टाटांची जुनी ‘प्रेयसी’, जिच्याकडे कंपनी पुन्हा एकदा आकर्षित

एअर इंडिया तोट्यात असून सरकारला तिचा खर्च झेपत नाही. त्यामुळे सरकारने ही विमान कंपनी विकण्यास काढली आहे.

टाटांची जुनी 'प्रेयसी', जिच्याकडे कंपनी पुन्हा एकदा आकर्षित
Follow us
| Updated on: Dec 14, 2020 | 3:19 PM

मुंबई : टाटांच्या जुन्या ‘प्रेयसी’कडे कंपनी पुन्हा एकदा आकर्षित झाली आहे. आता टाटांची जुनी प्रेमिका कोण? हा प्रश्न कोणाच्याही मनात येईल, तर ही प्रेमिका आहे एअर इंडिया… तीच एअरलाईन्स जी टाटाने देशाला समर्पित केली. मात्र त्याच एअरलाईन्सची आर्थिक परिस्थिती सध्या कमकुवत आहे. त्यामुळेच टाटाने ही एअरलाईन्स पुन्हा खरेदी करण्याचा विचार सुरु केला आहे. (Tata sons to buy JRD Tata’s old love Air India)

गोष्ट आहे 1932 ची… स्वातंत्र्याच्याही आधीची… जेआरडी टाटांनी भारताच्या विमान वाहतुकीच्या इतिहासातील पहिलं विमान उडवलं… बरोबर, खुद्द जेआरडी टाटाच या विमानाचे पायलट होते. Puss Moth नावाच्या या विमानात बसून टाटांनी थेट कराचीहून हवेत झेप घेतली आणि हे विमान उतरलं आपल्या मुंबईत जुहूजवळ.

टाटांच्या या विमानाच्या उड्डाणानंतर कमर्शिअल विमान वाहतुकीची सुरुवात झाली. त्यानंतर टाटांनी कधीही मागे पाहिलं नाही. टाटा एअरलाईन्स सुरु झाली आणि त्याचे पहिले पायलट होते होमी भरुचा टाटा. तर जेआरडी टाटा दुसरे पायलट.

जुहूजवळच्या एका मातीच्या रनवेवरुन विमान उड्डाण भरु लागलं. मात्र पावसाळ्यात हा रनवे ओला व्हायचा. त्यामुळे विमानांचं उड्डाण शक्य व्हायचं नाही. या अडचणीतही टाटांनी हार मानली नाही. त्यांनी पुण्यातून या विमानांचं संचलन सुरु केलं.

जेआरडी टाटांनी कुठला रेकॉर्ड केला असं नाही, तर जेआरडींची आई भारतात कार चालवणारी पहिली महिला होती. त्या फ्रान्सच्या असल्यामुळे त्यांचं सगळं बालपण फ्रान्समध्येच गेलं. (Tata sons to buy JRD Tata’s old love Air India)

टाटा एअरलाईन्स व्यवस्थित सुरु होती. मात्र दुसऱ्या महायुद्धादरम्यान हवाई सेवा बंद करावी लागली. थेट 1946 मध्ये विमान वाहतूक पुन्हा सुरु झाली. तेव्हा टाटांनी या विमानाचं नाव बदलून एअर इंडिया लिमिटेड केलं. ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. स्वातंत्र्यानंतर 1947 ला एअर इंडियाची 49 टक्के हिस्सेदारी केंद्र सरकारने विकत घेतली आणि 1953 ला या एअरलाईन्सचं राष्ट्रीयकरण झालं.

आता हीच एअरलाईन्स तोट्यात आहे. सरकारला हिचा खर्च झेपत नाही. त्यामुळे सरकारने ही विमान कंपनी विकण्यास काढली आहे. ही कंपनी विकत घेण्यासाठी पुन्हा एकदा टाटा सन्सने कंबर कसली आहे. यासाठी टाटा सन्सकडून एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्टही सरकारकडे देण्यात आला आहे. 28 डिसेंबरला ही कंपनी विकण्यासाठी बोली लागणार आहे. त्यावेळी ही कंपनी पुन्हा ताब्यात मिळावी यासाठी टाटा सन्स आपली पूर्ण ताकद लावणार आहे.

संबंधित बातम्या :

Ratan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत

(Tata sons to buy JRD Tata’s old love Air India)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.