दोस्त पुन्हा मदतीला आला, पुढच्या वर्षी 30 कोटी लस देणार?

कोरोना लसीबाबत रशियाने मोठी घोषणा केली आहे (Russia will produce 300 million Sputnik V Corona Vaccine in India)

दोस्त पुन्हा मदतीला आला, पुढच्या वर्षी 30 कोटी लस देणार?

मॉस्को : कोरोना लसीबाबत रशियाने मोठी घोषणा केली आहे. रशियात स्पुटनिक व्ही या लसीचं लसीकरण सुरु झालं आहे. भारतातही लवकरच कोरोना लसीचं लसीकरण सुरु होण्याची शक्यात आहे. यासाठी काही लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यतादेखील देण्यात येणार असल्याचे संकेत केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, भारतातही 2021 मध्ये रशियाच्या कोरोना लसीचं उत्पादन केलं जाईल, अशी घोषणा रशियाकडून करण्यात आली आहे (Russia will produce 300 million Sputnik V Corona Vaccine in India).

रशियन डॉयरेक्ट इन्वेस्टमेंट फंडचे प्रमुख किरील दिमत्रेव यांनी याबाबत माहिती दिली. “भारतात स्पुटनिक व्ही लसीचे 2021 सालात जवळपास 30 कोटी लसींचे उत्पादन करण्यात येईल. यासाठी भारतातील चार प्रमुख लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांसोबत बोलणं झालं आहे”, असं किरील यांनी सांगितलं.

स्पुटनिक व्ही लस 91 टक्के प्रभावी, रशियाचा दावा

रशियाची कोरोना लस स्पुटनिक व्ही ही कोरोनावर 91.5 टक्के प्रभावी असल्याचा दावा लस निर्मिती कंपनीने केला आहे. लसीच्या चाचणीच्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर लस 91.5 टक्के प्रभावी असल्याचं समोर आलं आहे, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. पहिल्यांदा केलेल्या चाचणीत लस 92 टक्के प्रभावी दिसली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील चाचणीत लस 91.4 टक्के प्रभावी असल्याचं समोर आलं (Russia will produce 300 million Sputnik V Corona Vaccine in India).

‘कोरोनाबाधित रुग्णांना 100 टक्के बरे करणार’

गामलेया रिसर्च सेंटर फॉर अॅपिडायमोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी या कंपनीने स्पुटनिक व्ही या कोरोना लसीची निर्मिती केली आहे. ही लस कोरोनाबाधित रुग्णांना शंभर टक्के बरे करणार, असा दावा कंपनीने केला आहे. या लसीच्या चाचणीचा संपूर्ण अहवाल लवकरच एका प्रतिष्ठित सायन्स जनरलमध्ये प्रकाशित करण्यात येईल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

स्पुटनिक व्ही लस कसं काम करते?

रशियाची कोरोना लस ही सर्वसामान्य सर्दी, तापाला कारण असाणाऱ्या Adenovirus वर आधारित आहे. या लसीला कृत्रिमरित्या तयार करण्यात आलं आहे. ही लस कोरोना विषाणूमधील स्ट्रक्चरल प्रोटीनची नक्कल करते. याचा अर्थ असा की, ही लस टोलच्यानंतर मानवी शरीर त्याचप्रकारे प्रतिक्रिया देते ज्याप्रकारे कोरोना विषाणूला प्रतिक्रिया देते. मात्र, कोरोनासारखा जीवघेणा त्रास होत नाही. या लसीचे मॉस्कोच्या सेशेनॉ युनिव्हर्सिटीमध्ये 18 जून रोजी चाचणी सुरु झाली होती. एकूण 38 स्वयंसेवकांवर या लसीची चाचणी करण्यात आली. या चाचणीत ही लस सुरक्षित असल्याची माहिती समोर आली.

हेही वाचा :

ज्याला मेसेज येणार, त्यालाच कोरोनाची लस मिळणार, टोपेंकडून मायक्रो प्लॅनिंगची माहिती

मेड इन इंडिया, नो साईड इफेक्ट, Covaxin रामबाण ठरणार?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI