AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Vaccine : बूस्टर डोससाठी ‘सिरम इन्स्टिट्यूट’चे पुढचे पाऊल; कोवोवॅक्सच्या फेज-3च्या चाचणीसाठी मागितली परवानगी

कोविड-19 आजाराची अनिश्चितता लक्षात घेऊन अनेक देश आधीच त्यांच्या नागरिकांना बूस्टर डोस देत आहेत, याकडेही इन्स्टिट्यूटने सरकारचे लक्ष वेधले आहे. तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी करण्यासाठी तुमची मंजुरी पंतप्रधानांच्या 'मेकिंग इन इंडिया फॉर द वर्ल्ड' या आमच्या संकल्पनेच्या अनुषंगाने महत्वपूर्ण आहे.

Corona Vaccine : बूस्टर डोससाठी 'सिरम इन्स्टिट्यूट'चे पुढचे पाऊल; कोवोवॅक्सच्या फेज-3च्या चाचणीसाठी मागितली परवानगी
प्रातिनिधिक छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Feb 28, 2022 | 2:13 AM
Share

नवी दिल्ली : भारताचा कोरोनाविरोधी लढ्यातील विजय अंतिम टप्प्यात आणण्यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India)ने पुढचे पाऊल टाकले आहे. कोरोना पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी लसीकरणा (Vaccination)चे टार्गेट पूर्णत्वास नेले जात आहे. सरकारचे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने प्रौढांसाठी बूस्टर डोस म्हणून Covovax या कोविड-19 लसीची फेज-3 मधील करण्यासाठी भारताच्या औषध नियामकाकडे (ड्रग्ज कंट्रोलर) परवानगी मागितली आहे. औषध नियामकामधील अधिकृत सूत्रांनी रविवारी ही माहिती दिल्याचे ‘एनडीटीव्ही’ने म्हटले आहे. या लसीला बूस्टर डोस म्हणून मान्यता मिळाल्यास देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला मोठा वेग मिळून भारत कोरोनावर पूर्णपणे मात करू शकणार आहे. (The Serum Institute sought permission to test Covovax’s Phase-3)

देशाच्या लसीकरण मोहिमेत कॉवोवॅक्सच्या समावेशाची प्रतीक्षा

ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने 28 डिसेंबर रोजी प्रौढांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी Covovax ला मान्यता दिली होती. मात्र देशाच्या लसीकरण मोहिमेत अद्याप ही लस समाविष्ट करण्यात आलेली नाही. याचदरम्यान सिरम इन्स्टिट्यूटमधील गव्हर्नमेंट अँड रेग्युलेटरी अफेअर्सचे संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी गेल्या आठवड्यात डिसीजीआयकडे फेज-3 च्या चाचणीला मंजुरी मिळविण्यासाठी अर्ज सादर केला आहे. ज्या प्रौढांनी किमान तीन महिन्यांपूर्वी Covishield किंवा Covaxin यापैकी एक कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला असेल, अशा नागरिकांना Covovax लसीचा बूस्टर डोस म्हणून वापर करण्यास परवानगी मिळावी, अशा विनंती सिरम इन्स्टिट्यूटने केली आहे. सुरक्षा आणि रोगप्रतिकारक शक्तीचे मूल्यांकन करण्यासाठी ही चाचणी करायची असल्याचे सिरम इन्स्टिट्यूटने आपल्या अर्जामध्ये म्हटले आहे.

जगभरातील अनेक देशांकडून बूस्टर डोसचा वापर सुरु

कोविड-19 आजाराची अनिश्चितता लक्षात घेऊन अनेक देश आधीच त्यांच्या नागरिकांना बूस्टर डोस देत आहेत, याकडेही इन्स्टिट्यूटने सरकारचे लक्ष वेधले आहे. तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी करण्यासाठी तुमची मंजुरी पंतप्रधानांच्या ‘मेकिंग इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ या आमच्या संकल्पनेच्या अनुषंगाने महत्वपूर्ण आहे. आपल्या देशातील आणि जगातील लोकांसाठी बूस्टर डोस म्हणून कोवोवॅक्सचा परवानगी दिली जाईल, याची खात्री आहे, असे सिंग यांनी अर्जात नमूद केल्याचे समजते. आमची इन्स्टिट्यूट सीईओ अदार पूनावाला यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली जागतिक दर्जाची जीवनरक्षक लस परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे. या पार्श्वभूमीवर प्रौढांना कोवोवॅक्सच्‍या बूस्टर डोससाठी फेज-3 क्‍लिनिकल ट्रायल करण्‍यास परवानगी द्यावी, असेही अर्जात म्हटले आहे. (The Serum Institute sought permission to test Covovax’s Phase-3)

इतर बातम्या

Russia Ukraine War : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात उच्चस्तरीय बैठक, यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुरक्षेला प्राधान्य

Hit & Run : केंद्र सरकारचा मोठा निर्णय; हिट अँड रन प्रकरणातील बळींच्या कुटुंबियांना आठपट अधिक भरपाई

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.