AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृतदेहाला कुणी हातही लावत नव्हतं, लेडी सब इन्स्पेक्टर 2KM पर्यंत खांद्यावर घेऊन चालली, वाचा संपूर्ण बातमी

एका महिला उपनिरीक्षकाने जे काही केलं त्याने सगळ्यांसमोर मानवतेचे आदर्श मांडला आहे.

मृतदेहाला कुणी हातही लावत नव्हतं, लेडी सब इन्स्पेक्टर 2KM पर्यंत खांद्यावर घेऊन चालली, वाचा संपूर्ण बातमी
| Edited By: | Updated on: Feb 02, 2021 | 3:44 PM
Share

हैदराबाद : संकटाच्या काळात देव कसा मदतीला येतो याची अनेक उदाहरणं आणि प्रसंग आपण सगळ्यांनी पाहिले आहेत. असाच एक प्रकार आंध्र प्रदेशात समोर आला आहे. इथे एका महिला उपनिरीक्षकाने जे काही केलं त्याने सगळ्यांसमोर मानवतेचे आदर्श मांडला आहे. ग्रामीण भागात एका मृतदेहावर कोणीही हक्क सांगितला नाही. कोरोनाच्या भीतीमुळे कोणीही मृतदेहाला स्पर्श केलं नाही. अखेर सर्व निरीक्षकांनी एकत्र मृतदेह खांद्यावर घेऊन दोन किलोमीटर प्रवास केला आणि आपल्या हातांनीच त्यावर अंत्यसंस्कार केले. (sub inspector carries dead body on her shoulders for last rites in andhra pradesh)

श्रीकाकुलम जिल्ह्यातील कासीबुग्गा इथं तैनात उपनिरीक्षक के. श्रीशाने केलेल्या या तिच्या कामामुळे सर्वच स्तरावर तिचं कौतुक होत आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. कृष्णा रेड्डी यांनीही तरुण पोलीस अधिकाऱ्यांच्या या अनोख्या कामाचं कौतूक केलं आहे. यावेळी ते म्हणाले की, आपल्या कर्तव्याची जाण ठेवत अज्ञात मृतदेहावर अंत्यसंस्कार करून मदत केल्याने या टीमने देशातील प्रत्येक पोलिसांची मानवी मूल्यं आपल्या मनात पुन्हा जागवली आहेत. या घटनेचा एक व्हीडिओदेखील समोर आला आहे.

आंध्र प्रदेशचे पोलीस प्रमुख डी गौतम सावंग यांनीसुद्धा या तरुण पोलीस अधिकाऱ्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. श्रीकाकुलम जिल्ह्यातील पलासा कासीबुग्गा नगरपालिकेच्या आदिविकोट्टुरू गावात शेतातील लोकांनी एक अज्ञात मृतदेह पाहिला. पण कोणीही त्यावर अंत्यसंस्कार करण्यास तयार नव्हतं.

या घटनेची माहिती पोलीस उपनिरीक्षक श्रीशा यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावात मृतदेह आढल्याने आधीच लोक घाबरले होते. त्यात कोणीही त्याजवळ जाण्यास तयार नाही. हे सगळं पाहिल्यानंतर श्रीशाने ललिता चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीशाने खांद्यावरुन दोन किलोमीटर प्रवास करत मृतदेह गावात नेला आणि स्वत: त्यावर अंत्यसंस्कार केले. (sub inspector carries dead body on her shoulders for last rites in andhra pradesh)

इतर बातम्या – 

गाय म्हैस विकायचीय, विकत घ्यायचीय, मग ही वेबसाईट आहे ना! शेतकऱ्यांनो ट्राय करा!

‘या’ देशात ना लॉकडाऊन, ना सोशल डिस्टन्सिंग, कोरोनाचे सर्व नियमही रद्द, लोकांकडून जल्लोष

Marathi Serial : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत बहरलं गौरी-जयदीपचं नातं

जगातल्या सर्वात मोठ्या हुकूमशहाच्या टॉयलेट सीटचा होणार लिलाव, किंमत वाचून हैराण व्हाल

(sub inspector carries dead body on her shoulders for last rites in andhra pradesh)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.