AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहीण असावी तर अशी ! भावाचा अपमान पाहून भडकली वधू, मंडपातच वराला शिकवला धडा..

उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये वधू आणि वराच्या पक्षात एका छोट्याशा कारणावरून मंडपातच वाद झाला. त्यावेळी रागाच्या रात वराने जे केलं ते पाहून वधू भडकली आणि तिने त्याला माफी मागण्यास सांगितलं, पण वराने माफी मागण्यास नकार दिल्यावर तिथे धाडकन..

बहीण असावी तर अशी ! भावाचा अपमान पाहून भडकली वधू, मंडपातच वराला शिकवला धडा..
भावाचा अपमान पाहून भडकली वधू, मंडपातच वराला शिकवला धडाImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: May 10, 2025 | 1:38 PM
Share

लग्न म्हटलं की रुसवे फुगवे आलेच. एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून नातेवाईक लगेच तोंड फुगवून बसतात. पण काही वेळा एखादा मुद्दा असा तापतो आणि वाढतो, की लोकं हमरीतुमरीवर येतात, कधीकधी तर लग्नचं मोडू शकतं. उत्तर प्रदेशमध्येही किरकोळ वादातून असंच काहीस झालं. तेथे एका छोट्याशा मुद्यावरून भडकलेल्या वराने होणाऱ्या पत्नीच्या भावाला कडं मारलं, ज्यामुळे वधूचा भाऊ जखमी झाला. तो वाद वाढल्यावर वर थेट मंडपातून कुठेतरी निघून गेला. तोडगा काढण्यासाठी रात्रीपर्यंत पंचायत सुरू होती. त्यानंतर वधूने वर आणि त्या पक्षावर मारहाण आणि हुंडा मागण्याचा आरोप केला आणि गुन्हा दाखल केला.भावाशी गैरवर्तन केल्याबद्दल वराने माफी मागावी, अशी मागणी वधूने केली. पण त्याने माफी मागण्यासाठी नकार दिल्यावर ती संतापली आणि तिने लग्न करण्यास नकार दिला. तिने कोणाचंच ऐकलं नाही, अखेर वर हा वधूशिवाय घरी परतला. हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील आहे.

खरं तर, देवेंद्र सिंह यांची मुलगी राधिका हिच्या लग्नाची वरात गुरुवारी मांडवली पोलीस स्टेशन परिसरातील चामरिया भागुवाला गावातून जिल्ह्यातील नांगल पोलीस स्टेशन परिसरातील मायापुरी गावात आली होती. वराला बग्गीवरून खाली उतरवण्याचा विधी सुरू होता. यासाठी डीजेला गाणं आणि डान्स थांबवण्यास सांगण्यात आले, मात्र त्यामुळे वधू आणि वराच्या पक्षात वाद झाला. वाद सुरू असताना, वराने वधूच्या भावाच्या डोक्यावर हातातील कड्याने जोरदार वार केला, ज्यामुळे वधूचा भाऊ जखमी झाला. ते पाहून वधू आणि तिचे नातेवाईक भडकले आणि वाद वाढला.

माफी माग नाहीतर..

या संपूर्ण वादानंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी वधूचा भाऊ रोहित याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले. वर आणि लग्नातील इतर पाहुणे पळून गेले. बऱ्याच प्रयत्नांनंतर, काही प्रतिष्ठित लोकांनी वधू आणि वर यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र नवऱ्यामुलाने आपल्या भावाची माफी मागावी असा आग्रह वधूने केला. ती तिच्या मागणीवर ठाम होती, पण वराने माफी मागण्यास नकार दिला. ते पाहून वधू भडकली आणि तिने लग्न करण्यासच नकार दिला आणि नांगल पोलिस स्टेशन गाठले.

पोलिसांनी केला गुन्हा दाखल

त्यानंतर वर आणि पाच जणांसह अनेक अज्ञात लोकांविरुद्ध हुंडा मागितल्याचा आणि मागणी पूर्ण न झाल्यावर मारहाण केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला. आणि ज्या वधूसाठी तो नवरा मुलगा वरात घेऊ आला होता, तिच्याशी लग्न न झाल्याने, तो वधूशिवायच घरी परतला. वधू राधिकाच्या तक्रारीवरून वर तरुण, धर्मेंद्र, कमल, अरुण आणि राहुल यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे या संपूर्ण प्रकरणात, पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक सुशील कुमार सैनी यांनी सांगितलं.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.