लाहोरमध्ये मोठं काही तरी घडणार! अमेरिकेने थेट आपल्या नागरिकांना इशारा देत सांगितलं की…
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाचं कायमचं कंबरडं मोडण्याचा निश्चय केला आहे. यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने युद्धाची धमकी दिली आहे. दोन्ही देशात तणावपूर्ण स्थिती आहे. असं असताना अमेरिकेने आधीच धोका ओळखला आहे.

पाकिस्तान हे दहशतवाद्यांचं सर्वात सुरक्षित ठिकाण मानलं जातं. या ठिकाणी जगभरातील दहशतवादी कृत्याचा कट रचला जातो. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कटही पाकिस्तानतच रचला गेला. याचे भक्कम पुरावे भारताच्या हाती असून संपूर्ण जगासमोर मांडले आहेत. यानंतर भारताने या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा निश्चय केला आहे. 15 दिवसानंतर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा करण्यात येत आहे. यानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली असून भारतावर प्रतिहल्ला करू अशी धमकी दिली आहे. भारतीय सैन्यदलही सज्ज असून प्रत्येक हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्यास तयार आहे. गुरुवारी मध्यरात्री पाकिस्तानने भारतातील काही शहरांवर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सैन्य दलाने हा हल्ला निष्फळ ठरवला. दोन्ही देशातील तणावपूर्ण स्थिती पाहता अमेरिकेने पाकिस्तानातील आपल्या नागरिकांना सूचना दिल्या आहे. अमेरिकेने लाहोरसहीत संपूर्ण पाकिस्ताना जिथे कुठे अमेरिकन नागरिक असतील त्यांना परत येण्याचे आदेश दिले आहेत.
अमेरिकन दूतावासाने पाकिस्तानमधील आपल्या नागरिकांना ही तातडीची सूचना दिली आहे. यामुळे लाहोर किंवा इतर शहरांमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लाहोरच्या मुख्य विमानतळाशेजारील काही भाग अधिकारी रिकामे करू शकतात अशी माहिती दूतावासाला मिळाली आहे. त्याच वेळी अमेरिकेने आपल्या नागरिकांना सांगितले आहे की जर लाहोर सुरक्षितपणे सोडणे शक्य असेल तर त्यांनी तेथून निघून जा, अन्यथा सुरक्षित ठिकाणी रहावे. अमेरिकेने नागरिकांना या सूचना दिल्याने काहीतरी मोठं घडणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण पुढे काय पाऊल उचललं जाईल हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. जर स्थिती नियंत्रणात असती तर अमेरिकेने नागरिकांना परतण्याचा सूचना दिल्या नसत्या.
अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज यासह काही ठिकाणी पाकिस्तानने ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताने पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर त्यांची रडार सिस्टमवर हल्ला चढवला. आता पाकिस्तान पूर्णपणे बॅकफूटवर आला आहे.