Photo : बिहार विधानसभेत तुफान राडा, पोलिसांकडून आमदारांना लाथा-बुक्क्यांचा प्रसाद!

बिहार विधानसभेत आज विरोधी पक्षांच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. सशस्त्र पोलीस विधेयकावरुन जोरदार धिंगाणा पाहायला मिळाला. यावेळी पोलिसांनी अनेक आमदारांना मारहाणही केली.

1/5
बिहारच्या विधानसभेत आज जोरदार राडा आणि धिंगाणा पाहायला मिळाला. बिहार विशेष सशस्त्र पोलीस विधेयकावरुन तुफान गोंधळ झाला.एक महिला आमदार विरोध करत असताना थेट विधानसभा अध्यक्षांच्या आसनापर्यंत पोहोचली. शेवटी महिला पोलिसांना पाचारण करत त्या आमदाराला सदनाबाहेर काढण्यात आलं.
2/5
परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सदनात तैनात करण्यात आलं होतं. त्यावेळी बिहार विधानसभेला पोलिस छावणीचं स्वरुप प्राप्त झालं होतं.
3/5
दुपारी 4.30 वाजता सदनाची कामकाज सुरु होणार होतं. पण त्यापूर्वीच आरजेडीसह अन्य विरोधी पक्षाचे आमदार विधानसभा अध्यक्षांच्या गेटजवळ पोहोचले. त्यांनी अध्यक्षांना कोंडून घेतलं. त्यांना हटवण्यासाठी राज्य राखील पोलीस दलाच्या जवानांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी एक एक करुन सर्व आमदारांना सदनाच्या बाहेर काढलं आणि अध्यक्षांची सुटका केली.
4/5
या राड्यात आमदार सत्येंद्र कुमार यांनी आरोप केला आहे की, एसपींच्या सांगण्यावरुन त्यांच्या छातीत लाथ मारण्यात आली. छाती मार लागल्याची तक्रार सत्येंद्र कुमार यांनी केली आहे. हा फक्त अन्याय नाही तर लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
5/5
आरजेडीचे सर्वेसर्वा आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनाही पोलिसांनी विधानसभेबाहेर काढलं. पोलिसांनी अनेक आमदारांना मारहाण केलीय. पायाला धरुन ओढून नेत सदनाबाहेर काढण्यात आलं. या सर्व राड्यानंतर जखमी आमदारांना रुग्णवाहिकेतून दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आलं.