AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना लसीकरणाआधीच लोकांमध्ये भीतीचं आणि अविश्वासाचं वातावरण, ‘ही’ आहेत तीन कारणं

लवकरच कोरोनाची लस बाजारात येणार आहे. असं असलं तरी लोक ही लस घेतील की नाही याबाबत आता शंका निर्माण व्हायला सुरुवात झाली.

कोरोना लसीकरणाआधीच लोकांमध्ये भीतीचं आणि अविश्वासाचं वातावरण, 'ही' आहेत तीन कारणं
कोरोना लस प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Dec 18, 2020 | 5:51 PM
Share

मुंबई : ज्या कोरोनानं जगाला वेठीस धरलं, ज्या कोरोनामुळं अनेकांनी आपल्या जवळच्यांना गमावलं, ज्या कोरोनानं अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, ज्या कोरोनानं अनेकांचे उद्योगधंदे बंद पडले आणि ज्या कोरोनानं जग थांबवलं तो कोरोना आता अंताकडे वाटचाल करतोय. लवकरच कोरोनाची लस बाजारात येणार आहे. असं असलं तरी लोक ही लस घेतील की नाही याबाबत आता शंका निर्माण व्हायला सुरुवात झाली. याची अनेक कारणं आहे, हीच कारणं आज आपण समजून घेणार आहोत (Three main reasons behind fair of people about Corona Vaccination).

ऑक्सफर्डची कोविशिल्ड आणि फायझरची लस अंतिम टप्प्यात यशस्वी ठरलीय. जगभरात या लसी देण्यास अनेक सरकारांनी मान्यताही दिलीय. भारत सरकारही लवकरच लसीकरण मोहिम राबवण्याच्या विचारात आहे. यासाठी निवडणुकांच्या धर्तीवर महालसीकरण मोहिम सुरु केली जाणार आहे. मात्र, या लसीकरण मोहिमेच्या आधीच लोकांमधून अनेक प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालीय. लोक भीतीही व्यक्त करत आहेत. यामागे प्रमुख 3 कारणं दिसत आहेत.

1. कोरोनाची लोकांच्या मनातून संपलेली भीती

कोरोनाचा प्रभाव पहिल्या काही महिन्यात जसा होता, तसा तो आता राहिलेला दिसत नाही. कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड घट झालीय. शिवाय, जे लोक कोरोनातून बरे झालेत, तेही आता निर्धास्त झाले आहेत. मास्क आणि सॅनिटायझर अनेकांच्या आयुष्याचा भाग झालाय. त्यामुळं लसीपेक्षा प्रतिबंध चांगला असं मानणारेही अनेक लोक आहेत. त्यामुळं लसीबद्दलची जी उत्सुकता पहिल्या काही महिन्यात होती ती आता दिसत नाही.

2. लसींच्या साईड इफेक्टच्या बातम्या

जगभरात कोरोना लसींवर मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे. यातच अनेक स्वयंसेवकांना कोरोनाची लस दिली गेलीय. मात्र, या लसींचे अनेक दुष्परिणाम झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर अनेक संस्थांनी लसनिर्मिती थांबवली. ऑस्ट्रेलियात तर कोरोना लस दिल्यानंतर एचआयव्हीची लक्षणं दिसण्यास सुरुवात झाली. मात्र, प्रत्यक्षात स्वयंसेवकांना एचआयव्ही नव्हता. यानंतर ऑस्ट्रेलियन सरकारनं ही मोहिम तातडीनं थांबवली. अशा बातम्यांमुळं लोकांमध्ये कोरोना लसीबद्दल भीती तयार झालेली पाहायला मिळते आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर असं होऊ नये ही काळजी अनेकांना असल्यानं कोरोना लस घेण्यास अनेकजण उत्सुक दिसत नाहीत.

3. कोरोनाला गृहित धरणं

कोरोनाचं महाभयानक संकट येऊन गेल्यानंतरही अनेक लोकांवर त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. मास्क न लावणं, बाजारात गर्दी करणं, नेहमीप्रमाणं सर्वत्र फिरणं आताही सुरु असलेलं पाहायला मिळतं. कोरोना संकट डोक्यावर घोंगावत असतानाही अनेक समारंभ, लग्नसोहळे आणि धार्मिक कार्यक्रम अनेकांनी आयोजित केले. अशा लोकांना लस येवो किंवा न येवो याचं काहीही पडलेलं दिसत नाही.

कोविड योद्ध्याकडूनही कोरोना लसीबाबत निरुत्साह

गेल्या 8 महिन्यांपासून कोरोना रुग्णाच्या अत्यंत जवळ काम करणाऱ्यांमध्ये आरोग्य सेवक, कर्मचारी, डॉक्टर्स आणि परिचारिका यांचा समावेश आहे. कोरोनाच्या लसीकरणात या सर्वांना पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे. मात्र कोरोनाविषयी या लोकांपैकी अनेकांच्या मनातील भीती संपलेली पाहायला मिळतेय. अनेकजण कोरोनासोबत जगायला शिकले आहेत. त्यामुळं लस जरी आली किंवा नाही आली तरी हे योद्धे अविरतपणे काम करत राहण्यास शिकले आहेत. त्यामुळं यातील अनेकजण लसीबद्दल निरुत्साह दाखवत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अफवा दूर करण्याचं आवाहन

लसीबद्दल पसरवण्यात येणाऱ्या अफवामुळे लसीकरणं मोहिमेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून देशातील प्रत्येकाला लस देण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय. त्यासाठी सरकार कंपन्यांकडून लस विकत घेणार आहे. यासाठी मोठा निधी लागणार आहे. शिवाय, महालसीकरण मोहिमेत सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण येणार आहे. मात्र, सध्या लोकांमध्ये लसींबद्दलच्या अफवा पसरताना दिसताहेत. याचा थेट परिणाम लसीकरण मोहिमेवर झाल्यास, अनेक लोक लसीकरणापासून वंचित राहू शकतात. हेच पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांना या अफवा दूर करण्याचं आवाहन केलंय.

कोरोनावर लस हीच रामबाण उपाय आहे असं अनेक तज्ज्ञांनी सांगितलंय. कोरोना सध्या शांत झाला असला तरी त्याची पुढची लाट कशी असेल हे कुणालाही माहिती नाही. त्यामुळं लसीबद्दलच्या अफवा दूर करुन लसीकरणात मोठ्या प्रमाणात सहभागी होणं गरजेचंय. कारण हीच लस मानवजातीला वाचवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा :

दोस्त पुन्हा मदतीला आला, पुढच्या वर्षी 30 कोटी लस देणार?

ज्याला मेसेज येणार, त्यालाच कोरोनाची लस मिळणार, टोपेंकडून मायक्रो प्लॅनिंगची माहिती

मेड इन इंडिया, नो साईड इफेक्ट, Covaxin रामबाण ठरणार?

Three main reasons behind fair of people about Corona Vaccination

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.