AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली आणि…; विमान धडकलेल्या हॉस्टेलमधील मुलाच्या आईची प्रतिक्रिया

सध्या सोशल मीडियावर मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमधील मुलांच्या आईचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नेमकं त्यांचा मुलगा कसा वाचला हे त्या सांगताना दिसत आहेत.

माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली आणि...; विमान धडकलेल्या हॉस्टेलमधील मुलाच्या आईची प्रतिक्रिया
Plane Crash Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 12, 2025 | 7:38 PM
Share

अहमदाबाद येथे गुरुवारी (12 जून 2025) दुपारी एअर इंडियाचे विमान AI-171चा अपघात झाला. लंडनला जाणाऱ्या या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण 242 प्रवासी होते. हे विमान मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला जाऊन धडकले. गुजरातच्या सिव्हिल रुग्णालयात पोहोचलेल्या रमिलाबेन नावाच्या महिलेने सांगितले की, तिचा मुलगा जेवणाच्या सुट्टीसाठी गेला होता. त्या म्हणाल्या, “माझ्या मुलाला काही झाले नाही. त्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली.”

‘मला माझ्या मुलाला आत जाऊन पाहायचे आहे’

हा अपघात अहमदाबादमधील डॉक्टर्स हॉस्टेलवर घडला. न्यूज एजन्सी ANI शी बोलताना रमिलाबेन म्हणाल्या, “विमान हॉस्टेलवरच कोसळले. माझ्या मुलाला काही झाले नाही. त्याच्याशी माझे बोलणे झाले आहे. मला आत जाऊन त्याला पाहायचे आहे. तो म्हणाला की तो ठीक आहे, पण दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने त्याला किरकोळ जखम झाली आहे. मी आत गेले तरच खरे काय ते कळेल.”

वाचा: इंजिन खराब की इमारतीला धडकलं?; 242 प्रवाशी घेऊन निघताच 15 मिनिटात कसं झालं विमान क्रॅश?

169 भारतीय प्रवासी होते

ज्या डॉक्टर्स हॉस्टेलवर विमान कोसळले, तिथेही मोठ्या नुकसानाची शक्यता आहे. परंतु याबाबत अद्याप पुष्टी झालेली नाही. देश-विदेशातील नेत्यांनी या अपघाताबद्दल दुखः व्यक्त केले आहे. या विमानात एकूण 242 प्रवाशांपैकी 169 भारतीय होते, तसेच 2 वैमानिक आणि 10 क्रू मेंबर्स होते.

मेघानी नगर परिसरातील हॉस्टेल

विमान कोसळलेली इमारत पूर्णपणे जळून खाक झाली आहे. मेघानी नगर हा परिसर सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाजवळ आहे आणि याच परिसरात हे हॉस्टेल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि हवाई वाहतूक मंत्र्यांशी या प्रकरणी चर्चा केली आहे.

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही होते विमानात

या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही होते, जे आपल्या मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच हा अपघात घडला. बोइंग ड्रीमलाइनर 787 ची प्रवासी क्षमता 300 आहे. वैमानिकाने मेडे (MAYDAY) कॉल केला होता, ज्याचा अर्थ आपत्कालीन परिस्थिती असा होतो.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.