AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5100 रुपये पाठवले, वडिलांचा अंत्यसंस्काराचा Video पाठवून द्या म्हणणाऱ्या मुली बापाच्या तेराव्यालाही गैरहजर, शेवटी…

5100 रुपये पाठवले आहेत वडिलांचा अंत्यसंस्काराचा व्हिडीओ पाठवून द्या म्हणणाऱ्या तिन्ही मुली वडिलांच्या तेराव्यालाही गेल्या नाहीत. शेवटी वृद्धाश्रमातील लोकांना पार पाडली जबाबदारी.

5100 रुपये पाठवले, वडिलांचा अंत्यसंस्काराचा Video पाठवून द्या म्हणणाऱ्या मुली बापाच्या तेराव्यालाही गैरहजर, शेवटी...
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 16, 2026 | 5:10 PM
Share

हरियाणातील सोनीपत येथे वृद्धाश्रमात राहणारे कपड्यांचे व्यापारी शिवचरण राम रतन गुप्ता यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाची कहाणी चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी शिवचरण गुप्ता यांचं निधन झालं होतं. त्यांच्या अंत्यसंस्काराला त्यांच्या तीनही मुली उपस्थित राहिल्या नव्हत्या. आता त्यांच्या तेराव्याच्या विधीलाही मुली सहभागी झाल्या नसल्याचं समोर आलं आहे.

सोनीपत येथील गीता मंदिरात शिवचरण गुप्ता यांच्या तेरावीचा कार्यक्रम पार पडला. हिंदू रितीरिवाजानुसार हवन-यज्ञ करण्यात आला. त्यांच्या फोटोला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला सामाजिक संस्थांशी संबंधित व्यक्ती आणि स्थानिक नेते उपस्थित होते. उपस्थितांसाठी प्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

मात्र, या संपूर्ण कार्यक्रमात शिवचरण यांच्या कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित नव्हता. विशेष म्हणजे त्यांच्या तीनही मुली तेराव्याच्या विधीलाही आल्या नाहीत. अंत्यसंस्काराच्या वेळी मुलींनी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला होता. त्यानंतर अस्थिविसर्जनाच्या वेळीही व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधण्यात आला होता. आता तेराव्याच्या कार्यक्रमापासूनही त्या दूर राहिल्या.

मुलींनी आधीच येण्यास नकार दिला होता

वृद्धाश्रमाचे संचालक आनंद कुमार यांनी सांगितलं की, शिवचरण गुप्ता यांच्यावर हिंदू पद्धतीनुसार सर्व अंतिम विधी पूर्ण करण्यात आले. मुलींशी संपर्क झाला होता आणि त्यांनी तेराव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नसल्याचं आधीच सांगितलं होतं. त्यामुळे वृद्धाश्रम व्यवस्थापन आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून अंतिम विधी पार पाडले.

शिवचरण यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलींची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, त्यांच्या मोठ्या मुलीने यापूर्वी वडिलांवर प्रेम असल्याचं सांगितलं होतं. काही कौटुंबिक अडचणींमुळे त्या अंतिम विधींना उपस्थित राहू शकल्या नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

भावालाही दहा वर्षे भावाच्या जिवंत असल्याची माहिती नव्हती

शिवचरण गुप्ता यांच्या निधनानंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. त्यांचे मोठे भाऊ महेंद्र गुप्ता यांनाही जवळपास दहा वर्षांपासून शिवचरण जिवंत असल्याची माहिती नव्हती. नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाच्या काळात त्यांनी शिवचरण यांचा मृत्यू झाल्याचं गृहीत धरलं होतं.

नंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवचरण जिवंत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महेंद्र गुप्ता सोनीपतला पोहोचले. शिवचरण यांच्या निधनानंतर त्यांनी हरिद्वार येथे त्यांच्या अस्थींचं विसर्जन केलं. अशाप्रकारे मुलींच्या अनुपस्थितीत त्यांच्या भावाने आणि समाजसेवकांनी मिळून अंत्यसंस्कारापासून अस्थिविसर्जनापर्यंतच्या विधींची जबाबदारी पार पाडली.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच