भारतात 69 टक्के लोक म्हणतात, लसीकरणाची गरज नाही!, जाणून घ्या काय आहे कारण?

कोरोना लसीची तेवढी गरज नसल्याचे 69 टक्के भारतीयांचे मत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. (Survey on corona vaccination)

भारतात 69 टक्के लोक म्हणतात, लसीकरणाची गरज नाही!, जाणून घ्या काय आहे कारण?
CORONA VACCINE

नवी दिल्ली : जगातील अनेक देश कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी प्रभावी लस शोधत आहेत. अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांमध्ये तर काही लसींना आपत्कालीन वापराची परवानगीही मिळाली आहे. या देशांमध्ये लसीकरण (corona vaccination) सुरु झाले आहे. तर भारतात जानेवारी महिन्यात लसीकरणास सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, कोरोना लसीची तेवढी गरज नसल्याचे 69 टक्के भारतीयांचे मत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. (Survey of Indian people on corona vaccination)

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीजवळचे गाव तसेच वस्त्यांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. यावेळी एकूण 18 हजार नागरिकांना माहिती विचारण्यात आली. यापैकी जवळपास 12,420 म्हणजेच 69 टक्के लोकांचे मत आहे की, कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी सध्यातरी लसीकरणाची गरज नाही. मागील काही दिवसांपूर्वी अमेरिकेतदेखील अशाच प्रकारचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यावेळी 50 टक्के अमेरिकन नागरिकांनी लस टोचून घेण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. अमेरिकेतील हा सर्व्हे व्हर्जिनिया कॉमनवेल्थ विद्यापीठाकडून केले गेला होता. त्यानंतर भारतातील 69 टक्के नागरिक लसीची खास गरज नसल्याचे म्हणत आहेत.

भारतात सगळे नागरिक लस घेणार का?

भारात सीरम, अ‌ॅस्ट्रेझेनेका यासारख्या कंपन्यांनी लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितलेली आहे. देशात केलेल्या सर्व्हेनुसार भारतीय नागरिक कोरोना लस घेण्याची तेवढी आवश्यकता नसल्याचे सांगत आहेत. त्यामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्यामुळे नागरिकांत लस घेण्याची गरज नसल्याचा समज निर्माण झाला आहे. तर कोरोना लसीच्या प्रभावाबाबत अनेक ठिकाणी चिंता व्यक्त केली जात आहे. या दोन्ही कारणांमुळे भारतीय नागरिक कोरोना लसीची सध्यातरी आवश्यकता नसल्याचे सांगत आहेत.

दरम्यान,भारतीय नागरिकांना लस घेणे बंधनकारक नसेल, हे आरोग्य मंत्रालयाने याआधीच जाहीर केलेले आहे. तसेच, येत्या जानेवारी महिन्यापर्यंत देशात कोरोना लसीकरणास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

संबंधित बातम्या :

कोरोना स्ट्रेनला जग का घाबरतंय? आणि कोरोनाचं हे नवं रुप आहे तरी काय? सगळ्या प्रश्नांची सखोल उत्तरं!

कोरोनाच्या नव्या प्रजातीवर ‘ही’ लस प्रभावी ठरणार?, वाचा सविस्तर

कोरोना व्हॅक्सीन धर्मसंकटात, मुस्लीम देशांकडून लसीला विरोध?, जाणून घ्या नेमकं कारण

(Survey of Indian people on corona vaccination)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI