VIDEO : तेलंगणामध्ये महिला पोलिसाच्या डोक्यावर काठीने हल्ला

लंगणामध्ये ग्रामस्थांनी थेट पोलीस आणि महिला वन रक्षक पोलिसांवर हल्ला केला आहे. हा धक्कादायक प्रकार तेलंगणाच्या आसिफाबाद जिल्ह्यातील सिरपूर कागज नगर येथे घडला आहे.

VIDEO : तेलंगणामध्ये महिला पोलिसाच्या डोक्यावर काठीने हल्ला

हैदराबाद : तेलंगणामध्ये ग्रामस्थांनी थेट पोलीस आणि महिला वन रक्षक पोलिसावर हल्ला केला आहे. हा धक्कादायक प्रकार तेलंगणाच्या आसिफाबाद जिल्ह्यातील सिरपूर कागज नगर येथे घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये एक महिला पोलीस कर्मचारी ट्रॅक्टरवर उभी राहून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. याचवेळी ग्रामस्थांनी तिच्यावर काठीने हल्ला केला. गावात वृक्ष रोपणासाठी आलेल्या पोलीस आणि वन कर्मचाऱ्यांवर ग्रामस्थांनी हल्ला केला आहे. हल्ला करणारे सर्वजण  तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) पक्षाचे कार्यकर्ते आहेत, असं सांगितले जात आहे.

एनआय वृत्त संस्थेने या घटनेचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस आणि वनकर्मचारी वृक्षरोपणासाठी सिरपूर कागजनगर या ठिकाणी आले होते. वृक्षारोपण करण्यासाठी आलेल्या वनकर्मचारी आणि पोलिसांवर तेलंगणा राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांनी काठीने हल्ला केला. हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्यावर मोठ्या प्रमाणात राजकीय कार्यकर्त्यांवर टीका करण्यात येत आहे.

हा हल्ला अचानक झाल्याने यामध्ये पोलीस कर्माचाऱ्यांना बचाव करता आला नाही. यावेळी ग्रामस्थांनी ट्रॅक्टरवही हल्ला केला. महिला पोलीस ओरडत होती आणि ग्रामस्थ तिच्या डोक्यावर काठीने हल्ला करत होते. या गुडांवर कारवाई करावी अशी मागणी आता तेलंगणाच्या जनतेकडून करण्यात येत आहे.

यापूर्वीही देशात आतापर्यंत अनेक पोलिसांवर हल्ले झाले आहेत. नुकतेच मध्य प्रदेशातही विरोधी पक्ष नेता आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार आकाश विजयवर्गीय यांनीही नगर निगमच्या एका अधिकाऱ्याला मारहाण केली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *