AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्पदंशाबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, सर्व राज्यांना केले अपिल…

केंद्र सरकारने सर्पदंशाने होणारे मृत्यू रोखण्यासाठी त्यासंदर्भात राज्य सरकारना आदेश दिले आहेत. दरवर्षी भारतात सर्पदंशाने पन्नास हजार लोकांचा मृत्यू होत असतो. वाढत्या सर्पदंशाच्या घटनांमुळे केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे.

सर्पदंशाबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, सर्व राज्यांना केले अपिल...
| Updated on: Nov 30, 2024 | 6:02 PM
Share

सर्पदंशा संदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी संर्पदंशाबाबत सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र पाठविले आहे. सर्पदंशाच्या घटना सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भात चिंतेचे कारण बनले आहे. काही प्रकरणात मृत्यू, काही प्रकरणात अपंगत्व येण्याचा देखील धोकाही असतो त्यामुळे केंद्र सरकारने सर्पदंशाबाबत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे.

केंद्राचे राज्याला पत्र

राज्याचा सार्वजनिक आरोग्य कायदा किंवा इतर मान्यताप्राप्त कायद्यांच्या संबंधित तरतुदींनुसार सर्पदंशाची नोंद करुन केंद्राला लेखी कळविण्यायोग्य आजार अशी करावी असे म्हटले आहे. म्हणजे सर्पदंशाची आकडेवारी केंद्राला दिली जाणार आहे. म्हणजे सर्व सर्व सरकारी आणि खाजगी आरोग्य सुविधांनी (वैद्यकीय महाविद्यालयांसह) सर्पदंशाची माहिती केंद्र सरकारला दिली पाहिजे. प्रत्येक संशयित, संभाव्य केस आणि झालेले मृत्यूची याची आकडेवारी कळविणे बंधनकारक केले आहे.सर्पदंशाचा सर्वाधिक धोका शेतकरी आणि आदिवासी लोकसंख्येला असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

केंद्र सरकारची योजना

सर्पदंशाच्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक मोठे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने भारतात २०३० पर्यंत सर्पदंशाची प्रकरणांवर अंकुश आणण्यासाठी राष्ट्रीय योजना लागू केली आहे. या योजनेनुसार सर्पदंशामुळे होणारी मृत्यूची प्रकरणे साल २०३० पर्यंत निम्मी करण्याचे धैय्य आहे.

भारतात ५० हजार मृत्यू

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकड्यांनुसार दर वर्षी जगभर सर्पदंशाची ५४ लाख घटना घडतात. एकट्या आशिात दरवर्षी साप चावल्याने आणि विष दिल्याची २० लाख प्रकरणे घडतात. तर बांग्लादेश, भारत, नेपाळ,पाकिस्तान आणि श्रीलंकामध्ये जगभरात होणाऱ्या एकूण सर्पदंशाच्या मृत्यूपैकी ७० टक्के घटना घडतात. भारतात दरवर्षी ५० हजार लोकांचा सर्पदंशाने मृत्यू होतो. भारत में होती हैं 50 हजार मौतें

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी