AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : पावसाच्या व्यत्ययानंतर श्रीलंकन फिरकीची जादू चालली! भारताच्या धडाधड विकेट

भारत श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्याचा दुसरा दिवस सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या सत्रात पावसाचा व्यत्यय आल्याने लंच ब्रेकपर्यंत एकही चेंडू टाकला नाही. पण त्यानंतर सामना सुरू झाला आणि भारताच्या विकेट्स धडाधड पडल्या.

IND vs SL : पावसाच्या व्यत्ययानंतर श्रीलंकन फिरकीची जादू चालली! भारताच्या धडाधड विकेट
IND vs SL : पावसाच्या व्यत्ययानंतर श्रीलंकन फिरकीची जादू चालली! भारताच्या धडाधड विकेटImage Credit source: Sri Lanka Cricket Twitter
| Updated on: Aug 16, 2026 | 4:56 PM
Share

भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना गॉल आंतरराष्ट्रीय मैदानात सुरू आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि पहिल्या दिवसावर अधिराज्य गाजवलं. पण दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आणि भारताचं नशिब फुटकं निघालं. लंच ब्रेकपर्यंत एकही चेंडू टाकला गेला नाही. पण त्यानंतर सामना सुरू झाला आणि भारताच्या धावगतीला ब्रेक लागला. फिरकीच्या जोरावर भारताच्या धडाधड विकेट पडल्या. त्यामुळे पावसानंतर खेळपट्टी फिरकीला मदत करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. कारण सेट झालेल्या फलंदाजांनाही श्रीलंकन फिरकीचा सामना करणं कठीण गेलं. भारताच्या धडाधड चार विकेट पडल्या. या चारही विकेट फिरकीच्या जोरावर श्रीलंकेला मिळाल्या. त्यामुळे खेळपट्टी पूर्णपणे फिरकीला मदत करत असल्याचं दिसत आहे. फिरकीचा सामना करताना अडचण येत असल्याने भारताच्या धावगतीलाही ब्रेक बसला आहे.  खरं तर दुसऱ्या दिवशी 500 पार धावा अपेक्षित होत्या, पण पावसामुळे आणि फिरकीच्या जादूमुळे गणित चुकलं असंच म्हणावं लागेल.

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा काय झालं?

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या 288 धावांवर दोन विकेट होत्या. तर देवदत्त पडिक्कल नाबाद 131 धावांवर होता, तर ऋषभ पंत नाबाद 27 धावांवर खेळत होता. लंच ब्रेकनंतर पाऊस निवळला आणि सामन्याला सुरूवात झाली. त्यानंतर पहिली विकेट ऋषभ पंतच्या रुपाने मिळाली. 39 धावांवर असताना केशारा नुवांथाच्या गोलंदाजीवर बाद झाला. रिटायर्ड हर्ट झालेला केएल राहुल पुन्हा फलंदाजीला आला आणि 82 धावांवर केशाराने त्याला तंबूत पाठवलं. त्यानंतर देवदत्त पडिक्कल 167 धावांवर असताना प्रभात जयसूर्याचा शिकार ठरला.

शेपटाचा फलंदाजांकडून अपेक्षा वाढली

खेळपट्टीवर जम बसवलेले फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर टीम इंडिया अडचणीत आली. ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांच्यावर डाव सावरण्याची वेळ आली. पण 13 धावांवर असताना रवींद्र जडेजा नुवांथाचा बळी ठरला. त्यामुळे खेळपट्टी पूर्णपणे फिरकीच्या बाजूने वळली असल्याचं दिसत आहे. आता सावधपणे खेळण्याची जबाबदारी भारतीय फलंदाजांवर आहे.  तर श्रीलंकेचं या सामन्यात कमबॅक झालं आहे. इतकंच काय तर भारतीय फिरकीपटूंची जबाबदारी वाढली आहे.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर