Telangana: तेलंगणा भाजप प्रमुखांचे वादग्रस्त विधान; म्हणाले- राज्यातील सर्व मशिदी खोदू, मृतदेह सापडला तर ठेवा, शिवलिंग सापडले तर आम्ही घेऊ

एका वादग्रस्त भाषणात तेलंगणा भाजपचे प्रमुख बी संजय कुमार यांनी दावा केला की तेलंगणामध्ये जिथे जिथे मशिदीचे खोदकाम होईल तिथे शिवलिंग सापडेल. संजय कुमार हे वेळोवेळी मुस्लिमांविरोधात वादग्रस्त भाषणे देत असतात.

Telangana: तेलंगणा भाजप प्रमुखांचे वादग्रस्त विधान; म्हणाले- राज्यातील सर्व मशिदी खोदू, मृतदेह सापडला तर ठेवा, शिवलिंग सापडले तर आम्ही घेऊ
तेलंगणा भाजपचे प्रमुख बी संजय कुमारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 8:47 PM

तेलंगणा : देशातील वातावरण हे मंदिर-मशिदीवरून चांगलच तापत आहे. तर मंदिर-मशिदीवरून नवनवे वाद समोर येत आहेत. इतिहासातील पाळेमुळे खोदले जात असून मशिदींवर हक्क सांगितले जात आहेत. असेच हक्क ज्ञानवापी मशीद, मथूरेतील शाही ईदगाह, कुतूबमिणार, ताजमहल आणि राजस्थानच्या अजमेरमधील हजरत ख्वाजा गरीब नवाज दर्गा यावरही करण्यात आले आहे. हे असे वातावरण असताना ज्ञानवापी मशीद सर्वेमध्ये (Gyanvapi Masjid Case) शिवलिंग सापडल्याच्या दावा हिंदुपक्षाकडून करण्यात आला. त्यानंतर देशातील राजकीय आंदोलन आणखी तीव्र झाले आहे. दरम्यान, मशिदी-शिवलिंग प्रकरणी तेलंगणाच्या (Telangana) भाजप प्रमुख बी संजय कुमार यांनी वादग्रस्त विधान केले आहे. राज्यातील सर्व मशिदींचे उत्खनन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच जर उत्खननात मृतदेह सापडला तर तुम्ही ते घेऊन जाल आणि या उत्खननात शिवलिंग (Shivling)सापडले तर ते आमच्या स्वाधीन करा, असेही त्यांनी म्हटलं आहे.

एका वादग्रस्त भाषणात तेलंगणा भाजपचे प्रमुख बी संजय कुमार यांनी दावा केला की तेलंगणामध्ये जिथे जिथे मशिदीचे खोदकाम होईल तिथे शिवलिंग सापडेल. संजय कुमार हे वेळोवेळी मुस्लिमांविरोधात वादग्रस्त भाषणे देत असतात. यापूर्वीही त्यांनी अशी विधाने केली आहेत. तेलंगणात पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत येथे धर्माबाबतचे ध्रुवीकरण अधिक तीव्र झाले आहे.

अल्पसंख्याकांचे आरक्षण संपवू

भाजपचे तेलंगणा अध्यक्ष आणि खासदार बी संजय कुमार यांनी बुधवारी म्हटले होते की, त्यांचा पक्ष राज्यात सत्तेवर आल्यावर अल्पसंख्याक आरक्षण रद्द करू. तर त्याचा लाभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर वर्गांना देऊ असे त्यांनी सांगितले होते. संजय कुमार यांनी धर्मांतरण आणि लव्ह जिहादविरोधात काम करण्याचा संकल्पही व्यक्त केला होता.

हे सुद्धा वाचा

लव्ह जिहादलाही लक्ष्य

ते म्हणाले, ‘लव्ह जिहादच्या नावाखाली आमच्या बहिणींना गोवले जात आहे, फसवले जात आहे, मग आम्ही गप्प का बसायचे. गोरगरिबांना धर्मांतराची सक्ती केल्यास हिंदू समाज खपवून घेणार नाही. करीमनगर येथील हिंदू एकता यात्रेदरम्यान ते म्हणाले, ‘लव्ह जिहादचे नाव घेणाऱ्यांवर लाठीमार होईल याची आम्ही काळजी घेऊ. धर्म बदलणाऱ्यांवर कडक कारवाई करू.

तेलंगणात पंतप्रधान मोदींची रॅली

यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी तेलंगणात होते. ते हैदराबादमध्ये म्हणाले की, घराणेशाही चालवणारे राजकीय पक्ष नेहमीच स्वतःच्या फायद्याचा विचार करतात. त्यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले की, ते देशाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. दुसरीकडे 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने बुधवारी महत्त्वाच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. देशातील 74,000 निवडणूक बूथपर्यंत पोहोचणाऱ्या उपक्रमांना चालना देण्यासाठी पक्ष आठवडाभर मोहीम राबवणार आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.