मराठमोळे सरन्यायधीश बोबडे फेअरवेल स्पीचमध्ये नेमकं काय म्हणाले? कशी होती त्यांची कारकिर्द? वाचा सविस्तर

मराठमोळे सरन्यायाधीश शरद बोबडे आज निवृत्त होत आहेत. (the richest experience to have served as a Judge, says chief justice sharad bobde)

मराठमोळे सरन्यायधीश बोबडे फेअरवेल स्पीचमध्ये नेमकं काय म्हणाले? कशी होती त्यांची कारकिर्द? वाचा सविस्तर
chief justice sharad bobde
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 1:24 PM

नवी दिल्ली: मराठमोळे सरन्यायाधीश शरद बोबडे आज निवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी सरन्यायाधीश बोबडे यांनी अनेक मुद्द्यांना हात घालतानाच न्यायाधीश म्हणून केलेलं काम आणि अनुभव समृद्ध करणाराच होता, अशी भावना व्यक्त केली. (the richest experience to have served as a Judge, says chief justice sharad bobde)

सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आपल्या निरोपाच्या भाषणात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला. शेवटच्या सुनावणीमुळे माझ्या मनात संमिश्र भावना निर्माण झाल्या आहेत. मी यापूर्वीही खंडपीठावर होतो. पण या भावना खूप संमिश्र आहेत. त्यामुळे मी नेमकंपणाने व्यक्त होऊ शकत नाही, असं बोबडे म्हणाले.

अनुभव समृद्ध होता

सांगण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. परंतु युक्तिवादाच्या अविस्मरणीय आठवणी, उत्कृष्ट सादरीकरण, उत्तम वातावरण आणि न्याय निवाड्याबाबत सहकाऱ्यांकडूनच नव्हे तर बार कौन्सिलसह प्रत्येकाकडून मिळालेली उत्तम प्रतिक्रिया या सर्व गोष्टींसह आनंदाने मी या कोर्टाचा निरोप घेत आहे, हे मला नमूद केलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. सुमारे 21 वर्ष मी न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. या सेवेतून मुक्त होण्याची आज मी परवानगी घेत आहे. न्यायाधीश म्हणून सेवा देण्याचा हा एक समृद्ध अनुभव होता. रजिस्ट्रीही खूप सहाय्यकारक राहिली आहे. प्रत्यक्ष आणि व्हर्च्युअल सुनावणीपर्यंतच्या संक्रमणाच्या आवश्यक गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाही, असंही ते म्हणाले.

व्हर्च्युअल सुनावणी म्हणजे…

व्हर्च्युअल सुनावणीवेळी तुम्हाला ऐकणं म्हणजे कार्यालयात बसून ऐकण्यासारखं आहे. अॅटर्नी जनरलच्या मागे असलेला पुतळा, विकास सिंहच्या मागे जगुआर, एसजीच्या मागे असलेला पुतळा काढण्यात आला . त्यात श्रीगणेशाची मूर्ती होती, असं ते म्हणाले. मी अनेक वकील पाहिले. त्यांच्या मागे भक्कम पहाड, अप्रतिम चित्रं आणि कधी कधी तर गन्स, पिस्तुलही पाहिले. मी माझी सर्वश्रेष्ठ कामगिरी करू शकलो, त्याबद्दल खूश आहे. हे कसं शक्य झालं मला माहीत नाही, असं सांगतानाच आता मी ही बॅटन जस्टीस रमण्णा यांना सोपवत आहे, असं ते म्हणाले.

शेवटच्या दिवसापर्यंत चिंता

यावेळी वरिष्ठ कायदेतज्ज्ञांनीही सरन्यायाधीश बोबडे यांच्या कार्याचं कौतुक केलं. ज्येष्ठ वकील विकास सिंग यांनी कोरोना काळातही सरन्यायाधीशांनी कायद्याची बुज राखल्याचं सांगितलं. ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत दिलेले निर्देश हे तुम्ही न्यायाधीश म्हणून किती गुंतून पडला होता हे दिसून येतं. शेवटच्या दिवसापर्यंत काय होत आहे, याची तुम्हाला चिंता होती, असं सिंग यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी बोबडे यांचे फिटनेस आणि टेनिस खेळावरही भाष्य केलं. तर तुम्ही केवळ हुशार न्यायाधीशच नव्हता तर प्रेमळ आणि काळजी घेणारे एक उत्तम माणूस होता. तुमची कमी आम्हाला नेहमीच जाणवत राहिल, असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले.

सरन्यायाधीशांचा कार्यकाळ तीन वर्षाचा करा

अटर्नी जनरल केके वेणूगोपाल यांनी सरन्यायाधीशांचा कार्यकाळ किमान तीन वर्षाचा असावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तीन वर्षाचा कार्यकाळ असेल तर अनेक सुधारणा घडवून आणण्यास मदत मिळेल, असं ते म्हणाले. जगभरात कोरोनाचं संकट असताना बोबडे यांनी व्हर्च्युअल सुनावणी करून 50 हजाराच्यावर प्रकरणे मार्गी लावली. ही त्यांची मोठी अचिव्हमेंट आहे. आर्थिक मदतीसाठी वकिलांनी संपर्क साधला तेव्हाही सरन्यायाधीशांनी पुढाकार घेतला, असं ते म्हणाले.

शरद बोबडे यांचा परिचय

न्या. शरद अरविंद बोबडे यांचा जन्म 24 एप्रिल 1956 रोजी नागपूरमध्ये वकील कुटुंबात झाला. शरद बोबडे यांचे वडील अरविंद बोबडे यांनी महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरलपद भूषवले होते. शरद बोबडे यांनी 1978 मध्ये नागपूरच्या एसएफएस कॉलेजमधून विधी विभागातून शिक्षण घेतलं. 13 सप्टेंबर 1978 मध्ये नागपूरच्या हायकोर्टामध्ये अधिवक्ता म्हणून बोबडेंनी कारकीर्दीला सुरुवात केली होती. 1978 साली ते महाराष्ट्र बार कौन्सिलचे सदस्य झाले. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने 1998 मध्ये बोबडे यांना वरिष्ठ अधिवक्ता म्हणून मान्यता दिली. शरद बोबडे यांनी मार्च 2000 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून कार्यभार सांभाळला होता. 2012 मध्ये शरद बोबडे यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची पदोन्नती झाली होती.

बोबडे आणि निकाल

शरद बोबडे यांनी आधार कार्ड सत्यापन प्रकरणावर सुनावणी केली होती. संपूर्ण जागाचं लक्ष लागलेल्या अयोध्येमधील रामजन्मभूमी वाद प्रकरणी त्यांनी सुनावणी पूर्ण करून हा वाद सोडवला होता. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप झाला होता. त्याची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत बोबडे होते. या समितीने गोगोईंवर लावण्यात आलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं म्हटलं होतं. व्यक्तिगत गोपनीयता (राइट टू प्रायव्हसी) हा मूलभूत अधिकारच आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम २१नुसार व्यक्तिस्वातंत्र्य आणि जगण्याचा अधिकार अविभाज्य भाग आहे, असा ऐतिहासिक निकाल देणाऱ्या घटनापीठातही ते होते. एनसीआर येथील वाढते वायुप्रदूषण पाहता दिवाळीदरम्यान फटाक्यांची विक्री करता येणार नाही, असा निर्णय देणाऱ्या खंडपीठातही बोबडेंचा समावेश होता. (the richest experience to have served as a Judge, says chief justice sharad bobde)

संबंधित बातम्या:

कोरोना उपायांबाबत ‘नॅशनल प्लॅन’ काय? सुप्रीम कोर्टाचा मोदी सरकारला खडा सवाल!

सर्वोच्च न्यायालयात गुरुवारपासून फक्त तातडीच्या सुनावण्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

आणीबाणीत आंदोलन, थेट मुख्यमंत्र्यांकडून भ्रष्टाचाराचे आरोप; कोण आहेत नवे सरन्यायाधीश रमण्णा?

(the richest experience to have served as a Judge, says chief justice sharad bobde)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.