Terror Attack | स्वातंत्र्यदिनावर दहशतवादी हल्ल्याचे सावट, लष्कर, जैश आणि इतर कट्टरपंथी गटांकडून धोका

Terror Attack | स्वातंत्र्यदिनावर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. लष्कर, जैश आणि इतर कट्टरपंथी गटांकडून धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावर प्रवेशासाठी कडक नियम लागू करण्याच्या सूचना आयबीने दिल्या आहेत.

Terror Attack | स्वातंत्र्यदिनावर दहशतवादी हल्ल्याचे सावट, लष्कर, जैश आणि इतर कट्टरपंथी गटांकडून धोका
दहशतवादी हल्ल्याचे सावटImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 1:22 PM

Terror Attack | देशाची राजधानी दिल्लीवर स्वातंत्र्य दिनाच्या (Independent Day) पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. गुप्तचर विभागाने इंटेलिजन्स ब्युरोने (Intelligence Bureau) 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनापूर्वी दिल्लीत (Delhi) लष्कर-ए-तैयबा (LeT), जैश-ए-मोहम्मद (J-e-M) आणि इतर कट्टरपंथी गटांद्वारे दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिला आहे. आयबीच्या 10 पानी अहवालात दिल्लीला लष्कर, जैश आणि इतर कट्टरपंथी गटांकडून धोका असल्याचे म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनाही (Police) स्वातंत्र्य दिनापूर्वी लाल किल्ल्यावर (Lal Fort) प्रवेशासाठी कडक नियम लागू करण्याच्या सूचना आयबीने दिल्या आहेत. आयबीने आपल्या अहवालात जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावरील हल्ला आणि उदयपूर आणि अमरावतीसारख्या घटनांचाही उल्लेख केला आहे. रिपोर्टनुसार, दहशतावादी गट सर्वसामान्य नागरिक, मोठ्या आणि महत्वाच्या इमारतींना लक्ष्य करु शकतात.

दिल्लीसह शेजारच्या परिसरावर लक्ष्य

भारताच्या गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, नवी दिल्ली, उत्तर दिल्लीसह आजुबाजूच्या परिसरात घातपाताच्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांवर नजर ठेवण्यात येत आहे. उत्तर दिल्लीतील चांदणी चौक, लाल किल्ला, कॅनॉट प्लेस या सारखी गर्दीची ठिकाणे, संसद, पंतप्रधान कार्यालय आणि निवासस्थान, राष्ट्रपती भवन आणि देशातील बहुतांश केंद्रीय मंत्रालये धोक्याच्या परिघात आहेत.

हे सुद्धा वाचा

गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली

गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, देश विघातक शक्ती सर्वसामान्य नागरीक, सरकारी आणि महत्वाच्या मोठ्या इमारतींना लक्ष्य करत आहेत. दिल्लीतील गजबजलेल्या बाजारपेठा या दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत. दिल्ली पोलिसांच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने TV9 Bharatvarsh ला माहिती दिली की, हल्ल्यासंदर्भातील इनपुट प्राप्त झाले आहेत. या इनपुटबाबत आम्ही आधीच खबरदारी घेत आहोत. गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. बाजारपेठेतील सीसीटीव्ही चांगल्यारित्या कार्यरत असून त्याची तपासणी करण्यात आली आहे. मोक्याच्या ठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच सीसीटीव्ही मार्फत ही लोकांच्या हालचालींवर लक्ष्य ठेवण्यात येत आहे. संशयितांच्या हालचालींवर लक्ष्य ठेवण्यात येत आहे.

दुसरीकडे, भारतीय गुप्तचर संस्थेकडून मिळालेल्या इनपुटनंतर दिल्ली वाहतूक पोलिसांनाही सतर्क करण्यात आले आहे. सामान्यतः वाहतूक पोलिसांची वाहतूक व्यवस्थापनावर नजर असते. दरम्यान हल्ल्याचा इशारा लक्ष्यात घेता, वाहतूक पोलीस बीट अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचा, जागरुक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विना परवाना अथवा गर्दीच्या ठिकाणी उभ्या असलेल्या गाड्या, दूरवर उभ्या गाड्यांकडे विशेष खबरदारीचा उपाय म्हणून लक्ष्य ठेवण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
राहुल गांधींची ट्रेन कशी? त्याला फक्त इंजिन अन् डब्बे..फडणवीसांची टीका
राहुल गांधींची ट्रेन कशी? त्याला फक्त इंजिन अन् डब्बे..फडणवीसांची टीका.
कोल्हेंचं अजित दादांच्या टीकेला प्रत्युत्तर, कार्यसम्राट की नटसम्राट..
कोल्हेंचं अजित दादांच्या टीकेला प्रत्युत्तर, कार्यसम्राट की नटसम्राट...
शरद पवार महायुतीत येणार? 4 जूननंतर... प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य
शरद पवार महायुतीत येणार? 4 जूननंतर... प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य.
नारायण राणे वेडा माणूस, त्याचा चेहरा..., ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
नारायण राणे वेडा माणूस, त्याचा चेहरा..., ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
... हा नारायण राणेंचा अपमान नाही का? वैभव नाईक यांचा उपरोधीक टोला
... हा नारायण राणेंचा अपमान नाही का? वैभव नाईक यांचा उपरोधीक टोला.
73 वर्षीय तरूण उमेदवार लोकसभेच्या रिंगणात, मी निवडून आलो तर...
73 वर्षीय तरूण उमेदवार लोकसभेच्या रिंगणात, मी निवडून आलो तर....
जरांगे पाटील 4 जूनपासून उपोषणाला बसणार? मराठा आरक्षणासाठी दिली डेडलाईन
जरांगे पाटील 4 जूनपासून उपोषणाला बसणार? मराठा आरक्षणासाठी दिली डेडलाईन.
तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट..दादांची कोल्हेंवर टीका
तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट..दादांची कोल्हेंवर टीका.
किडनीत शिंदे गट, लिव्हरमध्ये...निंबाळकरांचा मल्हार पाटलांना खोचक टोला
किडनीत शिंदे गट, लिव्हरमध्ये...निंबाळकरांचा मल्हार पाटलांना खोचक टोला.
दोन दिवस प्रतीक्षा, नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लढणार?
दोन दिवस प्रतीक्षा, नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लढणार?.