AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray: ही बंडखोरी नाही तर हरामखोरी, हे माझे वडीलही चोरायला निघाले आहेत, उद्धव ठाकरे यांचा बंडखोरांवर हल्लाबोल

किती वादळं येतील, पाला पाचोळा झडून जाईल. पण शिवसेनेची मुळं अशीच घट्टं राहतील. जे गेले त्यांचा उल्लेख संपूर्ण जग गद्दार असा करत आहे. ते काल म्हणत होते आम्हाला गद्दार म्हणू नका. पण तुमच्या कपाळावरच तुम्ही आता हाताने शिक्का मारुन घेतलाय तो बोलतोय. जे गेले त्यांच्यासोबत एकही सच्चा शिवसैनिक गेला नाही.

Uddhav Thackeray: ही बंडखोरी नाही तर हरामखोरी, हे माझे वडीलही चोरायला निघाले आहेत, उद्धव ठाकरे यांचा बंडखोरांवर हल्लाबोल
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jul 24, 2022 | 8:32 PM
Share

मुंबई- शिवसेनेशी गद्दारी करणारे हे बंडखोर नाहीत तर हरामखोर आहेत, नमकहराम आहेत, अशी जळजळीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी केली आहे. मुंबईत काळाचौकीत शिवसेना कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रामेळी ते बोलत होते. तुमच्यात हिंमत असेल तर शिवसेना प्रमुखांचा, माझ्या वडिलांचा फोटो लावू नका, तुमच्या हिंमतीवर मतं मिळवा. असे ते म्हणाले. प्रत्येकाला आईवडील प्यारे असतात. जे फुटून गेलेले आहेत, त्यातल्या सुदैवानं ज्यांचे आईवडील सोबत आहेत, त्यांनी त्यांना सोबत घेऊन सभा घ्याव्या आणि मतं मागावी. असा टोलाही त्यांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे. शिवसेनेसोबत ते माझे वडीलही (Balasaheb Thackeray)चोरायला निघाले आहेत, अशी टीका त्यांनी बंडखोर आमदारांवर केली. अशा लोकांच्या हातात महाराष्ट्र, मुंबई आणि तुमचं आयुष्य तुम्ही देणार आहात का? असा सवालही त्यांनी मुंबईकरांना केला आहे. कोर्टावर (Supreme court)माझा विश्वास आहे. पण आता त्यांनी निवडणूक आयोगाला सांगत आहेत आम्हीच खरी शिवसेना. आपल्याला एक गोष्ट करावी लागेल प्रत्येक पदाधिकाऱ्याचं शपथपत्र, प्रत्येक शिवसैनिकांची सदस्य नोंदणी. यासाठी आग्रह धरण्याची गरज उद्धव यांनी व्यक्त केली आहे. वाढदिवसाला भेट द्यायची असेल तर मला फुलांचे गुच्छ नकोत. मला सदस्यांच्या अर्जांचे आणि पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे हवेत. याचं कारण आता त्यांनी प्रोफेशनल एजन्सी कामाला लावल्या आहेत. ही लढाई पैसा विरुद्ध निष्ठा अशी आहे. तुम्ही कितीही पैसा ओतला तरी हे माझं शिवसैनिकांचं वैभव त्यांना पुरुन उरेल.

भाजपाला शिवसेना संपवायची आहे

भाजपाला एक तर शिवसेना संपवायची आहे. ती संपवताना त्यांना ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचं आहे. असं ते म्हणाले. मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईवर असलेला शिवसेनेचा भगवा त्यांना पुसायचा आहे, असा घणाघातही उद्धव यांनी यावेळी केला. फक्त शिवसेना फोडण्याची त्यांची चाल नाही तर मराठी माणूस आणि हिंदुत्वाचा भगवा फोडण्याची त्यांची चाल आहे. आजपर्यंत अनेकजण आपल्याला विचार होते की तुमचं आणि भाजपच्या हिंदुत्वात फरक काय. तर त्यांना सांगायचं की शिवसेना हिंदुत्वासाठी राजकारण करते आणि भाजप राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करतो.

आज मनावर हे दगड ठेवून करावं लागलं नसतं- भाजपाला टोला

2019 मध्ये आपले सगळे करार भाजपसोबत ठरले होते, त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली. आपलेही चांगले निवडून आले, भाजपची तर काय एकहाती सत्ता आली. तेव्हा मंत्रिपद नको म्हणत असताना आपल्या गळ्यात मारलं. त्यानंतर पाच सहा महिन्यात विधानसभा निवडणूक लागली. आज ते सांगत आहेत आम्ही सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. अडीच वर्षापूर्वीच हे झालं असतं, आज मनावर दगड ठेवून जे करावं लागलं आहे. तेव्हाच भाजपच्या कोणत्यातरी एखाद्या दगडाला शेंदूर लागला असता ना. आधी ५० – ५० टक्के ठरलं होतं अडीच वर्षे शिवसेनेचा, अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री. तेव्हा बंडखोर उभे केले, आपल्या जागा पाडल्या. तेव्हा शिवसेनेला मुख्यमंत्री देता येणार नाही म्हणत होते मग आता कसं संभव झालं? आता संभवामी युगे युगे कसं झालं?

शिवसेना यांना गाडून उभी राहील – उद्धव ठाकरे

किती वादळं येतील, पाला पाचोळा झडून जाईल. पण शिवसेनेची मुळं अशीच घट्टं राहतील. जे गेले त्यांचा उल्लेख संपूर्ण जग गद्दार असा करत आहे. ते काल म्हणत होते आम्हाला गद्दार म्हणू नका. पण तुमच्या कपाळावरच तुम्ही आता हाताने शिक्का मारुन घेतलाय तो बोलतोय. जे गेले त्यांच्यासोबत एकही सच्चा शिवसैनिक गेला नाही. जिथे सत्ता असते तिथे शिवसैनिक येत नाही तर जिथे शिवसैनिक असतो तिथे सत्ता येते. जे गेले ते आता शिवसैनिकांच्या अशा गर्दीत मिसळून दाखवू शकतील का? पोलीस बंदोबस्त, ज्यांनी निवडून दिलं त्यांच्यापासून? ज्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवून, निखारे ठेवून तुम्हाला निवडून दिलं त्यांच्यात हे आता फिरू शकत नाहीत. त्यांना आता पोलीस प्रोटेक्शन लागतंय. मुद्दाम एक गोष्ट तुम्हाला सांगायला होती, या सामान्यांना असामान्य केलं होतं. ते आता निघून गेले. आता पुन्हा एकदा आपल्याला सामान्यातून असामान्य लोक घडवायचे आहे. 56 वर्षापूर्वी शिवसेनेची स्थापना झाली. पिढ्यामागून पिढ्या गेल्या. पण त्यावेळी आपल्या मनगटात ताकद आहे हे बाळासाहेबांनी सांगितलं नसतं तर ही मनगटं पिचून गेली असती. या मनगटात ताकद ज्या शिवसेनेनं दिली ते आता शिवसेना गिळायला निघाले आहेत. याचं कारण स्पष्ट आहे, त्यांच्या मागची जी ताकद आहे, महाशक्ती, कळसूत्री बाहुल्यांचे संचालक त्यांना शिवसेना संपवायचीय. त्यांना मुंबईवरुन आपला भगवा हटवायचा आहे आणि त्यांचा ठसा उमटवायचा आहे. पण ज्या ज्या वेळी संकटं आली त्या संकटांना मातीत गाडून शिवसेना पुन्हा उभी राहली.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...