TejPratap Yadav : निरीक्षण करण्यासाठी गेलेल्या तेजप्रताप यादव यांना रुग्णालय प्रशासनाने दाखवला बाहेरचा रस्ता! कारण काय?

TejPratap Yadav : निरीक्षण करण्यासाठी गेलेल्या तेजप्रताप यादव यांना रुग्णालय प्रशासनाने दाखवला बाहेरचा रस्ता! कारण काय?
तेजप्रताप यादव, बिहार

तेज प्रताप यादव हे माजी आरोग्यमंत्री राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर ते आज मुझफ्फरनगरच्या एका रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेले. त्यावेळी तेज प्रताप यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली. कोरोना नियम अक्षरश: पायदळी तुडवले गेले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jun 10, 2021 | 10:53 PM

पाटणा : बिहारचं राजकारण आणि तिथले नेते या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ चिरंजीव तेज प्रताप यादव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याला कारणही तसंच आहे. तेज प्रताप यादव हे माजी आरोग्यमंत्री राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर ते आज मुझफ्फरनगरच्या एका रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेले. त्यावेळी तेज प्रताप यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली. कोरोना नियम अक्षरश: पायदळी तुडवले गेले. त्यामुळे संतप्त झालेल्या रुग्णालय प्रशासनानं तेज प्रताप यादव यांना बाहेरचा रस्ता दाखवला. (hospital administration asked Tejpratap Yadav to leave the hospital)

तेजप्रताप यादव हे बुधवारी मुझफ्फरनगरच्या श्री कृष्ण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या कोरोना रुग्णांची चौकशी आणि आयोग्य व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी ते रुग्णालयात गेले होते. त्यावेळी तेजप्रताप यांच्या सोबत मोठी गर्दी जमा झाली. कोरोना काळात प्रचंड मोठी गर्दी जमा झाल्यानं रुग्णालय प्रशासनाचेही धाबे दणाणले. त्यामुळे रुग्णालयाच्या अधीक्षकांनी तेजप्रताप यांना रुग्णालयातून निघून जाण्यास सांगितलं.

रुग्णालय अधीक्षकांनी गर्दी हटवली

कोरोना काळात रुग्णालयासारख्या ठिकाणी मोठी गर्दी झाल्यामुळे रुग्णालयाच्या अधीक्षकांनीच कमान हातात घेतली. त्यांनी लोकांना रुग्णालयातून निघून जाण्यास सांगितलं. तरीही लोक ऐकेनात. तेव्हा अधीक्षकांनी माईक हातात घेत Go Outside from the Building असा आदेशच दिला. याबाबत त्यांना विचारलं असता आपल्याला फक्त तेजप्रताप यादव येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यासाठी कुठली परवानगीही घेतली गेली नव्हती. रुग्णालयात अशाप्रकारे गर्दी होणं चुकीचं आहे. त्यामुळे तेजप्रताप यादव यांच्यासह सर्वांना बाहेर जाण्यास सांगितल्याचं रुग्णालय अधीक्षक म्हणाले.

बिहार विधानसभेत धिंगाणा!

23 मार्च रोजी बिहारच्या विधानसभेत जोरदार राडा आणि धिंगाणा पाहायला मिळाला होता. बिहार विशेष सशस्त्र पोलीस विधेयकावरुन तुफान गोंधळ दिसून आला. विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांनी या विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला. इतकच नाही तर जोरदार राडाही घातला. एक महिला आमदार विरोध करत असताना थेट विधानसभा अध्यक्षांच्या आसनापर्यंत पोहोचली. शेवटी महिला पोलिसांना पाचारण करत त्या आमदाराला सदनाबाहेर काढण्यात आलं. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना साध्या ड्रेसमध्ये सदनात तैनात करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांना आमदारांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिल्याचं पाहायला मिळालं होतं.

संबंधित बातम्या :

Video : बिहारमध्ये RJD कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज, तेजस्वी आणि तेजस्वी यादव पोलिसांच्या ताब्यात

Photo : बिहार विधानसभेत तुफान राडा, पोलिसांकडून आमदारांना लाथा-बुक्क्यांचा प्रसाद!

hospital administration asked Tejpratap Yadav to leave the hospital

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें