दहशतवाद्यांच्या टार्गेटवर RSS, 1989 सालापासून आतापर्यंत 15 घटना!
एकीकडे दिल्लीतील कार स्फोटाची चर्चा असताना दुसरीकडे 10 नोव्हेंबर 2025 रोजी गुजरातमधील एटीएसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसच्या कार्यालयांवर हल्ला करण्याचा कट उधळून लावला आहे.

RSS Office Attack : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या कारमधील भीषण स्फोटानंतर देशात खळबळ उडाली आहे. हा कारच्या बॅटरीचा स्फोट नसून तो दहशतवादी कटाचा एक भाग होता, या संशयाला बळकटी देणारे काही पुरावे समोर आले आहेत. त्यामुळेच आता देशभरातील पोलीस, तपाससंस्था सतर्क झाल्या आहेत. दरम्यान, एकीकडे दिल्लीतील कार स्फोटाची चर्चा असताना दुसरीकडे 10 नोव्हेंबर 2025 रोजी गुजरातमधील एटीएसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसच्या कार्यालयांवर हल्ला करण्याचा कट उधळून लावला आहे. गुजरातच्या एटीएसने तीन आरोपींना अटक केले आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांत संघ आणि संघाचे कार्यालय हे दहशतवादी हल्ल्यांसाठी प्रमुख टार्गेट असल्याचे बोलेले जात आहे. कारण 1989 ते 2025 या 36 वर्षांच्या काळात देशातील वेगवेगळ्या संघ कार्यालयांना एकूण 15 वेळा लक्ष्य करण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयांवर हल्ला
संघाच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा 10 नोव्हेंबर 2025 रोजी प्रयत्न करण्यात आला. यात गुजरातच्या एटीएसने आयएसआयएस या दहशतवादी संघटनेशी कथितपणे संबंध असलेल्या डॉ. अहमद सयद याला हैदराबाद येथूनतर आझाद शेख आणि मोहम्मद सुहैल या दोघांना उत्तर प्रदेशमधून बेड्या ठोकण्यात आल्या. लखनौ आणि दिल्लीतील आझादपूर मंडी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयांवर हल्ला करण्याच्या कटात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. याआधी 15 सप्टेंबर मार्च 2021 रोजीदेखील नागपूरमधील संघाच्या मुख्यालयावर हल्ला करण्याच्या आरोपाखाली रईस अहमद नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. रईस अहमद हा जम्मू काश्मीर राज्यातील रहिवासी आहे.
याआधीचे हल्ले कधी झाले?
याआधी 23 सप्टेंबर 2022 रोजी केरळमधील कन्नूर येथील संघाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला होता. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र कार्यालयाच्या काचा फुटल्या होत्या. त्यानंतर 7 जानेवारी 2022 रोजी पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्यांनी नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि हेडगेवार भवन परिसराची टेहळणी केली होती. त्यानंतर या परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली होती. 8 ऑगस्ट 1993 रोजी चेन्नईतील संघाच्या मुख्यालयावर आरडीएक्स ब्लास घडवून आणण्यात आला होता. यात एकूण 11 जणांचा मृत्यू झाला होता. यात आठ संघाचे प्रचारक होते. 3 व्हिजिटिंग स्वयंसेवक होते. तर सात जण जखमी झाले होते. 25 जून 1989 रोजी पंजामधील मोगा येथील संघाच्या शाखेवर हदशतवादी हल्ला झाला होता. यात संघाच्या एकूण 25 स्वयंसेवकांचा मृत्यू झाला होता. 31 जण जखमी झाले होते. यावेळी संघाच्या झेंड्याची विटंबना करण्यात आली होती.
क्रुड बॉम्ब, ग्रेनेडने केला होता हल्ला
मध्य प्रदेशमधील भिंद येथे संघाच्या कार्यालयात 24 फ्रेब्रवारी 2024 रोजी हँड ग्रेनेड आढळून होते. संघाच्या कार्यालय परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी हे 30 ते 35 वर्षे जने ग्रेनेड फेकण्यात आले होते, असा अंदाज तेव्हा पोलिसांनी व्यक्त केला होता. 29 डिसेंबर 2023 पोजी मध्य प्रदेशातील शोहोर येथील संघाच्या कार्यालयावर दगडफेट करण्यात आली होती. 3 मार्च 2017 रोजी केरळच्या नंदपूरम येथील संघाच्या कार्यकर्त्यांवर क्रुड बॉम्ब फेकण्यात आला होता. 8 नोव्हेंबर 2017 रोजी केरळच्या कन्नूर येथे संघाच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, संघाचे कार्यालय, स्वयंसेवक यांच्यावर गेल्या 36 वर्षांच्या काळात असे एकूण 15 वेगवेगळे हल्ले करण्यात आले होते. यातील काही प्रकरणांची चौकशी, खटले अजूनही सुरू आहे.
