जाईल. त्यानंतर तो येईल. त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देण्यात येईल” असं राजेश टोपे म्हणाले. (Health Minister Rajesh Tope explained detail planning about corona vaccine distribution)

लस देण्याबाबत केंद्र सरकार माहिती मागवत आहे. हेल्थ वर्कर्सचा डेटा, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, 50 वर्षांवरील नागरिक, शिवाय इतर आजार असलेले 50 वर्षाखालील असा सगळा डेटा तयार करत आहोत, असं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.

ज्याला मेसेज, त्यालाच लस

18 हजार लोकांना ट्रेनिंग द्यायचं काम आता पूर्ण होईल. स्टोरेजसाठी कोल्डचेन व्यवस्था झाली आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायचे आहे, त्या व्यक्तीला मेसेज मिळेल, तो येणार,त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देणार, असं मायक्रो प्लॅनिंग सुरु असल्याचं टोपे म्हणाले.

उत्तर प्रदेशात मेडिकल स्टाफच्या सुट्ट्या रद्द केल्या. पण आपल्याला तसं काही करायची गरज नाही. मनुष्यबळ उपलब्ध आहे. गरज पडली तर सुट्टी रद्द होईल, असंही टोपेंनी सांगितलं.

…तर जानेवारीपासून लसीकरण

लस केंद्र सरकार पुरवेल अशी माझी खात्री आहे. जी कामं राज्य सरकारनं करायची आहेत ती आम्ही करत आहोत. लॉजिस्टिक,डेटा सगळं आम्ही करत आहोत. लसीकरणाच्या परिणामाबाबत एक युनिट तयार केलं आहे. साधारण दोन कंपन्या सिरम आणि भारत बायोटेक यांनी लसीबाबत केंद्राकडे परवानगी मागितली आहे. आता केंद्राला निर्णय घ्यायचा आहे. लसीकरण कार्यक्रमासाठी आम्ही तयार आहोत. डिसेंबर शेवटपर्यंत केंद्राने परवानगी दिली तर जानेवारीपासून लसीकरण सुरु होईल पण केंद्राने परवानगी दिली तर, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

(Health Minister Rajesh Tope explained detail planning about corona vaccine distribution)

संबंधित बातम्या 

Rajesh Tope | कोरोना लसीकरणाचा खर्च केंद्राने स्विकारावा:राजेश टोपे   

Reduce Corona Test Rate | कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये सहाव्यांदा कपात, पाहा नवीन चाचणीचे दर…