लोकशाहीनं चालणाऱ्या संस्थेचा भाग झाल्याचा आनंद, NBF संस्थेविषयी tv9 चे सीईओ बरुण दास यांची भावना

एनबीएफचे चेअरमन अर्णब गोस्वामी आणि इतर सदस्य ज्या लोकशाही मार्गानं संस्थेचं काम पाहात आहेत, त्यामुळं प्रभावित झाल्याचं बरुण दास म्हणाले. एनबीएफकडून प्रादेशिक ब्रॉडकास्टर्सना संतुलित पद्धतीनं योग्य प्रतिनिधीत्व दिलं जातंय, असंही बरुण दास म्हणाले.

लोकशाहीनं चालणाऱ्या संस्थेचा भाग झाल्याचा आनंद, NBF संस्थेविषयी tv9 चे सीईओ बरुण दास यांची भावना
barun das
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 2:16 PM

नवी दिल्ली:  न्यूज ब्रॉडकास्टर्स फेडरेशनमध्ये देशातील अग्रेसर न्यूज नेटवर्क  टीव्ही 9 सहभागी झालं आहे. टीव्ही 9 नेटवर्कचे सीईओ बरुण दास यांची एनबीएफच्या वाईस प्रेसिंडेट पदी निवड करण्यात आली आहे. एनबीएफशी जोडलं जाणं आमच्यासाठी आनंददायी असल्याचं बरुण दास म्हणाले. तर, एनबीएफच्या कार्यकारी मंडळ आणि सदस्यांनी लोकशाही मार्गानं चालवलेलं संस्थेचं काम प्रभावित करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

संस्थेच्या कामामुळं प्रभावित

एनबीएफचे चेअरमन अर्णब गोस्वामी आणि इतर सदस्य ज्या लोकशाही मार्गानं संस्थेचं काम पाहात आहेत, त्यामुळं प्रभावित झाल्याचं बरुण दास म्हणाले. टीव्ही इंडस्ट्रीला प्रादेशिक बातम्यांमध्यून सर्वाधिक प्रेक्षक आणि उत्पन्न मिळते. प्रादेशिक बातम्यांना योग्य स्थान आणि आवाज दिल्यास टीव्ही इंडस्ट्रीची वाटचाल योग्य दिशेनं राहिलं. एनबीएफकडून प्रादेशिक ब्रॉडकास्टर्सना संतुलित पद्धतीनं योग्य प्रतिनिधीत्व दिलं जातंय, असंही बरुण दास म्हणाले.

टीव्ही 9 नेटवर्कचे सीईओ आणि एनबीएफचे वाईस प्रेसिडंट बरुण दास यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या सोबत झालेल्या बैठकीत एनबीफच्या शिष्टमंडळात सहभागी असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तर, टीव्ही क्षेत्र स्पर्धात्मक असून त्यामध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर नवनव्या प्रभावशाली माध्यमांची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं.

अर्णब गोस्वामी यांच्याकडून टीव्ही 9 नेटवर्कचं स्वागत

एनबीएफचे चेअरमन अर्णब गोस्वामी यांनी टीव्ही 9 नेटवर्क न्यूज ब्रॉडकास्टर्स फेडरेशनमध्ये सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. राष्ट्रीय आणि प्रादेशिक माध्यमांचं प्रतिनिधीत्व करणारी संस्था म्हणून एनबीएफविषयी अभिमान वाटतो, असं अर्णब गोस्वामी म्हणाले. एनबीएफ ही लोकशाही मार्गानं चालणारी माध्यम संस्था आहे. एनबीएफ ही नव्या भारतातील सर्वांसाठी मोठी ब्रॉडकास्टर्सची संस्था आहे, असंही ते म्हणाले.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री यांची भेट

न्यूज ब्रॉडकास्टर्स फेडरेशन (एनबीएफ) चे कार्यकारिणी सदस्य आणि वरिष्ठ सदस्यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्री न्यूज इंडस्ट्रीसमोरील आव्हान, माध्यमांमधील बदलणारे ट्रेंड आणि विकास यासंदर्भात विचार करत असल्यानं एनबीएफच्यावतीनं त्यांना धन्यवाद देण्यात आले. न्यूज चॅनेलचे टीआरपी पुन्हा एकदा लवकर सुरु करण्यात यावेत, असी मागणी केंद्रीय मंत्र्यांकडे एनबीएफकडून करण्यात आली.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी एनबीएफचे प्रमुख अर्णब गोस्वामी आणि सहकाऱ्यांशी चर्चा झाली. चर्चेदरम्यान मतांची देवाणघेवाण झाली. एनबीएफ सोबत न्यूज ब्रॉडकास्टिंगच्या समस्या सोडवण्यासोबत काम करु, असंही ते म्हणाले. न्यूज ब्रॉडकास्टिंग लोकशाहीला मजबूत करण्याचं काम करते, असंही अनुराग ठाकूर म्हणाले. एनबीएफ ही संस्था देशातील ब्रॉडकास्टर्सची मोठी संस्था आहे.

इतर बातम्या:

NBA सदस्यपदी ‘टीव्ही 9 नेटवर्क’ ची वर्णी, लोकशाहीवादी संस्थेचा भाग झाल्याचा आनंद, सीईओ बरुण दास यांची भावना, अनुराग ठाकूर यांच्यांशी विविध मुद्यांवर चर्चा

उद्धव ठाकरे टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्याच्या यादीत; प्रविण दरेकर म्हणतात, कशाच्या आधारावर सर्व्हे झाला?

TV9 Network CEO Barun Das said we are delighted to join the NBF and impressed with the democratic way of functioning by NBF Governing Body

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.