AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जंतरमंतरवरील आंदोलनाआधी सीजेपीला ‘सुप्रीम’ दिलासा; कोर्टाने नेमका काय निर्णय घेतला?

जंतरमंतरवरील आंदोलनाआधी सुप्रीम कोर्टाने सीजेपीला दिलासा दिला आहे. कोर्टाने अभिजीत दिपके यांच्या संघटनेच्या विरोधातील मागणी फेटाळून लावली आहे.

जंतरमंतरवरील आंदोलनाआधी सीजेपीला 'सुप्रीम' दिलासा; कोर्टाने नेमका काय निर्णय घेतला?
cjp protest delhi Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 09, 2026 | 2:15 PM
Share

कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीत उद्या म्हणजे 10 ऑक्टोबर रोजी जंतर-मंतरवर निवडणूक आयुक्त आंदलोनाची हाक दिली आहे. जंतर-मंतरवर मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलनाला उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सीजेपीच्या आंदोलनाच्या विरोधात कोर्टात धाव घेण्यात आली होती. सीजेपी आंदोलनादरम्यान पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या एफआयआर रद्द करण्याचा निर्णय मागे घेणे आणि दिल्ली पोलिसांना मोकळीक देण्याची मागणी कोर्टाने फेटाळून लावली आहे.

सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षेतखाली असलेल्या घटनापीठाने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून एफआयआर रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता सीजेपीने जंतर-मंतरवर आंदोलनाची घोषणा केली आहे. यंदा सीजेपीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारायांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सुप्रीम कोर्टात  दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सरदन्यायाधीश सूर्यकांत, न्यायाधीश जॉयमाल्या बागची, न्यायाधीश व्ही मोहना यांच्या घटनापीठापुढे एल. रमानाथन यांनी दाखल केलेल्या सुनावणी पार पडली. कोर्टाने पोलिसांची यंत्रणा स्वतंत्र आहे. त्यांच्या कामकाजात अशा प्रकारे हस्तक्षेप करता येणार नाही. कोर्टाने या याचिकेवर स्पष्ट केले की, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेऊन संविधानाच्या कलम 142 अंतर्गत अधिकाराचा वापर करून खटले रद्द करण्यात आले होते.

सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला म्हटलं की, तुम्ही म्हणत आहेत की, विद्यार्थ्यांवर कलम 142 अंतर्गत अधिकाराचा वापर करून खटले रद्द करायला नको होते. परंतु तुम्ही विचार करा. हे सर्व तरुण विद्यार्थी आहेत. आम्हाला त्यांच्या पालक आणि भविष्याची काळजी वाटली. त्यांनी कोर्टाच्या पायऱ्या चढू नये, असे आम्हाला वाटते’. त्यानंतर कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. यावेळी कोर्टाने कोव्हिड काळातील हिमाचल प्रदेशातील आंदोलनावरून घेतलेल्या निकालाचा दाखला दिला.  या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याच्या वकिलाला म्हणाले, ‘तुमच्या पक्षकाराने आमचे आधीचे निर्णय पाहावेत. ही याचिका तर आमच्या आधीच्या आदेशावर पुनर्विचार करण्यासाठी केली आहे’. दरम्यान तर मागच्या वेळी सरन्यायाधीश आणि सरकारच्या संमतीने सुप्रीम कोर्टाने एफआयआर रद्द केले होते.

Follow Us
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी