ही वनस्पती म्हणजे सापांना घरात येण्याचं आमंत्रणच, रात्री असतो सापांचा डेरा, तुमच्याही घरात आहे का?
सापांबद्दल सर्वांच्याच मनात एक प्रकारचं कुतहूल असतं, परंतु सापांची भीती देखील वाटत असते. पावसाळ्याच्या काळात तर सापांचा धोका जास्तच वाढतो, कारण या काळात साप बिळातून बाहेर पडतात.

पावसाळ्यामध्ये सापांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो, कारण पावसाळ्याच्या काळात सापांच्या बिळात पाणी शिरल्यामुळे ते बाहेर पडतात. या काळात सापांचा वावर जमिनीवर मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अधिक काळजी घेणं गरजेचं असतं. पावसाळाच्या काळात सापांची बिळं बुजली जातात, त्यामुळे अशा स्थितीमध्ये ते नेहमी सुरक्षित जागेचा आश्रयासाठी शोध घेत असतात. जिथे जागा जास्त आर्द्रतायुक्त असते तसेच अंधार असतो, अशी जागा सापांना निवाऱ्यासाठी सुरक्षित वाटते. जर तुमच्याही घरात अशा जागा असतील तर साप तुमच्याही घरात घुसू शकतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात अधिक काळजी घेणं गरजेचं असतं.
भारतामध्ये जेवढ्या काही सापांच्या प्रजाती आढळून येतात, त्यातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच सापांच्या प्रजाती या विषारी आहेत. ज्यामध्ये मण्यार, फुरसे, घोणस आणि नाग या चार प्रजातीचा समावेश होतो. दरम्यान तुम्हाला जर कुठेही साप आढळून आला तर त्याला मारू नका, किंवा पकडण्याचा देखील प्रयत्न करू नका, कारण ते तुमच्या जीवावर बेतू शकतं. घरात किंवा घराच्या परिसरात कुठेही साप निघाला तर त्याची माहिती सर्पमित्रांना द्या. ते सापांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडतील.
दरम्यान असे काही विशिष्ट झाडं असतात, ज्या झाडांकडे साप आकर्षित होतात. या झाडांच्या वासामुळे नाही तर या झाडांमध्ये असे काही नैसर्गिक गुणधर्म असतात, ज्यामुळे साप या झाडांकडे आकर्षित होतात. या झाडांपैकीच एक झाड आहे ते म्हणजे रातरानीचं झाड. या झाडामध्ये असे काही नैसर्गिक गुणधर्म असतात, ज्यामुळे साप या झाडांकडे आकर्षित होतात. या झाडांच्या परिसरात जमीन ओली असते, त्यामुळे इथे अनेकदा बेडूक आणि इतर किटक या ठिकाणी येतात. त्यामुळे सापांना या ठिकाणी रात्रीच्यावेळी सहज शिकार सापडते, त्यामुळे साप या झाडांकडे आकर्षित होतात. त्यामुळे अनेकदा या झाडांभोवती किंवा परिसरात साप आढळून येतात. त्यामुळे अशी झाडं ही घरापासून थोड्या दूर अंतरावरच लावण्याचा सल्ला दिला जातो.
