Tomato Price Hike : आईसाठी काय पण! मुलीने या देशातून थेट आणले टोमॅटो

Tomato Price Hike : देशातील अनेक भागात टोमॅटोचा भाव 300-350 रुपये किलोवर पोहचला आहे. केंद्राने हस्तक्षेप केला असला तरी भाव अजून 100 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे या मुलीने आईसाठी परदेशातून टोमॅटो विकत आणले आहे.

Tomato Price Hike : आईसाठी काय पण! मुलीने या देशातून थेट आणले टोमॅटो
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 7:02 PM

नवी दिल्ली | 22 जुलै 2023 : देशात टोमॅटोने सर्व रेकॉर्ड (Tomato Price Hike) मोडले आहेत. अवघ्या महिन्यातच टोमॅटोने 300 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. त्यांचा खिशावर भार पडला आहे. 25-30 रुपये किलो असणारे टोमॅटो आता थेट 100-180 रुपये किलो दरम्यान विक्री होत आहे. सामान्य नागरिकांना एकतर टोमॅटो जेवणातून हद्दपार केले आहेत अथवा त्यांचा वापर मर्यादीत केला आहे. टोमॅटोमुळे शेतकरी, व्यापारी, दलाल मालामाल झाले आहेत. यासंबंधीच्या अनेक रोचक कथा दररोज आपल्यासमोर येत आहे. अशीच एक जबरदस्त गिफ्ट समोर आले आहे. एका मुलीने आपल्या आईसाठी परदेशातून 10 किलो टोमॅटो (Daughter Carries 10 Kg Tomato) आणले आहे. एवढ्या महागाईत यापेक्षा मोठं गिफ्ट कोणतं असेल, नाही का?

अनेक कथा चर्चेत

मुंबईतील एका महिलेला नातेवाईकांनी वाढदिवसाला टोमॅटो गिफ्ट दिले होते. या महागाईत यापेक्षा महागडे गिफ्ट कोणते असेल, म्हणून ही भेट देण्यात आली. मध्यप्रदेशमध्ये पतीने भाजीत तीन टोमॅटो चिरुन टाकल्याचा राग येऊन पत्नीने घर सोडले. काही बॉलिवूड सेलिब्रिटिंनी टोमॅटो त्यांना परवडत नसल्याचा दावा केला. शेतकऱ्यांच्या तर टोमॅटोने दम आणला. टोमॅटो चोरीच्या घटनांमुळे त्यांना शेतात रात्री खडा पहारा द्यावा लागत आहे. टोमॅटो स्मगलिंग होत असल्याचे बिहार, उत्तर प्रदेशमधील अनेक घटनांतून समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा

परदेशातून आणले टोमॅटो

रेव्स नावाच्या एका ट्विटर हँडलवरुन ही स्टोरी समोर आली आहे. त्यावर एका भावाने ही स्टोरी शेअर केली आहे. त्यानुसार, त्याची बहिण दुबईहून भारतात येणार होती. बहिणीने आईला संपर्क केला. त्यावेळी आईने येताना तिला 10 किलो टोमॅटो घेऊन आणण्यास सांगितले. बहिण 10 किलो टोमॅटो घेऊन आली.

टोमॅटोची चटणी

इतक्या टोमॅटोचे आता काय करणार असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यावेळी या टोमॅटोची चटणी आणि लोणचं करणार असल्याचा दावा युझरने केला आहे. या ट्विटला आतापर्यंत 54,000 हून अधिक वेळा पाहण्यात आले आहे. या पोस्टला 700 हून अधिक लाईक मिळाल्या आहेत.

शेतकऱ्याने कमावले 38 लाख

कर्नाटकमधील कोलार येथील एका शेतकरी कुटुंबाला टोमॅटोने मालामाल केले. अवघ्या 30 दिवसांत मालामाल झाला. शेतकऱ्याने एका आठवड्यात टोमॅटोच्या 2000 बॉक्स विकले. त्यातून त्याला कमाई झाली. महिनाभरात त्याने 38 लाख रुपये कमावले.

नारायणगंजच्या शेतकऱ्याला 18 लाखांची लॉटरी

नारायणगंज येथील एका शेतकऱ्याला टोमॅटो विक्रीतून 18 लाखांची लॉटरी लागली. या शेतकऱ्याने एकूण 900 क्रेट टोमॅटोची विक्री केली. त्यातून तो लखपती झाला. त्याने एक क्रेट 2100 रुपयांना विक्री केला. त्याची एका दिवसातच 18 लाख रुपये कमाई केली.

पुण्यातील शेतकऱ्याला 2.8 कोटी रुपये

शेतकऱ्यांना या वाढीव किंमतींचा फायदा होत आहे. शेतकरी लखपतीच नाही तर करोडपती झाले आहेत. पुण्यातील एका शेतकऱ्याला टोमॅटो विक्रीतून 2.8 कोटी रुपयांची कमाई करता आली. या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याकडे अजूनही मोठ्या प्रमाणात टोमॅटो आहेत. त्यातून त्याला कमाईचा आकडा 3.5 कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.