भारतात लॉकडाऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Announced Lock down)  यांनी देशभरात लॉकडाऊन करत असल्याची मोठी घोषणा केली.

भारतात लॉकडाऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Announced Lock down)  यांनी देशभरात लॉकडाऊन करत असल्याची मोठी घोषणा केली. या घोषणेनुसार आज रात्री 12 वाजेपासून संपूर्ण देशभरात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन होत आहे. नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे देशातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या (PM Narendra Modi Announced Lock down) .

नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाची मुद्दे

संपूर्ण देश २१ दिवसासाठी लॉकडाऊन, पंतप्रधान मोदींनी मोठं हत्यार उपसलं, देशभरात कर्फ्यू, जनता कर्फ्यूचं पुढचं पाऊल, आज रात्री १२ पासून अंमलबजावणी, २१ दिवस घरबाहेर पडण्यास मज्जाव

देश आणि देशातील नागरिकांना वाचवण्यासाठी संचारबंदी लागू करतोय, जिथे आहात तिथेच राहा, पंतप्रधान म्हणून नव्हे तर तुमच्या परिवाराचा सदस्य म्हणून विनंती करतोय, मोदींचं आवाहन, प्रत्येक राज्य आणि केंद्र शासित प्रदेश, शहर, गावं लॉकडाऊन

लक्ष्मण रेखा आखून घ्या, रेषा ओलांडाल तर कोरोनासारखा महाभयंकर रोग घरी घेऊन याल, पंतप्रधान मोदींचा इशारा, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक द चेन गरजेची

काहीही होऊ दे घराबाहेर पडायचंच नाही, देशवासियांनी निर्धार करण्याचा मोदींचा सल्ला, जगाला हैराण केलेल्या कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी मोदींचा मंत्रा

‘जान है तो जहान है’, स्वत: बाहेर पडून इतरांना धोक्यात घालू नका, मोदींची विनंती, महामारीपासून लोकांचे जीव वाचवण्यासाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सलाम

चीन, इटली, जर्मनी, अमेरिका यांची आरोग्य यंत्रणा उत्तम, तरीही तिथली परिस्थिती भीषण, मोठं संकट टाळण्यासाठी घरातून बाहेरच पडू नका, मोदींचं आवाहन

कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी 15 हजार कोटींचं पॅकेज, पंतप्रधान मोदींकडून घोषणा, व्हेंटिलेटर, मास्क, अन्य साधनं वाढवण्यावर भर

अफवा आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका, केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांचं पालन करा, मोदींचा सल्ला

21 दिवसांचा लॉक डाऊन मोठा काळ, मात्र तुमच्या आणि कुटुंबीयांच्या स्वास्थ्यासाठी हा निर्णय आवश्यक, प्रत्येक हिंदुस्थानी नेटाने लढेल, मोदींना विश्वास

संबंधित बातमी : भारताला वाचवण्यासाठी आज रात्री 12 पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन : पंतप्रधान मोदी