AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या हिंदी भाषिक राज्यालाच हिंदीचे वावडे, आता या विषयापासून सुरू होणार बोर्डाची परीक्षा

या हिंदी भाषिक राज्यालाच हिंदीचे वावडे असल्याचे समोर आले आहे. माध्यमिक शिक्षण परिषद 2026 मध्ये इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वीच्या बोर्ड परीक्षेत बदल झाला आहे.

या हिंदी भाषिक राज्यालाच हिंदीचे वावडे, आता या विषयापासून सुरू होणार बोर्डाची परीक्षा
या बोर्डाला हिंदीचे वावडे
| Updated on: Sep 09, 2025 | 4:19 PM
Share

UP Board Exam 2026 : उत्तर प्रदेश बोर्ड परीक्षा 2026 मध्ये मोठा बदल होत आहे. आता इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वीमध्ये परीक्षेची सुरुवात आता हिंदीपासून नाही तर इतर विषयापासून सुरू होईल. बोर्डाच्या अधिकाऱ्यानुसार, पहिल्या दिवशी हिंदीचा पेपर असेल तर विद्यार्थ्यांवर मोठा दबाव येतो आणि त्यामुळे त्याच्या इतर पेपरवर परिणाम होतो असा दावा केला आहे. एकीकडे महाराष्ट्रासारख्या राज्यात पहिलीपासून हिंदी लागू करण्यावरून वाद उफळला होता. त्यात युपी बोर्डाच्या निकालाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

नवीन निर्णयानुसार, बोर्डाच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी हिंदीचा पेपर नसेल. तर त्याऐवजी सोप्या विषयाचा पेपर होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांवर कोणत्याही आणि कसल्याही प्रकारचा तणाव येणार नाही. इतर पेपरवर या तणावाचा कोणताही परिणाम होणार नाही असे बोर्डाला वाटते.

का होत आहे हा बदल?

बोर्ड अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, हिंदी भाषेचा पहिला पेपर असल्यावर विद्यार्थ्यांवर आपोआप मानसिक दबाव येतो. ते एकदम घाबरून जातात. त्याचा परिणाम पुढील पेपरवर सुद्धा होतो. या मानसिक दबावापोटी हिंदी भाषिक मुलं, हिंदीच्याच विषयात नापास होण्याचे प्रमाण वाढले आहे, याकडे अधिकाऱ्याने लक्ष वेधले आहे. तसा हिंदी हा स्कोरिंग विषय, अधिक गुण प्राप्त होण्याचा विषय मानल्या जातो. पण विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव आल्याने त्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

आता नवीन निर्णय काय?

नवीन निर्णयानुसार, पहिल्या दिवशी हिंदी पेपर नसेल. त्याऐवजी सोपा पेपर असेल. या बदलामुळे विद्यार्थ्यावर मानसिक दबाव येणार नाही. बोर्डाची परीक्षा म्हटल्यावर अगोदरच विद्यार्थी तणावात असतात. त्यांच्यावर अधिक गुण मिळवण्यासाठी मनौवैज्ञानिक दबाव येतो. सोप्या विषयाचा पेपर असेल तर बोर्ड परीक्षेच्या वातावरणाशी विद्यार्थी पहिल्या दिवशी जुळवून घेईल असे अधिकाऱ्यांना वाटते.

वृत्तानुसार, उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वीची येत्या तीन-चार महिन्यांनी होणाऱ्या परीक्षेच्या तारखा लवकरच तयार करणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू झाले आहे. मुलांवर परीक्षेचा कोणताही ताण येणार नाही, यासाठी बोर्ड कसोशिने प्रयत्न करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ