आज रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची जयंती; क्रांतीकारक ते ‘आरएसएस’चे संस्थापक जाणून घ्या संपूर्ण जीवनप्रवास

डॉ. केशव बळीराम हेडगेवार (Keshav Baliram Hedgewar) यांचा जन्म एक एप्रिल 1889 मध्ये एका गरीब ब्राम्हण कुटुंबात (Brahmin family) झाला. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक आहेत. त्यांनी लावलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे.

आज रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची जयंती; क्रांतीकारक ते 'आरएसएस'चे संस्थापक जाणून घ्या संपूर्ण जीवनप्रवास
डॉ. केशव बळीराम हेडगेवारImage Credit source: BBC news
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 5:30 AM

डॉ. केशव बळीराम हेडगेवार (Keshav Baliram Hedgewar) यांचा जन्म एक एप्रिल 1889 मध्ये एका गरीब ब्राम्हण कुटुंबात (Brahmin family) झाला. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक आहेत. त्यांनी लावलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. हेडगेवार लहानपणापासूनच क्रांतीकारी विचाराचे होते. त्यांच्या लहानपणीची एक गोष्ट अशी की, ते जेव्हा शाळेत शिकत होते, तेव्हा त्या शाळेची तपासणी करण्यासाठी एक इग्रजी अधिकारी आला होता. हेडगेवार यांनी त्या वयात त्या अधिकाऱ्याच्या शाळा तपासणीला विरोध केला. तसेच आपल्या काही मित्रांना एकत्र करत अधिकाऱ्याविरोधात ”भारत माता की जय”, “वंदे मातरम” अशा घोषणा दिल्या. हेडगेवारांचे शिक्षण त्यांच्या मोठ्या भावाने केले. मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर, इ.स. 1910 साली ते वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी कोलकत्त्याला गेले. तरुणपणात त्यांनी सशस्त्र क्रांतीत सहभाग घेतला होता. शाळेत असताना त्यांनी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला 60 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाटण्यात आलेली मिठाई रागाने फेकून दिली होती. तसेच पुढे ‘वंदे मातरम्‌’चा घोष केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून देखील टाकण्यात आले होते.

…म्हणून त्यांनी कोलकात्यामधून शिक्षण पूर्ण केले

बंगालमधील प्रत्यक्ष क्रांतिकार्यात सहभाग घेता यावा यासाठी त्यांनी आपले उच्चशिक्षण जाणीवपूर्वक कोलकातामध्ये पूर्ण केले. तेथे ते अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते बनले. पुढील काळात नागपुरात परतल्यावर कॉंग्रेसच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला व अनेक वेळा कारावास भोगला. इ.स. 1920 ते इ.स. 1931 या काळात ते अनेक सत्याग्रहांमध्ये, आंदोलनांमध्ये सहभागी झाले. पुढे त्यांनी 1925 साली दसरा अर्थात विजयादशमीच्या दिवशी संघाच्या पहिल्या शाखेची स्थापना केली. 1930 साली जेव्हा महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला, तेव्हा हेडगेवार यांनी आपल्यावर असलेली सरसंघचालकाची जबाबदारी डॉ. पराजंपे यांच्यावर सोपवून आपल्या सहकाऱ्यासोबत या आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनात सहभागी झाले म्हणून त्यांना 9 मिहिन्यांचा कारवास देखील झाला होता.

संघाची स्थापना

डॉक्टरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक वेगळे तत्त्वज्ञान व वेगळ्या प्रकारची कार्यपद्धती दिली. त्या पायावरच रा. स्व. संघ हा गेली अनेक वर्षे यशस्वीरीत्या कार्यरत आहे. क्रांतिकार्यातील आपले जुने सहकारी सोबत घेऊन त्यांनी नागपुरात एका पडक्या वाड्यात संघाची पहिली शाखा सुरू केली. चारित्र्यसंपन्न व्यक्तिनिर्माण व त्या आधारावर राष्ट्रनिर्माण या अंतिम ध्येयाचा विचार त्यांनी संघस्थापनेच्या माध्यमातून केला. डॉ. हेडगेवार हे कुशल संघटक, मार्गदर्शक व नेते होते. त्यांच्याच प्रेरणादायी नेतृत्वामुळे गोळवलकर गुरूजी, बाळासाहेब देवरस, भैय्याजी दाणी, एकनाथजी रानडे, पं. दीनदयाळ उपाध्याय यासारखे नेते, कार्यकर्ते देशाला मिळाले. 1925 म्हणजेच संघाच्या स्थापनेपासून ते 1940 त्यांच्या मृत्यूपर्यंत असे पंधरा वर्ष डॉक्टर हेडगेवार सतत देशभर भ्रमण करत होते. त्यांनी संघाच्या माध्यमातून एक-एक माणूस जोडण्याचे कार्य केले. त्यांच्या कष्टाचे फळ म्हणजे आज संघाचा महाकाय वटवृक्ष झाला आहे. लाखो कार्यकर्ते आज संघासाठी काम करत आहे.

इतर बातम्या

ED Raid : ‘आमच्याकडे मसाला तयार, आम्ही दणका देणार’, ईडीच्या धाडीनंतर नाना पटोलेंचा थेट इशारा; भाजपवर हल्लाबोल

Lonikar Audio Clip : बबनराव लोणीकरांचा पाय खोलात? ऑडिओ क्लिप प्रकरणात चौकशी सुरु, अॅट्रॉसिटीची तक्रारही दाखल!

Ajit Pawar | मला काहीच सांगायचं नाही, नो कमेंट्स; Satish Uke प्रकरणी अजित पवारांची सावध प्रतिक्रिया

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.