AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची बल्ले बल्ले… महागाई भत्त्यात घसघशीत वाढ; पगारात कितीने वाढ होणार?

सध्या केंद्र सरकारकडून एक नोटीस जारी करण्यात आली आहे. कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. 1 जुलै 2023 पासून ही वाढ लागू होणार आहे.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची बल्ले बल्ले... महागाई भत्त्यात घसघशीत वाढ; पगारात कितीने वाढ होणार?
Increase in inflation allowanceImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jul 15, 2023 | 8:53 AM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या (central government) कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जी घोषणा सेंट्रल पब्लिक एंटरप्राइजेज (CPEs) कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आली आहे. महागाईच्या काळात त्यांना मदत व्हावी, यासाठी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ (Increase in inflation allowance) करण्यात येते. सध्या जी महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. ती 1 जुलै 2023 पासून ही वाढ लागू होणार आहे.

बिझनेस टुडेच्या माहितीनुसार, सेंट्रल पब्लिक एंटरप्राइजेजच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 1992 आईडीए नुसार करण्यात आला आहे. 1 जुलै 2023 पासून नवीन दरानूसार 3,500 रुपये प्रति मुळ पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 701.9 टक्के म्हणजे 15,428 लागू होणार आहेत. 3,501 रुपयांपासून 6,500 रुपये महिना पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 526.4 टक्के म्हणजे 24,567 रुपये लागू होणार आहेत.

त्याच्यानंतर 6,500 रुपये 9,500 रुपये पगार बेसिक पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 421.1 टक्के वाढ होईल, ती रक्कम 34,216 रुपये असेल. 9500 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 351 टक्के असेल. तो 40,005 रुपये असेल. केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्याची गणना सध्याचा डीए आणि मूळ पगाराच्या गुणाकाराच्या आधारे केली जात आहे.

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यांची रक्कम ५० पैशाच्यावरती गेली तर त्याला एक रुपाया मानला जाईल. जर रक्कम ५० पैशापेक्षा कमी असेल तर त्याला शुन्य मानलं जाईलं. समजा डीए 150.75 रुपये असेल तर 151 रुपये मानले जातील.

कर्मचाऱ्यांच्या डीएचे नवे दर 1 जुलै, 2023 पासून लागू होतील. जुन्या प्रणालीनुसार, प्रत्येक पॉइंटसाठी 2 रुपये मानले जातील. AICPI च्या कार्यकारिणीसाठी रु. 16215.75 चा DA दिला जाईल.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...