AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 राज्यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष, बारामती-राहुरीत काय होणार? वाचा…

Election Result Update : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पद्दुचेरी या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

5 राज्यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष, बारामती-राहुरीत काय होणार? वाचा...
Election ResultImage Credit source: AI
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Edited By: | Updated on: May 04, 2026 | 7:21 AM
Share

संपूर्ण देशाचे लक्ष सध्या पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पद्दुचेरी या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. आज 4 मे रोजी या सर्व राज्यांमधील निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. तसेच राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा निवडणुकीचाही निकाल जाहीर होणार आहे. बारामतीतून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राहुरीतून अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चित मानला जात आहे. उद्याच्या निकालाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आसाममध्ये भाजपची हॅटट्रिक की काँग्रेसचे पुनरागमन? उद्या निकाल

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची जादू आसाममध्ये पुन्हा चालणार, की गौरव गोगोई सत्ता मिळवणार याचा निकाल समोर येणार आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला तिसऱ्यांदा सत्त मिळेल की काँग्रेस सत्ता मिळवण्यात यशस्वी होईल? हे सोमवारी समोर येणार आहे. 126 विधानसभा जागा असलेल्या आसाममध्ये बहुमतासाठी 64 जागांची आवश्यकता आहे. हा जादुई आकडा कोण गाठते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तामिळनाडूमध्ये डीएमके की टीव्हीके?

तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) च्या नेतृत्वाखालील सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स (एसपीए) सत्ता कायम राखण्याच्या तयारीत दिसत आहे. चाणक्य, मॅट्रिक्स, पी-मार्क, प्रजा पोल, पीपल्स डायरी आणि पोल डायरी यांनी तामिळनाडूमध्ये डीएमकेला सत्ता मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तर पुदुचेरीमध्ये एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. भाजपला येथे 16 ते 20 जागा मिळण्याची शक्यता आहे.

केरळ- बंगालमध्ये काय स्थिती?

केरळमधील डाव्या आघाडी एलडीएफचे 10 वर्षांचे राज्य आता संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे. सर्वेक्षणांनुसार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणात केरळमध्ये भाजपच्या लोकप्रियतेत लक्षणीय घट होण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपा सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा टीएमसीला हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

बारामती आणि राहुरीकडेही लक्ष

दुसरीकडे राज्यातील जनतेचे लक्ष हे राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीच्या पोटनिवडणुकीकडेही असणार आहे. अजित पवार आणि शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणुक पार पडली. बारामतीत सुनेत्रा पवार आणि राहुरीत अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Follow Us
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...