AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुघलांच्या खानदानी महिला, एकेकाळी नाण्यांवर कोरले होते नाव, आता वारसदारांची पेन्शनवर होतेय गुजराण

मुघल साम्राज्याच्या शाही परिवारातील नूरजहा, मूमताज महल असो की जहांआरा वा रोशनआरा सर्वांचे मुघल दरबारात वजन होते. त्यांच्या स्वतंत्र व्यक्तीमत्वाने त्याचं नाव इतिहासात नोंदले गेले आहे. परंतू सध्या त्यांच्या वंशज सुल्ताना बेगम यांची परिस्थिती पार हालाखीची बनली आहे.

मुघलांच्या खानदानी महिला, एकेकाळी नाण्यांवर कोरले होते नाव, आता वारसदारांची पेन्शनवर होतेय गुजराण
Mughal royal family womens
| Updated on: Mar 26, 2025 | 10:09 AM
Share

Mughal Queens :  भारतात मुघल साम्राज्याची सुरुवात साल १५२६ मध्ये जहीरुद्दीन मोहम्मद बाबर यांनी केली होती. त्यानंतर औरंगजेबाच्या काळात १७०७ पर्यंत साम्राज्याचा दबदबा होता. या काळात शाही घराण्याच्या महिलांनी देखील त्यांचे स्वतंत्र अस्तित्व दाखविले. कला, साहित्य, राजकारणात या महिलांनी योगदान दिले आहे. त्यातील एक मुमताज महल आणि शाहजहा यांची प्रेमकहाणी सर्वांना माहीती आहे. परंतू या मुघलांच्या शाहीपरिवारातील अनेक महिला देखील चर्चेत आल्या होत्या…

नूरजहाँ

नूरजहाँ ही बादशाह जहांगीर ( अकबरचा मोठा मुलगा )  (1605-1627) यांची बेगम होती. नूरजहाँ पतीच्या मृत्यूनंतर जहांगीरच्या हरममध्ये नोकरी करीत होती. येथे तिची जहांगिर यांच्याशी भेट झाली. त्यानंतर दोघांनी निकाह केला. नूरजहाँ हीने आपल्या वकुबानुरुप मुघल दरबारातील राजकारणात सक्रीय भूमिका वठवली होती. ही एकमेव महाराणी होती जिच्या नावाने नाणी तयार झाली होती. नूरजहाँ जहांगिरच्या निर्णयातही दखल द्यायची. तिचे वडील आणि भाऊ मुघल दरबारात मोठ्या पदावर होते. पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीचे लग्न जहांगिरचा मुलगा शहरयार याच्याशी झाले. जहागिरचा मुलगा खुर्रम ( शाहजहा )  याच्या बंडाला दाबण्याच्या कामातही नुरजहां हीने जहागिरला मदत केली होती.

मुमताज महल

मुमताज महल आणि शाहजहां याच्या प्रेमकहाणीचे प्रतिक म्हणून ताजमहल जगभरात प्रसिद्ध आहे. शाहजहाचा काळ 1628 से 1657 पर्यंत होता. मुमताज महल ही नूरजहाचा भाऊ आसफ खा याची मुलगी होती. ती तिच्या सौदर्यामुळे ओळखली जाते. इतिहासात मुमताज महलचे खरे नाव अर्जुमंद होते. शाहजहा त्याच्या सर्व पत्नींपैकी मुमताजवर जास्त विश्वास ठेवायचा. त्यामुळे शाही मोहरा तिच्या ताब्यात होत्या. एका सैन्य मोहिमेत गर्भवती असतानाही मुमताज महल शाहजहा सोबत आली होती. याच मोहिमेवर तिने १४ व्या मुलाला जन्म दिला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. तिच्या वियोगाने शाहजहाने ताजमहल बांधला. त्यात तिचे थडगे ठेवले आहे.आज जगातील सात आश्चर्यात ताजमहलची गणना होते.

‘जहांआरा’ सर्वात शक्तीशाली महिला

शाहजहा आणि मुमताज महल यांच्या दोन मुली जहांआरा आणि रोशनआरा यांचे देखील इतिहासात नाव आहे. शाहजहा जहांआरा हिचा खूप लाड करायचे. मुमताज महलच्या मृत्यूनंतर शाहजहांने जहाआराला शाही शिक्का आणि प्रशासकीय व्यवहार सोपवला.  जहाआराला मुघल साम्राज्याची सर्वात शक्तीशाली महिला म्हणून ओळखले जाते. 1657 मध्ये शाहजहा आजारी झाल्यानंतर उत्तराधिकाऱ्याच्या लढाईत तिने दाराशिकोह याची साथ दिली. जेव्हा औरंगजेबाने पिता शाहजहाला नजरबंद केले. तेव्हा जहांआरा हीने आपल्या वडील शाहजहा यांची साथ दिली होती. ती शाहजहा याच्या मृत्यूपर्यंत आग्रा येथील किल्ल्यातच राहीली. त्यानंतर औरंगजेब आणि तिच्यातील वाद मिटले.

रोशनआरा

रोशनआरा शाहजहां आणि मुमताज महल यांची तिसरी मुलगी होय. तिला कविता करण्याचा छंद होता. रोशनआरा हीने गादीच्या उत्तराधिकाराच्या लढाईत लहान भाऊ औरंगजेबला पाठींबा दिला होता. जेव्हा औरंगजेबाच्या हातात सत्ता आली तेव्हा रोशनआराला पादशाह बेगम ( मुघल साम्राज्याची पहिली महिला ) बनण्याचा सन्मान मिळाला. नंतर जहाआरा हिच्याशी औरंगजेबचे मतभेद मिठल्यानंतर ही पदवी रोशनआराकडून जहाआराला मिळाली. त्यामुळे रोशनआरा संतापली. पण ( सन १६८१ ) मृत्यूपर्यंत हा किताब जहाआराकडेच राहीला. सध्या उत्तर दिल्लीत रोशनआरा नावाने एक बाग देखील आहे.

रुकैया बेगम

रुकैया बेगम सम्राट अकबरची चुलत बहीण होती. त्यानंतर ती त्याची पहिली पत्नी बनली. चौदा वर्षांची असताना अकबरशी तिचा विवाह झाला होता. ती निपूत्रिक होती. त्यानंतर तिने नातू खुर्रम याचा संभाळ केला. जो पुढे बादशहा शाहजहाँ नावाने ओळखला जाऊ लागला. रुकैया बेगम मुघल दरबारात जान-ए-कला नावाने ओळखली जाऊ लागली.

गुलबदन बेगमने लिहीले ‘हुमायूं नामा’

गुलबदन बेगम ‘हुमायूं-नामा’ ची लेखिका होती. भाऊ हुमायूंच्या शासनकाळाचे तिने या ‘हुमायूं-नामा’ त वर्णन केले आहे. त्यास ऐतिहासिक दस्ताऐवज म्हणतात. मुघल दरबारातील साहित्यिक म्हणून तिला ज़ेब-उन-निशा या नावाने ओळखले जाते. ती कविता लिहायची. ती कवी आणि विद्वानांचा सन्मान करायची. जेब-उन-निशाला वडीलांनी कैदेतही ठेवले होते. याचप्रकारे बिलकिस मकानी जहांगिरची पत्नी आणि पाचवे मुघल सम्राट शाहजहां याची आई देखील प्रसिद्ध होती. ती मारवाडची एक राजपूत परिवारातील राजकुमारी होती. जहागिरशी झालेला तिचा विवाह राजकीय होता. त्यामुळे मुघल आणि राजपूतांची सोयरिक होऊन राजकीय संबंध वाढले. जहांगिरने तिला बिलकीस मकानी ही पदवी दिली होती. ज्याचा अर्थ ‘पवित्र निवासाची महिला’ असा आहे. हमीदा बानू बेगम बादशहा अकबरची आई देखील राजकारणी होती. ती मुलाला सल्ला देत साम्राज्यातील प्रश्न समजवायची. मुघल साम्राज्यत मजबूत करण्यात तिची भूमिका मोठी होती.

मरियम उज जमानी उर्फ जोधाबाई

बादशहा अकबर याची पट्टराणी म्हणून हिंदू पत्नी जोधाबाईला ओळखले जाते. राजकीय सोयरिक म्हणूनच तिचा विवाह अकबर बरोबर झाला होता. जोधाबाईला तिचे सौदर्य, शालीनता, बुद्धीमत्ता आणि राजकीय सल्लागार म्हणून ओळखली मिळाली होती. ती जहागिरची आई होती आणि शाहजहाची आजी होय…

सुल्ताना बेगमची हालत खराब

मुघल वंशाच्या महिलांना एकीकडे त्यांचे सौदर्य, विद्ववत्ता आणि सामर्थ्यासाठी ओळखले जाते. तर दुर्दैव हे की वर्तमान काळात या मुघल वंशातील जिवीत महिलांची दुरावस्था झाली आहे की त्यांनी जीवन जगणे कठीण झाले आहे. मुघल वंशाचे शेवटचे बादशहा बहादूरशाह जफर यांची खापर नात असणारी सुल्ताना बेगम सध्या पश्मिम हावडा परिसरात दोन खोल्यांच्या घरात राहाते. सुल्ताना हीचा विवाह प्रिन्स मिर्झा बख्त यांच्याशी झाली होता. 1980 मध्ये प्रिन्सच्या मृत्यूनंतर सुल्तानाचे वाईट दिवस सुरु झाले. सध्या ती सहा मुलांसोबत गरीबीत दिवस काढत आहे. त्यांना 6000 रुपये पेन्शन मिळत आहे. त्यावर ती जीवन व्यतित करतेय. याच प्रकारे बहादूर शहा जफरची दुसरी राणी झीनत महल हीलाही राजेशाही विसरुन सामान्य जीवन जगावे लागले होते.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.