तर अशी प्रक्रिया ही मनमानी स्वरूपाची, SIR वरून वाद सुरू असतानाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचं महत्त्वाचं विधान
राज्यासह देशभरात सध्या एसआयआर प्रक्रियेवर वाद सुरू आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. एकीकडे हा वाद सुरू असताना दुसरीकडे SIR संदर्भात सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती उज्वल भुयान यांनी हे विधान केलंय.

सचिन गवाणे, टीव्ही 9 मराठी : सध्या निवडणूक आयोग आणि या आयोगावर करण्यात आलेले आरोप देशभरात चर्चेचा विषय आहेत. निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्षांना अनुकूल ठरतील असे काही निर्णय घेतले आहेत, असा दावा विरोधक करत आहेत. सध्या सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेत अनेक मतदारांची नावे वगळण्यात आली. या प्रक्रियेतही घोळ आहे, असाही आरोप विरोधक करतायत. दरम्यान, आता एकीकडे एसआयआर प्रक्रियेवर वाद सुरू असताना दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी मोठं विधान केलं आहे. ज्या प्रक्रियेमुळे नागरिकांना अधिकारांपासून वंचित राहावे लागत असेल तर ही ती प्रक्रिया मनमान स्वरुपाची आहे, असं न्यायमूर्ती भुयान म्हणाले आहेत. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
तर अशी अशी प्रक्रिया ही मनमानी स्वरूपाची
राज्यासह देशभरात सध्या एसआयआर प्रक्रियेवर वाद सुरू आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. एकीकडे हा वाद सुरू असताना दुसरीकडे SIR संदर्भात सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी हे विधान केलंय. ‘एखाद्या प्रक्रियेमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागत असेल तर अशी प्रक्रिया ही मनमानी स्वरूपाची आहे. भारतीय नागरिकाचा मतदानाचा अधिकार हा संविधानाच्या मूलभूत संरचनेचा अविभाज्य भाग आहे. ही प्रक्रिया संविधानातील अनुच्छेद 14 आणि 326 चे उल्लंघन करणारी ठरेल, असं मत न्यायमूर्तींनी व्यक्त केलंय.
प्राधिकरणाच्या कृतीचे समर्थन कोणतेही न्यायालय करू शकत नाही
तसेच, कलम 326 अन्वये प्राप्त असलेल्या ‘सार्वत्रिक प्रौढ मताधिकारा’वर आधारित मतदानाच्या अधिकारांशी छेडछाड करणाऱ्या कोणत्याही प्राधिकरणाच्या कृतीचे समर्थन कोणतेही न्यायालय करू शकत नाही, असंही परखड मत न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी व्यक्त केलंय.
ज्ञानेश कुमार यांचा मागितला जातोय राजीनामा
दरम्यान, सध्या दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागितला जातोय. दिल्लीमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. आज मुंबईतही ठाकरे बंधुंनी मोर्चाचे आयोजन करत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे आता कुमार राजीनामा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
