TV9 Bangla Ghorer Bioscope 2025 : आयुष्य, सिनेमा आणि रिटायरमेंट.., सर्वांकडे दोन आयुष्य.. टीव्ही9 चे MD-CEO बरूण दास काय म्हणाले ?
टीव्ही9 नेटवर्कचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ बरूण दास हे 'घोरेर बायोस्कोप' मध्ये आयुष्य, सिनेमा आणि रिटायरमेंटवर बोलले. रिटायरमेंटला (निवृत्ती) ते 'स्वीट सिक्सटी' म्हणाले. बंगाली सिनेमाच्या समृद्ध इतिहासाचा उल्लेख करताना त्यांनी मनोरंजन क्षेत्रातील नव्या संधींबद्दल आशा व्यक्त केली. आपल्या सर्वांकडे दोन आयुष्य असतात, असं बरूण दास म्हणाले.

टीव्ही9 बांग्लाच्या ‘घोरेर बायोस्कोप’ कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीत, टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास हे जीवन, चित्रपट आणि रिटायरमेंट अर्थात निवृत्ती यावर बोलले. रविवारी संध्याकाळी कोलकातामधील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमात बरुण दास यांनी बंगाली सिनेमाच्या भविष्याबाबत सकारात्मक पैलूंवर प्रकाश टाकला.
त्यांनी आपल्या संपूर्ण भाषणात पुन्हा-पुन्हा रिटायरमेंटचा म्हणजेच निवृत्तीचा उल्लेख केला. बरुण दास म्हणाले, आपण आत्तापर्यंत ‘स्वीट सिक्सटीन’ (Sweet 16) बद्दल ऐकलं आहे, पण आता मला वाटतं की ते बदलून स्वीट सिक्सटी’ (sweet 60) केलं पाहिजे. अर्थात हा माझा वैयक्तिक विचार आहे. आपल्यापैकी जे लोकं साठीच्या (60 वर्ष) आसपास आहेत किंवा ज्यांच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाली आहेत, मला असं वाटतं की ते एका मोठ्या समस्येतून वाचले आहेत.
AI आणि Gen Z बद्दल बोलले बरुण दास
बरूण दास पुढे म्हणाले, या संकटाचे दोन मुख्य पैलू आहे. पहिला म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आणि दुसरा म्हणजे जनरेशन झेड अर्थात Gen Z. जगात सुरू असलेल्या घटनांकडे पाहिलं तर स्थिती किती गंभीर आहे ते आपल्याला समजू शकेल. अलीकडेच, नेटफ्लिक्सने वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीचा स्टुडिओ आणि स्ट्रीमिंग युनिट खरेदी करण्यासाठी 72 अब्ज डॉलर्सची बोली लावली. त्यानंतर पॅरामाउंट स्कायडान्सने त्याला आव्हान देत संपूर्ण वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीसाठी 108 अब्ज डॉलर्सची मोठी बोली सादर केली. संपूर्ण पश्चिम बंगालचा वार्षिक जीडीपी साधारण 250 अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे आणि दुसरीकडे अमेरिकन कंपन्या, एवढ्या मोठ्या रकमेत एकमेकांना विकत घेत आहेत.
वेगाने बदलतंय जगाचं राजकारण
यावरून जागतिक अर्थव्यवस्था किती वेगाने बदलत आहे याची कल्पना येते. AI बद्दल बोलताना बरुण दास म्हणाले की, एनव्हीडिया (Nvidia) च्या एका माजी चिनी कर्मचाऱ्याने मूर थ्रेड्स नावाची कंपनी स्थापन केली आहे. ही कंपनी चीनच्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट (सूचीबद्ध) होणार होती. सुमारे 1 अब्ज डॉलर्स उभारले जातील अशी कंपनीला आशा होती, परंतु गुंतवणूकदारांना त्यात इतका इंटरेस्ट होता की, सबस्क्रिप्शन हे 2,750 ते 4,500 पट जास्त होतं. म्हणजेच लोकं त्या कंपनीमध्ये 4.5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत गुंतवणूक करण्यास तयार होते.
पुढे ते म्हणाले की, भारत सध्या जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि आपला एकूण जीडीपी सुमापे 4 ट्रिलियन डॉलर्स इतका आहे. यावरून एआयच्या क्षेत्रात किती प्रचंड उत्साह आहे आणि किती गुंतवणूक केली जात आहे ते स्पष्ट होतंय, जे संपूर्ण अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त आहे. त्यानंतर ते Gen-Z बद्दल बोलले, ते म्हणाले की हे लोक अगदी वेगळे आहेत. जणू काही ते एखाद्या दुसऱ्या ग्रहावरूनच आले आहे. त्यांचा सर्वसमावेशकतेवर विश्वास आहे. ते पारदर्शकतेवर, निसर्गावर विश्वास ठेवतात. ते स्वतःला जागतिक नागरिक मानतात. आपल्याला त्यांच्याशी सामना करावा लागेल.
बंगाली सिनेमाच्या भविष्याबद्दल काय म्हणाले ?
बंगाली चित्रपटसृष्टीच्या भविष्याबद्दल बरुण दास म्हणाले, “मी नेहमीच आशावादी असतो. मला एक मोठी संधी दिसते आणि ती म्हणजे मनोरंजन क्षेत्रात. मनोरंजनात, प्रत्येकजण शून्यापासून सुरुवात करतो. काही जण थोडे पुढे असतील, परंतु सर्वांना समान संधी मिळेल. पुढे जाण्याची सर्वांना समान संधी असेल. मीडिया आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात, आपण बंगाली लोकं या संधीचा फायदा उचलू शकतो. आपले काही फायदे देखील आहेत, जसे की आपला भूतकाळ. पण, मी असं मानतो की की भूतकाळ दोन उद्देशांनी काम करतो – पहिलं म्हणजे, आपण त्यातून (भूतकाळातून) काही शिकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आपण त्यातून प्रेरणा घेतो. आपल्याला प्रेरणा घेण्यासाठी भरपूर काही आहे.”
भारता सिनेमाची सुरूवात बंगालमध्ये झाली. मूकपटाच्या काळात कोलकाता हे चित्रपट निर्मितीचे मुख्य केंद्र होते. 1903 साली जेव्हा हिरालाल सेन यांनी चित्रपट बनवण्यास सुरुवात केली तेव्हा दादासाहेब फाळके यांनी अद्याप चित्रपट निर्मिती सुरू देखील केली नव्हती. त्यानंतर नितीश बोस आणि बी.एन. सरकार आले. बहुतेक लोक मुंबईत स्थलांतरित झाले तेव्हाही हिमांशु रॉय आणि देविका राणीसारखे लोक होते. आपण नेहमीच पुढे राहिलो आहोत. त्यानंतर सत्यजित रे, ऋत्विक घटक आणि मृणाल सेनसारखे महान दिग्दर्शक आले. त्यामुळे आपली परंपरा खूप मजबूत आहे असं त्यांनी नमूद केलं.
सर्वांकडे असतात दोन आयुष्यं
बरुण दास म्हणाले की, आपल्याला आपल्या चुकांमधून पुन्हा शिकावं लागेल. जर आपण आपल्या चुकांकडे दुर्लक्ष केलं, त्या नजरेआड केल्या तर आपण संधी गमावू. त्यामुळे आपल्याला या दोन्ही गोष्टी एकत्र घेऊन पुढे जायला हवं. आपण आम्ही सकारात्मक मानसिकतेने काम करू शकू. मला आशा आहे की पुढच्या वर्षी होम सिनेमाची व्याप्ती आणखी वाढेल. “आपल्या सर्वांना दोन आयुष्य असतात. (आपलं) दुसरं आयुष्य त्या दिवसापासून सुरू होतं जेव्हा आपल्याला जाणीव होते की, आपल्याकडे फक्त एकच (आयुष्य) आहे” असं निवृत्तीच्या विचारांबद्दल बोलताना बरुण दास म्हणाले.
