AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एवढे मोठे केस ? शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या केसांनाच लावली कात्री, पालकांचा गदारोळ

तेलंगणातील एका सरकारी शाळेत मुलांचे लांब केस पाहून शिक्षकाला इतका राग आला की त्यांनी स्वतःच शाळेतील मुलांचे केस कापले. शिक्षकांच्या या वागणुकीमुळे मुलांपासून पालकांपर्यंत सर्वांमध्ये तीव्र नाराजी आहे.

एवढे मोठे केस ? शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या केसांनाच लावली कात्री, पालकांचा गदारोळ
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Jul 29, 2024 | 12:38 PM
Share
मनुष्याच्या सौंदर्यामध्ये त्याच्या केसांचे बरेच महत्व असते. त्यामुळे प्रत्येक जण केसांची विशेष काळजी घेत असतो, तसेच केस कट करताना ( कापतानाही) खास काळजी घेतली जाते. अनेक लोक मोठमोठ्या हेअर पार्लरमध्ये जाऊन मोठी रक्कम भरून केस कापून घेतात आणि चांगला लूक निवडतात. मात्र तेलंगणातील एका शाळेत आगळाच प्रकार घडला. तेथे इंग्रजी विषयाच्या शिक्षकाने  स्वत:च विद्यार्थ्यांचे केस कापले.  इंग्रजीचे शिक्षक इतके संतापले की त्यांनी वर्गातील एक-दोन नव्हे तर चक्क 15 विद्यार्थ्यांचे केस कापले. या घटनेची माहिती विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी शिक्षकाविरोधात तक्रार केली.
तक्रारीनंतर याप्रकरणी कारवाई करत शिक्षण विभागाने चौकशीचे आदेश दिले असून आरोपी शिक्षकाला तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे केस का कापले असे शिक्षकांना विचारले असता शिक्षकांनी सांगितले की, त्यांनी अनेकवेळा विद्यार्थ्यांना त्यांचे लांब केस बारीक कापण्यास सांगितले होते, मात्र विद्यार्थी तसेच लांब केस घेऊन शाळेत येत होते.
हेअरकट आवडला नाही  
मात्र शिक्षकांनी कापलेले केस काही मुलांना आवडले नाहीत आणि सर्व 15 मुलांनी शाळेसमोर येऊन या घटनेचा निषेध केला. मुलांसह त्यांचे पालकही उपस्थित होते, जे अतिशय संतापले होते.  शाळा व्यवस्थापनावर प्रशासनाचाही रोष आहे.
केस कापणे शिक्षकांचे काम नाही 
मुलांचे केस कापल्यानंतर या प्रकरणाबाबत शिक्षण विभागाने आरोपी शिक्षकाला निलंबित केले आहे. केस कापणे हे कोणत्याही शिक्षकाचे काम नाही, त्यासाठी वेगळा व्यवसाय ठरवण्यात आला आहे. एखादा विद्यार्थी शिस्तीत शाळेत येत नसेल, तर त्याचे केस स्वत: कापून घेण्याऐवजी त्याच्या पालकांना त्याची माहिती द्यावी, असे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बजावले आहे.

'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.