सणासुदीसाठी दक्षिण – मध्य रेल्वेची विशेष उपाय योजना, विषेश गाड्यांसह नियमित गाड्यांना जादा डबे
सणासुदीची गर्दी पाहून प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण - मध्य रेल्वेची विशेष उपाय योजना केली आहे. यावेळी विशेष गाड्या चालवण्यात येणार असून नियमित गाड्यांना जादा डबे जोडले जाणार आहेत.

दसरा पाठोपाठ दिवाळी आणि नाताळ अशा सणांना रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी पाहून दक्षिण – मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे गाड्यांची सोय केली आहे. त्यामुळे या सणाच्या हंगामात रेल्वे गाड्यातून जाणाऱ्या प्रवाशांना सोयी आणि सुविधा मिळणार आहेत. दसरा सण आणि महिनाभरातील सणांच्या हंगामातील गर्दी लक्षात घेऊन केंद्र सरकारने रेल्वे गाड्या वाढवून ही गर्दी कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. सिंकदराबाद येथील भाजपाचे खासदार आणि केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.
सणांचा आणि सुट्ट्यांचा हंगाम म्हणजे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण – मध्य रेल्वेने विशेष रेल्वे गाड्यांची सोय केली आहे. सणांचा हंगाम म्हणजे बरेच लोक त्यांच्या कुटुंबियांसोबत बाहेरगावी जात असतात.त्यामुळे रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी होत असते.त्यातच दसरा, पाठोपाठ दिवाळी आणि नाताळ असे एकामागोमाग सण आणि हिवाळी सुट्ट्या आल्याने रेल्वे गाड्यांना प्रचंड मागणी आहे.त्याकाळात प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण – मध्य रेल्वेने विशेष तयारी केली आहे.
दसरा सण आणि महिनाभरातील सणांच्या हंगामातील गर्दी लक्षात घेऊन, भारतीय रेल्वेने रेल्वे सेवा वाढवून ही गर्दी कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.विशेषतः दक्षिण मध्य रेल्वेने या सणांच्या हंगामासाठी मोठी तयारी केली आहे. सणाच्या हंगामातील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे.
अशी आहे जादा गाड्यांची व्यवस्था
* १,४५० विशेष गाड्या
* आणखी ५०० पासिंग-थ्रू विशेष गाड्या चालवणार
* लोकप्रिय मार्गांवर सुमारे ३५० नियमित गाड्यांना अतिरिक्त कोच जोडण्यात येणार आहेत.
भाजपाचे खासदार आणि केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी या संदर्भात सोशल साईट एक्सवर पोस्ट करुन प्रवाशांसाठी माहिती दिलेली आहे. ती पोस्ट खालील प्रमाणे आहे.
येथे पाहा पोस्ट –
The festival season is when a lot of people wish to spend time with their families.
Keeping in mind the Dusshera festival and the festive season rush throughout the month, the Government of India is taking several steps to cater to this rush by augmenting train services.
The… pic.twitter.com/vUAjcHHNqm
— G Kishan Reddy (@kishanreddybjp) October 1, 2025
सिकंदराबाद स्थानकावर दररोज १.३ लाखांहून अधिक प्रवासी येजा करत असतात.आता येथे दोन लाखाहून अधिक प्रवासी येण्याची शक्यता असून त्यासाठी चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी सिकंदराबाद स्थानकावर प्रवासी होल्डींग क्षेत्रे उभारली जात आहेत. येथे प्रवाशांना त्यांची गाडी येईपर्यंत विनासायास येथे उभे रहाता येईल. रेल्वेचे हे उपाय नोव्हेंबरच्या अखेरीपर्यंत लागू राहणार आहेत. .
